डाॅ. एम. चिदानंद मूर्ती
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
हिंदूंसाठी पवित्र क्षेत्र असलेल्या वाराणसी (काशी), अयोध्या (औध), नेपाळमधील काठमांडू आदी ठिकाणे मुस्लिमांनी विद्ध्वंस करुन अपवित्र केल्याची हजारो उदाहरणे आहेत. कर्नाटकातच हंपीसारख्या शेकडो ठिकाणी अशी कृत्ये केली आहेत. हा सर्वांना माहीत असलेला विषय आहे. मात्र, सर्वजण सार्वजनिकरीत्या बोलायला कचरतात. त्याच प्रकारे कर्नाटकातील वीरशैवांना पूज्य असलेली काही शरण क्षेत्रे आक्रमणाला बळी पडल्याचा विषय बहुतेकांना माहिती नाही. शरण क्षेत्रांना भेटी देऊन डाॅ. जयश्री दंडे व डाॅ. वीरण्णा दंडे यांनी लिहिलेल्या १२ ने शतमानद शरण स्मारकगळू (बसव कल्याणदिंद कूडलसंगमदवरेगे ) १२ व्या शतकातील शरण स्मारके (बसव कल्याणपासून कूडलसंगमपर्यंत) या पुस्तकात ठिकठिकाणी चित्रांसह त्याची माहिती दिली आहे. त्यावर आधारित हे छोटेसे लेखन.
१. परुषकट्टा : बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथील परुषकट्टा नावाच्या ठिकाणी बसवण्णा हे गोरगरीबांना आर्थिक साहाय्य करायचे, अशी लोकांची धारणा आहे. परुषकट्टा आधी बसवेश्वर देवस्थानच्या अखत्यारीत होते. १९४८ मध्ये मुस्लिमांनी त्यावर दावा करत न्यायालयात धाव घेतली, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. तेथे त्याच्या शेजारीच दररोज निरंतरपणे गोहत्या, पशुबळी, मांस विक्री चालते. आधी परुषकट्ट्यावर मोठे दगडी मंटप होते, त्याचे कलात्मक खांब उखडून तेथेच टाकले आहेत. बसव कल्याणला गेलो असताना ती जागा पाहून मी तीव्र दु:ख अनुभवलो आहे. हे स्पष्ट आहे, की परुषकट्टा हे एक मूळ शरण क्षेत्र आहे.
२. पीर पाशा बंगला : बसवकल्याणमधील बसवेश्वर देवालयाच्या मागे असलेला पीर पाशा बंगला हेही पूर्वी शैव क्षेत्र होते. तेथे असलेल्या नंदी मूर्तीवर हिरवे कापड टाकून झाकण्यात आले आहे. खाली कन्नड संख्या कोरल्या आहेत. तेथील मंटपही चालुक्य स्थापत्य शैलीची आहे. बहुतेक बाराव्या शतकातील आहे. तेथील मंटपाला लागूनच एक चालुक्यांचा शिलालेख आहे.
३. बसवकल्याणच्या शेजारीच किल्ला असलेला डोंगर आहे. काही वर्षांपूर्वी तेथील एका देवालयातील शिवलिंग काढून टाकले आहे. (माझ्या पाहणीनुसार किल्ल्याच्या दगडी भिंती बांधण्यासाठी भग्न देवालयाच्या अवशेषांचा वापर करण्यात आला आहे. चालुक्यकालीन देवालये पाडून त्यांचे अवशेष वापरले आहेत.)
४. बसव कल्याणनजीकच्या नारायणपुरात वचनकार वक्कलिग मुद्दय्याचे मंदिर आहे. तेच त्याचे समाधीस्थळ असल्याचा लोकांचा विश्वास आहे. त्याचे शिष्य मृत्यूंजय याचीही समाधीही तेथे आहे. मृत्यूंजयाचे देवालय अथवा समाधीला मुस्लिमांनी दर्गा बनविला आहे. मृत्यूंजय मंदिराचे मुर्तुजा दर्गा असे नामकरण झाले आहे. (मृत्यूंजय - मुर्तुजा).
५. बसव कल्याण तालुक्यातील हुलसूरमध्ये वचनकार लद्वेय सोम याची समाधी आहे. तेथे देवालयाच्या मागे उमा महेश्वराचे भग्न शिल्प होते. निजामाच्या काळात रझाकारांनी नाश केलेल्या देवालयाचा ते भाग बनले आहे.
६. बीदर तालुक्यातील अष्टुरमधील अल्लम प्रभू यांचे स्मारकाचेही सुलतान अहमद शहावली बहामनी दर्ग्यात रुपांतर झाले आहे. तेथे परंपरेनुसार पूर्वीपासून हिंदू पूजा करतात. मुस्लिमांच्या ताब्यातील या दर्ग्यात मुस्लिम नमाज पठण करतात. (अशा ठिकाणांकडे हिंदू - मुस्लिमांची एकतेचे उदाहरण म्हणून पाहणे योग्य नाही. अशाप्रकारे समानतेची स्थळे म्हणून काही हिंदू अभिमान बाळगतात. मात्र, ही सर्व ठिकाणे मुस्लिमांनी बळकावलेली हिंदूंची पवित्र स्थाने आहेत. )
७. सुरपूर तालुक्यातील मुदनूरू हे जेडर दासिमय्या यांचे गाव. पूर्वी हे गाव अग्रहार होते. तेथे १००१ लिंग, काही तीर्थ आहेत. ग्रामस्थ दासिमय्या यांचे जन्मस्थळ म्हणून एक घर दाखवितात. त्याचे आराध्य देव रामनाथ देवालयाच्या शेजारीच १०१ खांबांचे संगमनाथ मंदिर आहे. मुस्लिमांनी ते सुंदर मंदिर तोडून जमेल तसे त्याला पाडून सुमारे २५० हून अधिक जणांनी घरे बांधली आहेत.
८. सोलापूर जिल्ह्याती मंगळवेढा ही बिज्जळाची आधीची राजधानी होय. बसवण्णांनी तेथे सुरुवातीला कोषाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तेथील किल्ल्याजवळील एक दर्गाही मूळ हिंदू मंदिर आहे. त्या दर्ग्यालाही मुस्लिमांप्रमाणेच हिंदूही मानतात. स्थानिक लोकांच्या मतानुसार दर्गा पूर्वी मंगला देवीचे देवस्थान होते. दर्ग्यात आजही चालुक्य कालीन शिल्पे आहेत. (मंगला देवीच्या नावावरुनच त्या गावाला मंगळवाड, मंगळवेढे असे नाव पडले आहे.)
९. सोलापुरातील किल्ल्यात वचनकार सिद्धरामाने मल्लिकार्जुन मंदिर बांधले होते. तो किल्ला ताब्यात आल्यानंतर मुस्लिम शासकांनी त्याच्या स्थलांतराचा आदेश दिला. त्याचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले असले तरी मूळ देवस्थानचा काही भाग अजुनही शेष आहे. (टिपू सुलताननेही श्रीरंगपट्टण किल्ल्यातील अंजनेय देवस्थानचे मशिदीत रुपांतर केले.)
वर सांगितलेल्या पुस्तकातील आणखी काही माहिती. या हजार वर्षांत संपूर्ण कर्नाटकात मुस्लिम शासकांनी हिंदू देवालयांचा विद्ध्वंस केला आहे. विजापुरातील जिल्हाधिकारी बंगल्याच्या आवारातील करीमुद्दीन मशीद, कलबुर्गीतील कलाम मशीद, दोड्डबळळापूर येथील जिष्मा दर्गा, बेळगाव किल्ल्यातील मशीद, जामा मशीद या सर्व मशिदी हिंदू देवालयांच्या दगडांनी बांधण्यात आल्या आहेत. (संदर्भ : सीताराम गोयल लिखित ''Hindu Temples : What happened to them (The Islamic evidence. ) बाबा बुडनगिरी येथील दत्तात्रेय पीठाच्या विकृतीकरणाचा मुस्लिमांनी प्रयत्न केला आहे. विजापुरातील जगप्रसिद्ध इब्राहिम रोजा आवारात असलेले हिंदू देवालयाचे अवशेष मी पाहिलो आहे. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. हंपीतील वीरण्णा मंदिरही होन्नारसाब दर्गा बनले आहे. हे थांबविण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे हिंदू समाजातील आंतरिक जागृती आणि दृढसंकल्प होय. भारतात, शेजारी आणि जगात काय घडते आहे, काय घडू शकते याविषयी जागरूक राहून भविष्याविषयी आंतरिक तळमळ असावी. आपले राष्ट्र, धर्म याविषयी खरा अभिमान त्यांच्यात निर्माण व्हायला हवा. सत्य सांगायला, त्यानुसार वागायला घाबरू नये. सहनशीलता ही प्रशंसनीय तर असहनशीलता अक्षम्य आहे. मात्र, अति सहनशीलता अक्षम्य आहे. हिंदूंमधील आजची सहनशीलता अशीच कायम राहिल्यासह पुढील शतकातील भारत अथवा इंडियातील अल्पसंख्यक हिंदूंना वरील सत्यता जाणवेल. मात्र, तेव्हा ते पूर्णपणे असहाय्य असतील. हीच परिस्थिती पुढे राहिल्यास हिंदू धर्म, भारतीय संस्कृती केवळ इतिहासाच्या अभ्यासाचा विषयवस्तू ठरण्याची वेळ येईल. ही माझी आंतरिक तळमळ, वेदना आणि सात्विक आक्रोशाची घोषणा आहे.
साभार : कन्नड प्रभा
No comments:
Post a Comment