शिवशरण श्री सिद्ध्ररामेश्वर यांच्याशी संबंधित १३ शिलालेख उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशात त्यांच्याशी संबंधित अनेक मंदिरे, गुहा आदि स्थळे आहेत. एकट्या कर्नाटकातच ८० हून अधिक स्थळे असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वाखालील शरण चळवळीने सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक उत्थान घडवले. त्यांनी स्थापन केलेल्या आणि जगातील पहिली संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुभव मंटपाचे अध्यक्ष राहिलेल्या श्री सिद्धरामेश्वरांनी समरस समाज निर्मितीसह कायक (कर्म) तत्त्वाद्वारे अनेकविध समाजोपयोगी कामांतून तत्कालीन सोन्नलगी (सोलापूर) ला भ्ूकैलास बनवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील भ्रमंतीत अनेक ठिकाणी आपले आराध्य दैवत मल्लिकार्जुनाच्या लिंग स्थापना व गुहांमध्ये अनुष्ठान केले. अशा ठिकाणांचे जतन व संवर्धन करतानाच त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अन्य ठिकाणीही शरण भक्तांनी त्यांच्या मंदिरांची उभारणी केली. या ठिकाणांच्या स्थानिक जनतेत त्यांच्याविषयी अत्यंत गौरवाची भावना दिसून येते. तेथे श्री सिद्धरामेश्वराच्या नावाने यात्रा, रथोत्सव, नंदीध्वज मिरवणूक आदि विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
सोलापूर हे श्री सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थान व कर्मक्षेत्र असल्याने या ठिकाणी मंदिरासह गुरुभेट, त्यांंनी स्थापलेले ६८ लिंग, अष्टविनायक, तलाव आदि स्थळांची विपुुलता आहे. लातूर येथेही मंिदर असून कर्नाटकातील विजयपूर, चिक्कमंगळूर, शिवमोगा, चित्रदुर्ग, तुमकुर या जिल्ह्यांतही सिद्ध्ररामेश्वराची मंदिरे आहेत. कल्याण (बसवकल्याण) शरण चळवळीचे केंद्र राहिल्याने या जिल्ह्यांत तीन ठिकाणी सिद्ध्रारामेश्वरांशी संबंधित स्मारके आहेत. बसवकल्याणच्या पूर्वेकडील शिवपुुरात मंदिर, तलाव आहे. अल्लमप्रभूंसोबत आलेल्या सिद्धरामेश्वरांनी येथील एका गुहेत तपश्चर्या केली. सिद्धरामेश्वरांनी लिंगदीक्षा स्वीकारली, ते हेच स्थळ असल्याचे सांगितले जाते. कल्याणचा दंडनायक केशिराज याने येथील मंदिराला भेट दिल्याचे हरिहरने वर्णिले आहे. चिटगुप्पा या अतिप्राचीन गावातील डोंगरात सिद्धरामेश्वर गुहा आहे. या गुहेवरुन अनुभव मंटपाची कल्पना येऊ शकते. मात्र, आता ती मार्कंडेय गुहा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. मोरखंडीतील डोंगरावर सिद्धेश्वर मंदिर असून परिसरात अनेक गुुहा आहेत. सिद्धरामांनी येथे काही दिवस निवास केल्याचे म्हटले जाते. येथे एक सिद्धरामेश्वराचे तर दुसरे मार्कंडेयाचे लिंग आहे. येथे तीन तलावही आहेत. अनेक गुहांमुळे हे शरणस्थान होते, याला पुष्टी मिळते.
विजयपूर जिल्ह्यातील नागोड गुड्ड (ता. बसवन बागेवाडी) डोंगरावरही मंदिर आहे. बिळगी (ता. बागलकोट) येथील डोंगरावरील िनसर्गरम्य ठिकाणी सिद्धरामाचे मंदिर असून हे या गावचे ग्रामदैवत आहे. सर्वधर्मीय मानकऱ्यांमुळे हे देवस्थान सामाजिक समतेचे एक प्रतीक बनले आहे. या मंदिराचे मुखमंडप, नवरंग, सात फण्यातील सर्पचित्र, पंचमुखी गाय ही शिल्पे पाहण्यासारखी आहेत. येथील एका गुहेत देवालय असून त्यात १८ लिंग आहेत. या ठिकाणच्या डोंगरावर आणखी एक सिद्धरामेश्वर मंदिर आहे. येथे एकशिला दीपस्तंभही आहे. बागलकोट तालुक्यातच गुड्डद सिद्धरामेश्वर येथे देवालय आणि नैसर्गिक दगडी गुहा आहेत. गर्भगृहात एक सिद्धराम व दुसरे मल्लिकार्जुन लिंग आहे. श्रीशैलहून परतताना सिद्धरामांनी येथे काही दिवस अनुष्ठान केल्याचे व मल्लिकार्जुनने दिलेले लिंग येथे स्थापल्याचे सांगितले जाते.
सोन्नलगी (ता. जत, जि. सांगली) येथील शरणभक्तांनी प्रतिसोन्नलगी निर्माण केल्याचे दिसते. येथेही सोलापूरप्रमाणेच सिद्धरामाचे मंदिर, गुरुभेट, होमकट्टा, तलाव आदि स्थळे आहेत. येथील मंदिरात सिद्धरामेश्वर व मल्लिकार्जुन असे दोन लिंग आहेत. तसेच सोलापूरप्रमाणेच संक्रांतीला यात्रा व त्यानिमित्त अक्षता, होम, नंदीध्वज मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम होतात. येथे होमवेळी कितीही वारा असला तरी धूर सोलापूरच्या दिशेने जाते, असे ग्रासम्थ सांगतात. तसेच या ठिकाणच्या उत्खननात मोठ्या प्रमाणात शिवलिंग व भस्म (विभुती) सापडते. सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थान हे मूळ हीच सोन्नलगी (ता. जत) असून सोलापूर हे कर्मक्षेत्र असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. मात्र, त्याला आधार नसल्याने बेलदार शरणवगळता अन्य अनेक संशोधकांनी हा दावा फेटाळत सोलापूर हेेच जन्मस्थान असल्याचे मान्य केले आहे. तसेच सोलापूर हेच सिद्धरामांचे खरे जन्मस्थान असल्याचेही संशोधनातून साधार स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र, कर्नाकासह आंध्रप्रदेशातही अनेक ठिकाणी सिद्धरामांशी संबंिधत मंदिरे व अन्य स्मारके आहेत. याविषयी गुलबर्ग्याचे जयश्री दंडे व वीरण्णा दंडे दांपत्य, डाॅ. एम. एम. कलबुर्गी, गो. रू. चनबसप्पा, चिदानंदमूर्ती, आदि अनेक विद्वानांनी संशोधन केले आहेे. सिद्धरामांची स्मारके अनेक ठिकाणी िदसतात. शरणभक्तांनी ती त्यांच्या नावे स्थापन केली . त्यांच्याविषयी जनमानसांतील भक्ती, भावनात्मक संबंधांमुळेच ती आजपर्यंंत टिकून राहिली आहेत. मात्र, काही स्मारकांवर अतिक्रमण झाले असून त्यांची नावेही बदलून धार्मिक विधी व पूजापाठ सुरू असल्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळेे या स्थळांमागील नेमके सत्य उजेडात आणण्यासाठी व अप्रकाशित स्मारकांचा शोध घेतानाच अस्तित्वातील स्मारकांच्या संरक्षण व संवर्धनासाठी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment