शिशुनाळ शरीफ, सर मिर्जा इस्माईल, अब्दुल कलाम आदी प्रेरक आदर्श समोर असतानाही आपल्या सेक्युलरवाद्यांना मात्र, ते दिसत नाहीत. यांना तुष्टीकरणासाठी टिपूच्या जयंतीसारखे कार्यक्रमच हवेत.
वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील काही इतिहासकार खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत.
टिपू जयंती विवाद पुन्हा निर्माण झाला आहे. काहीना टिपू धर्मनिरपेक्ष तर काहीच्या दृष्टीने मतांध आहे. मुसलमानांतच या देशासाठी मोठे योगदान दिलेली महान मडंळी आहेत. त्या कोणाकडेही समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे.
आदरणीय राष्ट्रपती अब्द्राल कलाम कलाम हे एक धर्माभिमानी मुस्लिम होते. त्यांचा सर्वधर्म समन्यवय भाव हा वैश्विक होता. ते कर्मठ मुसलमान नसल्या कारणाने आपल्या समाजात सर्वमान्य नव्हते! त्यांच्या सर्वधर्म समभावाचा समान्य जनता तसेच मठाधीश, मान्यवरांनी गौरव, आदर केला. त्यामुळे घोषित धर्मनिरपेक्षतावादी कलाम यांचा समन्वयभाव आदर्श म्हणून स्वीकारले नाहीत.
शिशुनाळ शरीफ यांना कर्नाटकाचे 'कबीर दास' म्हणून ओळखले जाते. हिंदू, मुस्लिम हा भेद न बाळगता सर्वच लोक त्यांना संत म्हणून त्यांच्याकडे पाहतात. शरीफ हे सर्व भारतीय मूल्यांचा सन्मान करत होते, त्यामुळे ते येथील हिंदूंशी समरस झाले. मात्र, कर्मठांनी त्यांना दूर ठेवल्याने ते सेक्युलर कंपुचे ध्रुवतारा बनू शकले नाहीत.
प्रख्यात कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांनी उल्लेखिलेला हा एक प्रसंग : त्याकाळी म्हैसुरू सुंदर, स्वच्छ गाव होते. दिवस उजाडताना एक अधिकारी घोड्यावर बसून रस्ते स्वच्छ केलेत की नाहीत हे पाहण्यासाठी येत होते. ते मिर्जा इस्माईल ! जे म्हैसुरूचे दिवाण होते. 'मिर्जा इस्माईल यांचा संभावितपणा, व्यक्तित्व याप्रमाणेच त्यांच्या ज्ञान, समज, विनोदी स्वाभाव, सांस्कृतिक चेतनेने त्यांना अत्यंत श्रेष्ठ आणि यशस्वी प्रशासक बनवले' असे सर सी. व्ही. रामन यांनी सांगतिले आहे. नाल्वडी कृष्णराज वडेयर आणि मिर्जा इस्माईल या जोडीचा काळ म्हैसुरू संस्थानचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या धर्माचे असले तरी बांधवांप्रमाणे एकत्रितपणे केलेले यांचे कार्य आवडल्याने महात्मा गांधी यांनी 'येथे रामराज्य आहे' असे म्हटले होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या काळात काँग्रेस सारख्या चळवळी चालवायची. तेव्हा मिर्जा इस्माईल यांच्यामुळे गांधी, नेहरू यांच्यासारख्या नेत्यांशी महाराजांचे आत्मीय संबंध राहिले. या चळवळींच्या काळात मिर्जा इस्माईल यांच्या दक्षतेमुळेच कधीही दंगली उद्भवल्या नाहीत. १९४१ मध्ये जयपूर संस्थानातही कार्यरत असताना सर मिर्जा इस्माईल यांनी आपल्या दक्ष कारभाराचा ठसा उमटवला. त्यामुळे जयपूर शहरात औद्योगिक क्षेत्राने एक नवे युग अनुभवले. फाळणीनंतर पाकिस्तानच्या आधुनिकीकरणासाठी तिकडचे नागरिकत्व स्वीकारण्याचे महमद अली जिना यांनी आवाहन केले होते. मात्र, मिर्जा यांनी त्यांची विनंती फेटाळली. 'भारताच्या फाळणीला माझा स्पष्ट विरोध आहे' असे थेट जिना यांना कळवले.
१९४६ मध्ये हैदराबादचे दिवाण असलेले मिर्जा इस्माईल यांनी कोणत्याही तक्रारीविना संस्थान भारतात विलीन करण्यासाठी निजामाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे न ऐकल्याने त्यांनी काही महिन्यांतच त्यांनी दिवाण पद सोडले. मिर्जा इस्माईल कर्मठ मुसलमान नव्हते. त्यामुळे सेक्युलर कंपुने त्यांना समन्वयाचा आदर्श म्हणून स्वीकारले नाही.
केवळ ही काही उदाहरणे. याप्रमाणे जात, मत, पंथाच्या पलिकडील व्यक्ती मुस्लिम समाजात आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
असंख्य देशभक्त, सर्वधर्म समन्वय स्वीकारलेले मुसलमान या देशात आहेत. मात्र, देशाच्या फाळणीनंतर अशा श्रेष्ठ समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मुसलमान मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस अथवा इतर सेक्युलर पक्षांनी आणि डाव्या विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीरदास, शिशुनाळ शरीफ, मिर्जा इस्माईल, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ए पी जे अब्दुल कलाम, अश्फाकउल्ला खान यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, समाजसेवक, शास्त्रज्ञ, क्रांतिकारकांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण दिव्य संदेश देणारे, हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. इतिहासातून न शिकल्यामुळेच तुष्टीकरणाचे विषवृक्ष अधिक बहरले आहे. हिंदू - ख्रिश्चनांच्या भावनांवर गदाप्रहार करत त्यांचे मतांतर घडवून, न स्वीकारणाऱ्यांची हत्या केलेल्या टिपूला सामरस्याचा प्रतीक म्हणून स्वीकारणे, त्याचा धर्मनिरपेक्ष म्हणून उदोउदो करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना काय म्हणावे? मतांधांनाही राष्ट्रवादी म्हणून तुष्टीकरण केले जात आहे, हे म्हणायला काही खुप ज्ञानाची आवश्यकता नाही. आणखी किती काळ हे सामरस्याचे नाटक? कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!
(साभार : विजयवाणी, लेखक प्राध्यापक, हौशी लेखक आहेत.)
No comments:
Post a Comment