Saturday 18 March 2017

राजविद्या


धर्मामुळेच जीवनाला समृद्धी, ईश्वराचे दिव्यानुभव, परमशांती मिळते. धर्माअभावी जीव - जगत विनाशाकडे जाईल. एकूण धर्मामुळेच जीव - जग बहरेल. धर्म सोडल्यास मनुष्याला शांती, समाधान मिळू शकणार नाही. हृदयाचे माधुर्य हेच धर्म होय. असा हृदय नसल्यास, आणखी काहीही असले तरी काय प्रयोजन?
घराजवळच रंगीबेरंगी फुलांची बाग आहे. एकही दिवस तेथे गेले नाही. डोळे उघडून पाहिले नाही. हे जगच एक फुलबाग आहे. हे डोळे उघडून पाहण्याचा एक प्रयत्नही केला नाही तर कसे? शंभर वसंतांच्या या जीवनात प्रपंचाच्या बाजारातून एकही दिवस बाहेर आला नाही. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त पाहिला नाही. अनंत आकाशात चमचमणारे तारे पाहिले नाहीत. पक्ष्यांच्या गायनात सूर मिसळले नाहीत. मोराच्या मनमोहक नृत्याचा आनंद अनुभवला नाही. मूक, मुग्ध पशूंच्या डोळ्यांतील निर्मल भावसागरात डुबकी मारली नाही. असे झाले तर शंभर वसंतांचे आमचे जीवन कसे संतोषमय बनेल? 
या सत्यं शिवं सुंदरम् अशा सृष्टीचे मर्म जाणणारी दिव्य  कलाच धर्म होय. जगातील महात्म्यांनी आयुष्यभर अशा धर्माविषयी चिंतन - मंथन केले. देवर दासिमय्या यांनी आपल्या एका सुंदर वचनातून धर्माचे सत्यस्वरुप उलगडून दाखवले आहे. 
धर्मवनेत्तुववर धर्मिगळेंबिरी
निम्म धर्मवनारू अविवरिल्ला!
धर्मगळनिक्की उत्त भूमिय डोणी
निनेत्मनेल्लर नोडी सलहिदै रामनाथ.

कोणीतरी बनवलेले स्वयंपाक आणून देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार्‍यांना काहीजण धर्मवंत म्हणतात. खरे देव, धर्म कोणते हे कोणीही जाणून घेऊ शकतो. परंतु देवाने मात्र विश्‍वातील सकल जीवराशींना फळे, धान्य, पाऊस, वारा, प्रकाश आदी देऊन करुणा दाखवली आहे. त्या महादेवाने दिलेले दुसर्‍यांना देऊन आपण दानधर्म केल्याचे सांगणे, त्याचा अभिमान बाळगणे योग्य आहे? त्या महादेवाने या गर्द हिरव्या निसर्गात करुन ठेवलेले पंचक्वान्नाचे स्वयंपाक साधारण नाही. तो महादेवच महान पाकशास्त्रज्ञ! त्याच्यासारखे फुले, फळे, दूध मध, धान्य बनवणे कोणाला साध्य आहे? धर्मसागर असलेल्या महादेवाने बनवलेले हे स्वयंपाक देवाचा प्रसाद म्हणून भक्तिभावाने स्वीकारुन संतोषाने राहणे हेच आपले धर्म! आपले कर्तव्य! भगद्गीतेत हे धर्म अथवा आध्यात्मिक विद्येच्या संदर्भात खुपच सुंदर वर्णन केले आहे- 
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम।
प्रत्यक्षावमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम॥

ही आत्मविद्या सर्व विद्येचा राजा होय. तेवढेच नाही ही अत्यंत श्रेष्ठ, पवित्र, मंगलकारी, धर्मस्वरुपी आहे. अनुसरण्यास सुलभ आहे. अविनाशी आहे!
हसत हसत सदा प्रसन्नचित्त राहणे हेच धर्म होय. ही आध्यात्मविद्या, राजविद्या आहे. गंभीर राहणे हे कष्टदायक आहे. सतत हसत हसत संतोषमय, विजयी भावाने राहणे हे काही फारसे कष्टाचे नाही. हृदय स्वच्छ अथवा मन मुग्ध बालकाचे बनल्यास पुरेसे आहे. हसर्‍या चेहर्‍याचे झोपडीत असले तरी ते राजवाड्यासारखे वाटते. रडक्या चेहर्‍याचे राजवाड्यात असले तरी ती झोपडीपेक्षाही कनिष्ट वाटते. 
एका श्रीमंताच्या घरासमोरील झाडावर बसून एक पक्षी दिवस उजाडताच गात होते. एके दिवशी श्रीमंत पक्ष्याला विचारला, “तू सतत इतक्या खुशीत गातोस कसा काय? अपार संपत्ती गोळा करुन ठेवलास काय?’’ पक्ष्याने सांगितले, “ या झाडावर असलले गवत, काड्यांचे घरटे, त्यात असलेले दोन अंडे हेच माझी संपत्ती. तरीही आम्ही गात राहतो. कारण आमचा जन्मच गाण्यासाठी, आकाशात उडडण्यासाठी झाला आहे. तुमच्याप्रमाणे जमीन धरुन बसायला नव्हे!!’’ हसतहसत जगायला आणखी कशाची आवश्यकता नाही, निर्मल हृदय हे एक असले तर पुरेसे आहे, याची जाणीव श्रीमंताला आता झाली. 
हजारो वर्षांपूर्वी याच भूमीत उपगुप्त नावाचा एक सुप्रसिद्ध बौद्ध संन्यासी होऊन गेला. हा धर्मोपदेश करत एका गावी आला. त्या गावी एगक श्रीमंत नर्तकी होती. तिच्या सौंदर्यावर, संगीतावर फिदा होऊन त्या गावातील लोक आपली संपत्ती उधळायचे. उपगुप्त तिच्या घरी भिक्षेसाठी गेला. उपगुप्ताच्या सौंदर्याला भाळलेली नर्तकी स्वत:सह आपली संपत्ती त्याला अर्पण करण्यास सिद्ध झाली. उपगुप्त सांगितला - “ मी आता अन्नाच्या भिक्षेसाठी आलो आहे, सोन्याच्या भिक्षेसाठी नव्हे; योग्य वेळ येताच मी परत येईन. त्यावेळी आणखी काहीतीर वेगळं दे!’’आज नाही तर उद्या कधीतरी उपगुप्त येईल, या भरवशाने नर्तकी गप्प बसली. काळ गेला. नर्तकीला महारोग झाला. सर्व गावकर्‍यांनी तिला गावाबाहेर हाकलून लावले आणि तिची संपत्ती हडपली. तेथे असलेल्या प्रेतांच्या मध्ये ती जीवंत शव बनून राहिली. तेवढ्यातच “बुद्धं शरणं गच्छामि’’ हे शब्द कानावर पडले. हा उपगुप्ताचाच आवाज असावा म्हणून ती डोळे उघडून पाहिली.समोर तोच उभा होता. ती म्हणाली, “हीच काय तू सांगतिलेली योग्य वेळ?’’ “होय, तू मागचं सर्व विसरून जा. सर्व जग आपली साथ सोडल्यावर आपल्याविषयी करुणा दाखवून धर्ममार्गावर नेऊन निर्वाण अथवा मोक्ष प्राप्त करुन देतात तेच खरे बंधू -नातीगोती, गुरू, देव, सर्वस्व!! असे उपगुप्तने सांगितले. हे उपदेशामृत ऐकता क्षणी नर्तकी हसत - हसत देवलोकापर्यंत पोहोचली. मृत्यूच्या वेळीही अमरत्वाचे अमृतानुभव देणेच धर्म अथवा अध्यात्म! हीच राजविद्या!!

Wednesday 15 March 2017

समरसतेचे मंदिर खुले झाले!

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंढरपुरातील श्री विठ्ठल - रुक्मिणी

 मंदिर बडवे - उत्पातांच्या कचाट्यातून मुक्त झाल्यानंतर नुकतेच

 पुजारीपदाच्या भरतीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. त्यांच्या निवडीही

 लवकरच जाहीर होतील. यात पुरुषांसह महिलांनाही संधी मिळण्याची 

शक्यता आहे. साने गुरुजींच्या हे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या 

समरसतावादी लढ्याला नुकतीच 10 मे रोजी 67 वर्षे पूर्ण झाली. त्या 

पार्श्‍वभूमीवर पुजार्‍यांच्या निवडीने हे मंदिर सर्वार्थाने मुक्त होणार आहे. 

तसेच हे परिवर्तन सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या क्रांतिकारी 

ठरणार आहे.


भक्त पुंडलिकाच्या भक्तिपोटी लोककल्याणासाठी श्री विठ्ठल, रुक्मिणी 

मातेसह भूवैकुंठी पंढरीत अवतरला. तो खरा तर लोकदेव. मात्र, लाखो 

वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाला गेल्या अनेक शतकांपासून 

बडवे - उत्पात मंडळींनी जखडून ठेवले होते. त्यांनी संत, महंतांपसून 

सर्वसामान्य वारकर्‍यांपर्यंत सर्वांनाच छळले. श्री संत चोखामेळा यांच्या 

धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही 

तरी अपराध॥’ या अभंगातून हे स्पष्ट होते. धर्म नीटसे समजून न घेता 

त्याच्या नावाखाली सर्वसामान्य वारकर्‍याला नागवण्याचाच प्रकार विठ्ठल 

मंदिरात सुरू होता. केवळ मंदिरात येणार्‍या अमाप पैशासाठी सामान्य 

भाविकाला दूर लोटण्यात येत होते. तर मागल्या दाराने श्रीमंत भक्तांना 

विठ्ठल दर्शन मिळेल, यातच ते खरी धन्यता मानत होते. दक्षिणेसाठी 

भाविकांचा छळ मांडला जात होता. त्यामुळे वारकर्‍यांनी बडवे, उत्पात व 

सेवाधारी यांना मंदिरातून हद्दपार करण्याची मागणी सुरू केली. 

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच या मागणीने जोर धरला होता.


या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी 1967 मध्ये आळंदी यात्रेत वारकरी 

महामंडळाची स्थापना झाली आणि त्याला वेग आला. बडवे - उत्पात

 यांच्या विरोधातील वाढती नाराजी लक्षात घेऊन 1968 मध्ये तत्कालीन

 मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. डी नाडकर्णी

 यांचा आयोग नेमला. या आयोगाने 1970 मध्ये राज्य शासनाला अहवाल 

दिला. बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे हक्क, अधिकार व विशेषाधिकार 

रद्दबातल करावेत, देवतांच्या पूजेसाठी नोकर नेमावेत, धार्मिक देवालय 

राजकारणापासून अलिप्त राखावे, देवळाच्या भागात दक्षिणा / ओवाळणी 

मागण्यास सक्त मनाई असावी, प्रांत दर्जाचा अधिकारी व्यवस्थापक 

असावा, अशा शिफारशी या आयोगाने केल्या होत्या. त्यानंतरच्या तीन 

वर्षांमध्ये या अहवालावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने वारकर्‍यांनी 

1973 मध्ये मुंबईत उपोषण सुरू केल्याने शासनाला पंढरपूर मंदिर 

अधिनियम 1973 हा कायदा करणे भाग पडले. त्यामुळे बडवे - उत्पातांचे 

मंदिरातील वर्चस्व संपुष्टात आले. मंदिराचे व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द 

केले गेले. परंतु बडवे - उत्पातांनी अधिसूचना प्रसिद्ध होण्याआधीच याला 

आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली 

40 वर्षे बडवे - उत्पात व सेवाधारी यांचा आपल्या हक्कासाठी न्यायालयीन 

लढा सुरू होता. तो गेल्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 

निर्णयाने संपला आणि त्यांचे सर्व अधिकार संपुष्टात आले.


दरम्यान, वेगवेगळ्या स्तरांवरील न्यायालयांनी त्यांच्या विरोधातच निकाल 

होते. मंदिर व्यवस्थापन देवस्थान समितीच्या हाती गेल्यानंतरही बडवे - 

उत्पात व सेवाधारी यांची भूमिका मंदिर परिसर विकास व भाविकांना

 सोयी सुविधा निर्माण करण्यातही अडचणीची ठरत होती.



सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर समितीने श्री विठ्ठल - रुक्मिणी व 

मंदिरातील विविध देवतांच्या पूजाअर्चा, नित्योपचार, विधी व नैमित्तिक 

पोषाख करणे आदींविषयीचे बडवे -उत्पात व सेवाधारी यांचे अधिकार 

काढून घेतले. मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांमार्फत ही सर्व कार्ये सुरू

 आहेत. 

दरम्यान, मंदिर समितीने पुजारी निवडीसाठी भरती प्रक्रिया राबवली. 

राज्यभरातून 199 अर्ज यासाठी आले होते. त्यापैकी 176 जणांनी मुलाखती 

दिल्या आहेत. त्यात 23 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मंदिर 

समितीच्या येत्या बैठकीत पुजार्‍यांची निवड जाहीर होईल. यात हिंदू 

धर्मातील कोणत्याही जातीच्या आणि विशेषत: महिलांनाही श्री विठ्ठल - 

रुक्मिणीची पूजा - अर्चा करण्याची संधी मिळू शकते. वाल्मिकी, व्यास 

यांच्यासह अनेक समाजाच्या शेवटच्या वर्गातील मंडळी आपल्या ज्ञानाच्या 

आणि तपोबळाच्या आधारावर ऋषी पदावर पोहोचले. ते हिंदू समाजाचे 

आराध्य बनले. तर गार्गी, मैत्रेयी अशा तत्त्वज्ञही झाल्या. मात्र, कालौघात 

धर्माचे नीटसे आकलन न करुन घेतल्याने जातीव्यवस्था, अस्पृश्यता या 

बेड्यांनी हिंदू समाज जखडला गेला. तर स्त्रियांना चार भिंतींपूरते सीमित 

केले गेले. सध्या सुरू असलेल्या समरस समाजजीवनाची निर्मिती आणि 

स्त्रीशक्ती जागरणाच्या प्रयत्नांना या घटनेने बळ मिळणार आहे.


साने गुरुजी यांच्या श्री विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या

 आंदोलनाला 67 वर्षे पूर्ण होत असतानाच विठ्ठल मंदिरातील पुजारी

 भरतीची प्रक्रिया पार पडल्याने त्यांनी समरस समाजनिर्मितीसाठी सुरू

 केलेल्या लढ्याचेच हे यश म्हणावे लागेल. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत

 सांगायचे तर, आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून

 सामाजिक  सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा

 प्रयत्न ज्यांनी  केला, त्यांना अपयश मिळाल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी

 फारच  थोड्यांनी स्वत: अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी

 असलेल्या  आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक साधना तर

 एकाचीही झाली नव्हती. समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर

 धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने.’ साने गुरूजी हे जाणून होते.

 आपण  धर्ममय मनुष्य’ असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी धार्मिक हक्कांनाही

 महत्व असल्याचे ठामपणे सांगितले. मनुष्य हा केवळ दिडक्यांवर जगत 

नाही. त्याला मन आहे, हृदय आहे, आत्मा आहे. स्वाभिमान आहे, प्रतिष्ठा

 आहे.’ 

म्हणून केवळ आर्थिक परिस्थिती सुधारुन हा प्रश्‍न सुटणार नाही, असे त्यांचे 

मत होते. त्यामुळेच त्यांचे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठीचे आंदोलन 

यशस्वी होऊ शकले. मात्र, त्यांच्यानंतर या आंदोलनाची धुरा वाहणार्‍या 

मंडळींच्या धर्मविरोधी भूमिकेमुळेच पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या 

महाराष्ट्रात अशाप्रकारचे धार्मिक बदल घडण्यात खरी अडचण निर्माण 

होत आहे. कारण दक्षिण भारतात याआधीच हे होऊ शकले. शिवाय गेल्या 

(2013) ऑक्टोबर महिन्यात मंगळूरू (कर्नाटक) जवळील कुद्रोली 

गावातील 100 वर्षांच्या जुन्या मंदिरात दोन विधवा महिलांची पुजारी म्हणून 

नियुक्ती झाली.


आता पगारी पुजार्‍यांची नेमणूक होणार असल्याने भाविकांना बडवे - 

उत्पातांच्या छळाचा सामना करावा लागणार नाही. मात्र, मंदिर समितीच्या 

कारभारातही सुधारणा होणे गरजेचे आहे. दर्शनापासून वेगवेगळ्या

 सुविधा भाविकांना उपलब्ध करुन देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार

 आहे. 

भाविक धर्मकार्य व सेवाकार्यांसाठी देणग्या देतात, याचे भान समितीने 

राखणे आवश्यक आहे. परंतु समितीवर असलेले राजकीय नेतेमंडळींचे 

वर्चस्व पाहता समितीच्या कारभारात सुधारणा होण्याविषयी साशंकताच 

आहे. कारण राजकीय पुनर्वसन म्हणूनच या समित्यांकडे पाहण्याचा 

राजकीय पक्षांचा   दृष्टिकोन आहे. त्यामुळे नाडकर्णी आयोगाच्या 

शिफारशीनुसार धार्मिक देवस्थाने राजकारणापासून अलिप्त राखण्याची 

गरज आहे. त्यासाठीही आता चळवळ उभी राहण्याची आवश्यकता आहे.




Monday 6 March 2017

हास्य - योग






धर्म हे आपल्या जीवनाला समृध्द, संतृप्त करणारे माध्यम आहे. आपले तन, मन, बुद्धी, भाव हे सर्व धर्ममय व्हायला हवेत, तेव्हा आपले जीवन सुंदर बनेल. आपल्या जगातील सर्व समस्यांना धर्माचे अभाव हेच कारण आहे. आपले वागणे - बोलणे, आचार - विचार, भाव - बुद्धी हे सर्व योग्य आणि सुंदर असावेत. हेच धर्म होय. अन्यथा ते अधर्म होय. त्यामुळे पारिवारिक आरोग्य, सामाजिक सौहार्द बिघडते. युद्ध, कलह, कोलाहल निर्माण होते. एकूणच या जगात सर्व संकटांना धर्माचे अभाव हेच कारण होय. आपले जीवन धर्ममय बनल्यास जगातील सर्व समस्यांचे आपोआप परिहार होईल. 
एखादे सुंदर कापड तयार करावयाचे झाल्यास त्यातले सर्व ताणे - बाणे चांगले असायला हवेत. ताणे म्हणजे उभे धागे, बाणे म्हणजे आडवे धागे. प्रत्येक ताण्या - बाण्याचे वर्ण, गात्र व भूमिका सर्व चांगले असायला हवे. एखादे धागे चांगले नसल्यास कापड आपले मूल्य, सौंदर्य गमावून बसेल. त्याच प्रकारे आपल्या जीवनाचे कापडही चांगले व्हावयाचे असल्यास प्रतिक्षणी आपले वागणे - बोलणे सर्व चांगले असायला हवे. जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. एकदम दिवस, महिना, वर्ष बनून जीवन आपल्याकडे येत नाही. एकेक क्षणाने ते आपल्याकडे येते. या क्षणीचे आपले वागणे - बोलणे यावरच आपले संपूर्ण जीवन अवलंबून आहे. कितीही मोठे घर असले तरी त्याची सुरुवात एका विटेनीच सुरुवात होते. एक एक वीट जुळूनच महाल बनते. एखादे वीट अथवा दगड चांगले नसल्यास त्या घराच्या सौंदर्याला बाधा आणते. आपले प्रत्येक पाऊल आपल्या जीवनाला आकार देते.
एखादे लहान मूल खेळल्यास, बोलल्यास, पळाल्यास, उभा राहिल्यास, पडल्यास, हसल्यास, रडल्यास, शेवटी गप्प झोपल्यासही ते सर्वांना आवडते. त्याचे चालणे, बोलणे तेवढे पवित्र, परिशुद्ध असते. आपलेही वागणे - बोलणे त्या बाळासारखे झाल्यास केवळ मानवजातच नव्हे तर साक्षात् महादेवालाही ते आवडेल. 
कंड भक्तरिगे कै मुगिवातने भक्त,मृदु वचनवे सकल जपंगळय्या,मृदु वचनवे सकल तपंगळय्या,सदुविनयवे सदाशिवन वलुमेयय्या,कूडलसंगय्यनंतल्लदोल्लनय्या
मराठी : भक्तासी बघुनी जोडी जो हात, तोच भक्त जाण या जगी!मृदुवाणितचि असे सारे जप!मृदुवाणितचि असे सारे तप!सद्विनयाने सदाशिवाची होई करुणा,कूडलसंगमेशासी न रुचे याविना!
जप, तप म्हणजे केवळ अरण्यात जाऊन, कंदमुळे खाऊन करावयाचे व्रताचरण नव्हे. आपले दैनंदिन वागणे - बोलणे, आचार - विचार, भाव - बुद्धी परिशुद्ध, पवित्र व्हायला हवे. विनयशील असावे. याच्याहून श्रेष्ठ जप - तप, रीती -नीती, योग - धर्म कोणते आहे? असे मृदुमधुर जीवन जगणारेच सर्वांना प्रिय असलेले संत - शरण होत. 
सुकरात एक महान तत्त्वज्ञानी होता. ती अशी मोठी व्यक्ती होती की, संपूर्ण युरोप त्याला कधीही विसरणे शक्य नाही. तेथील युवक त्याचे मार्गदर्शन ऐकायला धडपडत असत. मात्र, सुकरातचे आपल्या घराकडे, संसाराकडे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी झांतीपी त्याला पदोपदी बोलायची. सुकरात मात्र हसत हसतच असायचा. एका दिवशीही तो पत्नीला उलट बोलत नव्हता. एके दिवशी मित्रांनी विचारले, - “असल्या भांडखोर पत्नीशी काय संसार करतो, तिला सोडत का नाहीस?’’ सुकरात म्हणाला, -“मला तत्त्वज्ञानी बनवणारी तीच आहे.’’ झांतीपीलाही तिच्या मैत्रिणींनी विचारले, -“ अशा वाईट नवर्‍याशी कसा संसार करतेस, त्याला का सोडत नाहीस?’’ झांतीपी म्हणाली, -“ असा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पती मला कुठे मिळेल? मी दिवसातून 24 तास कितीही बोलले तरी तो हसत हसतच असतो. एकही शब्द तो उलट बोलत नाही. मला असा पती मिळाला, हे माझे पुण्यच आहे!’’

सुकरात ऐश्‍वर्य, संपत्ती मिळवायचे शिकला नव्हता. तो जगायचे कसे हे शिकला होता. तो हसत हसत जगायची कला शिकवत होता. आपल्या प्रांतात होऊन गेलेले नगेमारी तंदे हे घरोघरी जाऊन सर्वांना हसवायचे. “संपूर्ण जगचे ओझे वाहिल्यासारखे का गंभीर झाला आहात? थोडेसे ईश्‍वराची आराधना करत हसत हसत जगा!’’ असे ते मार्गदर्शन करायचे. हास्य हेच एक योग आहे. जगातील सर्व समस्यांना हास्य हेच दिव्यऔषधी यावर त्यांचा प्रचंड विश्‍वास होता. जीवनभर सर्वांना हसवत, स्वत: हसत, सदा प्रसन्नचित्त राहणारे नगेमारी तंदे यांचे जीवन हेच धर्मजीवन! असे सुंदर जीवन आपण कधी जगणार!
अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्‍वत:।नित्यं सन्निहितो मृत्यू: कर्तव्यो धर्मसंग्रह:॥
                                                     (सुभाषित मंजिरी)
हे शरीर अनित्य आहे. संपत्ती शाश्‍वत नाही. मृत्यू सतत जवळच असते. धर्ममार्गावर चालणे हेच आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य बनले आहे.
अंगवे भूमियागी लिंगवे बेळेयागीविश्‍वावेंब बित्तु बलिदु उंडु सुखियागिरबेकुकामभीम जीवधनदोडेय. 
वक्कलिग मुद्दण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीररुपी भूमीत आत्मविश्‍वासाचे बीज पेरुन लिंगांगाचे, ब्रह्मानंदाचे पीक घेऊन सदासुखी व्हायला हवे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे धर्मजीवन होय. कसल्याही संकटात सतत हसत प्रसन्नचित्ताने राहायचे. हेच हास्ययोग!!

Friday 3 March 2017

धर्मजीवन : पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामी यांची प्रवचने

 

विजयपूरचे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रवचनावर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वामीजी हे शिवशरण श्री अल्लमप्रभू यांच्या वचनसाहित्याचे भाष्यकार आहेत. त्यांच्या प्रवचनावर आधारित बहुतांश साहित्य हे कन्नड भाषेत आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांचे अनुवाद झाले आहे. अजुन मोठ्या प्रमाणातील साहित्य अनुवाद होणे बाकी आहे. त्यांच्या साहित्याचे सर्वाधिकार हे विजयपूरच्या ज्ञानयोग फाउंडेशनकडे आहेत. श्री स्वामीजींचे साहित्य मराठी भाषकांपर्यंतही पोहोचावे, या एकाच उद्देशाने त्यांचे साहित्य मराठीत ब्लाॅगवर उपलब्ध करुन देत आहे, यामागे कोणताही अन्य हेतू नाही. मात्र, कोणीही ज्ञानयोग फाउंडेशनच्या पूर्वपरवानगीशिवाय या साहित्याचा वापर करू नये. 

................................................................................................................................................................

२०१३ मध्ये बीदर जिल्ह्यातील औराद येथे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे आध्यात्मिक प्रवचन झाले. श्री गुरुदेवांच्या या प्रवचनाचे सारसंग्रह म्हणजे धर्मजीवन हा ग्रंथ. डाॅ. श्री श्रद्धानंद स्वामी यांनी याचे संपादन केले आहे. त्यातील पहिले प्रकरण. 

.....................................................................................................................................................................

शरणधर्म

धर्म हे परमशांतीचे साधन होय. धर्मामुळे अनेक महात्म्यांचे जीवन सुंदर झाले आहे. धर्माने जगाला शांतीचा सुगंध, संतोष, मकरंद प्रदान केला आहे. या जगात मानवनिर्मित धर्म एक, दोन नव्हे, शेकडो, हजारो आहेत. ते कालप्रवाहात काही काळ उन्नत बनून पुन्हा लुप्त होतात.  संपूर्ण जगात नैसर्गिक, खरा धर्म मात्र एकच आहे,  जो नसल्याने जीवन नीरस बनते, तो धर्म होय. सौंदर्य नसलेले फुल फुल नाही. सावली न देणारे झाड नाही. त्याच प्रकारे धर्माविना जीवन जीवन नाही. धर्म हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे जीवनवैभव वाढते. केवळ श्रीमंती - संपत्ती, शिक्षण – बुद्धी यामुळे जीवन समृद्ध होत नाही, ते धर्मामुळे समृद्ध होते. धर्म हे प्रत्येक वस्तूचे सारभूत तत्त्व आहे.
प्रकाश देणे हा दिव्याचा धर्म आहे. प्रवाहित होणे हा पाण्याचा धर्म आहे. फुल सौंदर्यामुळे फुल बनते. मनुष्य धर्मामुळे मनुष्य बनतो. पाहणे हा डोळ्यांचा धर्म आहे. चालणे हा पायांचा धर्म आहे. वाहणे हा वाऱ्याचा धर्म आहे. हा निसर्ग धर्म आहे. हा कोणीही स्थापन केलेला धर्म नाही. सर्व देशांमध्ये, सर्व काळात अस्तित्वात असलेला हा धर्म आहे. 'धम्मं शरणं गच्छामि' असे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी अशा नैसर्गिक धर्माला शरण जायला हवे. ते स्वीकारायला हवे. यालाच शरणधर्म म्हटले जाते.
घर कितीही मोठे असो, छोटे असो, त्यात प्रकाश देणारी एक छोटी पणती हवी. अंधार असलेले घर घर नाही. तसे श्रीमंत असो, गरीब असो त्याच्या अंतरंगातील महाल प्रकाशित करणारी धर्माची ज्योत हवी! अन्यथा तो मनुष्य नव्हे, पशू होय. एखाद्या वेळेस हृदयातील धर्माची ज्योत विझली तर मनुष्य युद्ध, कलह, हत्या, खोटारडेपणा, चोरी आदी अमानुष कृत्ये करतो. धर्मच सुंदर बाग फुलवू शकतो, तर बहरलेली बाग नासधूस करणारे धर्म नव्हे. जेव्हा मनुष्य या लोकांत आला तेव्हाच हा नैसर्गिक धर्मही आला. हाच सत्यधर्म अथवा सद्धर्म होय! सर्वांसाठी नैसर्गिक धर्म एकच आहे. यांच्यासाठी एक, त्यांच्यासाठी एक असा नैसर्गिक धर्म वेगवेगळा नाही. जेथे सत्य आहे,  तेथेच सौंदर्य,  शांती,  मांगल्य आहे. ‘सत्यं शिवं सुंदरम्’ हे सद्धर्माचे सद्लक्षण होय! आपल्या जीवनाच्या अंगणात या धर्माची फुले फुलावीत. केवळ बोलण्याने, विचाराने जीवनाला भव्यदिव्यता येणार नाही. आपल्या अंतरंगात सद्धर्माची ज्योत प्रकाशित झाल्यास आपले जीवन भव्यदिव्य बनेल.
दक्षिण भारतातील एक संत ईश्वरनामाचा महिमा गात भक्तिसुख अनुभवत होते. त्यांची भक्तिगीते ऐकून हजारो लोक धन्य व्हायचे! मात्र, त्या संतांच्या जवळच त्यांना न सहणारे चारजण होते.  कशाप्रकारेही ते त्यांचा अवमान करुन त्यांना तेथून हाकलून देण्याच्या प्रयत्नात होते. एके दिवशी मध्यरात्री त्यांनी जुनी फाटलेली पादत्राणे त्यांच्या घराच्या दरवाजाला बांधली आणि तेथेच ते लपून बसले. पहाटे झोपेतून उठून ते संत स्नानाला नदीवर जण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर पडले त्याच क्षणी त्यांच्या डोक्याला पादत्राणे लागली. ते पाहून लपून बसलेल्या लोकांना न मावणारा आनंद झाला आणि ते हसले. परंतु ते संत मात्र किंचितही विचलित झाले नाहीत; त्यांना रागही आला नाही.  त्याउलट त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली.
केचित ज्ञानावलंबिन: केचित ज्ञानावलंबिन:।
वयंतु हरिदासानां पादरक्षावलंबिन:।।

या जगात काहीजण ज्ञानमार्ग अवलंबतात. तर काहीजण कर्ममार्ग अवलंबतात. मात्र, आपण हरिदासांच्या पादुकांचाच अवलंब केला आहे! ही गोष्ट ऐकताच आपच्या चुकीची जाणीव झाल्याने ते चौघे नंतर त्यांच्या पायावर पडून क्षमा मागतात. आता त्या चौघांतही धर्माची ज्योत प्रकाशित झाली होती!
एका श्रीमंताला दोन धर्मपत्नी होत्या. पहिल्या पत्नीला एक मुलगा होता. दुसऱ्या पत्नीला एकही अपत्य झाले नव्हते. त्यामुळे तो श्रीमंत आणि शेजारीपाजारी पहिल्या पत्नीचेच कौतुक करायचे. दुसऱ्या पत्नीला हे सहन झाले नाही. काहीतरी करून त्या मुलाला संपवून टाकायचा तिने निर्धार केला. तिने तेथे मिठाई विक्रीसाठी येणाऱ्याला सांगितले - “ हे विष तुझ्या मिठाईत कालवून त्या मुलाला दिल्यास तुला हवे तेवढे धन देईन!” त्यावर मिठाई विक्रेता म्हणाला - “मी मिठाई विकणारा आहे, विष विकणारा नव्हे. आपणास शांती - समाधान न देणारे ते धन घेऊन मी काय करू, ते तुमच्याजवळच असूद्या!” त्या मिठाई विक्रेत्याची ही सुंदर गोष्ट ऐकून तिच्या मनातही धर्माची ज्योत प्रकाशित झाली. अज्ञानाचा अंधकार नष्ट झाला.  पहिलीच्या मुलालाच आपले मूल मानून त्याच्यावर प्रेम करू लागली. तिचे विशाल हृदय पाहून गावकरी पहिलीपेक्षा दुसरीचाच अधिक गौरव करू लागले. द्वेषाचा अंधकार संपून प्रेमाचा प्रकाश प्रदान करणारीच धर्मज्योती! हाच शरण धर्म!

 




Thursday 2 March 2017

मुजफ्फरनगरविषयी करुणा, काश्मिरी पंडितांविषयी का नाही?


 नाव : सर्वानंद कौल

स्थळ : शाली, अनंतनाग जिल्ह्यातील एक गाव

व्यवसाय : निवृत्त शिक्षक आणि काश्मिरी कवी

सर्वानंद कौल ‘प्रेमी’ म्हणून परिचित होते. जम्मू - काश्मिरच्या शिक्षण खात्यात 23 वर्षे सेवा बजावलेले कौल हे प्रथितयश काश्मिरी साहित्यिक होते. त्यांनी कवी रूपा भवानी आणि संत मिर्झा कक्र यांचे जीवनचरित्र लिहिले. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे काश्मिरी आणि उर्दूत अनुवाद केले. 1924 मध्ये जन्मलेले कौल हे महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभवित झाले होते आणि स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला होता. 1947 मध्ये धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली तरी त्यांची धर्मनिरपेक्षतेवर अढळ निष्ठा होती. 1953 मध्ये शेख अब्दुल्ला यांना झालेली अटक, 1963 मध्ये हजरत बाल मशिदीतून प्रेषित मोहम्मद यांचे पवित्र केस गायब, 1965 मध्ये पाकिस्तानचे आक्रमण, 1967 मधील पंडितांचे आंदोलन, 1968 ची अनंतनाग दंगल आदी घटनांच्या वेळी प्रेमींची लेखणी तलवारीसारखी तळपली होती.

1965 आणि 1971 च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तानने भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतंकवादी कारवाया सुरू केल्या. स्वातंत्र्यानंतर इस्लामी मूलतत्त्ववादाचा पहिला प्रयोग काश्मिरमध्ये केला गेला. काश्मिरी खोºयातील हिंदूंना वेचून ठार मारण्यास सुरूवात झाली. संपूर्ण काश्मिर खोºयातील हिंदू भयभीत झाले. जगण्यासाठी काश्मिर खोरे सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 19 जानेवारी 1990 पासून मशिदींवरील लाउडस्पीकरवरुन काश्मिर सोडून जाण्याची धमकी देण्यात येऊ लागली. तरीही धर्मनिरपेक्ष असलेल्या प्रेमी यांचा शेजारपाजारचे मुस्लिम आपले रक्षण करतील, यावर दृढ विश्वास होता. तो दिवस होता 29 एप्रिल 1990 चा. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून तीन बुरखाधारी आत घुसले. सर्व कुटुंबीयांना एका खोलीत जमण्यास सांगितले. घरातील मौल्यवान वस्तू, अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड, साड्या, शालू काढून द्यायला सांगितल्या. अंगावरील दागिनेही सोडले नाहीत. सर्व वस्तू एका सूटकेसमध्ये भरायला लावून ते घेऊन सुखरुपपणे बाहेर सोडण्याचा इशारा प्रेमी यांना केला. कुटुंबीय भयभीत झाले. त्यांना ते म्हणाले, ‘त्यांना कोणताही त्रास देणार नाही, बाहेर गेल्यावर त्यांना परत पाठवू.’ ते ऐकून प्रेमी यांचा 27 वर्षांचा मुलगा विरेंदर कौल हाही त्यांच्यासोबत गेला. दोन दिवसांनंतरही पिता - पुत्र दोघेही घरी परतले नाहीत.

दोन दिवसांनंतर हृदयद्रावक स्थितीत दोन मृतदेह सापडले! प्रेमी दररोज सकाळी देवदर्शनानंतर कपाळावर टिळा लावायचे. अतिरेक्यांनी धारदार शस्त्राने तो भागच चिरला होता. शरीरावरील सर्व भागांवर सिगारेटचे चटके दिले होते. पिता - पुत्र दोघांचेही डोळे फोडून काढले होते. हात - पायही तोडले होते. हुकूमशहा हिटलर वांशिक हत्याकांडापेक्षाही अमानवीयतेने प्रेमी आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली.

तेज कृष्णन राजदान, अशोक कुमार काझी, नवीन सप्रू, पी. एन. कौल, बी. के. गंजू, दीपक गंजू, भूषण लाल रैना, दीननाथ मुजू, गिरिजा टिकू, अशोक सूरी, प्रो. के. एल. गंजू, चुनी लाल शल्ला अशा एकेकाचा मृत्यू एकेक करुणाजनक गोष्ट सांगेल. बॉलिवूड अभिनेता संजय सूरीला ओळखता ना? तोही काश्मिरीच. त्यांच्या वडिलांची त्यांच्या डोळ््यादेखत हत्या झाली. यासंदर्भातील त्यांची मुलाखत वाचल्यास मन विदीर्ण होऊन जाते. काश्मिरमधून हुसकावून लावले गेलेले, भीतीने काश्मिर सोडलेल्यांची संख्या सुमारे सहा लाख असेल तर हत्या झालेल्यांची, अत्याचारांमुळे घाबरुन धर्मांतरण केलेल्यांची संख्या किती? काश्मिरमध्ये हत्या झालेल्या पंडितांची देण्याची मागणी माहिती अधिकारात करण्यात आली. मात्र जम्मू काश्मिर शासनाने या मागणीचा अर्ज फेटाळला. हा अर्ज फेटाळण्यामागे भीती कशाची ? हिशेब दिल्यास इस्लामी मूलतत्त्ववादामुळे मृत्यूमुखी पडलेल्या असंख्य हिंदूंची दुर्दशा जगासमारे येईल, हीच भीती नव्हे काय? 790 मुस्लिमांचा बळी गेलेल्या गुजारात दंगलीविषयी सगळेच बोलतात, मात्र, कल्पनाही करू शकणार नाही, मोजदादही नाही इतक्या पंडितांची, हिंदूंची बळी घेतलेल्या आणि त्यांचे जगणेच अशक्यप्राय करुन टाकलेल्या काश्मिरी इस्लामी दहशतवादाविषयी कितीजण बोलातात बरे? गुजरात दंगलीकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी, हिंदू किती क्रूर आहेत हे दाखवण्यासाठी ‘फायन सोल्यूशन’, ‘फिराक’, ‘पर्झानिया’ आदी इंग्रजी, हिंदी चित्रपट तयार करण्यात आले. त्यांना राष्टÑीय पारितोषिकही देण्यात आले. मल्याळममध्ये ‘कथावशेषन’, ‘विलपांगळक्कपूरम’, ‘भूमियडे अवकाशीकुल’ आदी चित्रपट आले. चेतन भगत यांच्या ‘थ्री स्टेट्स’ व आधारित ‘काई पो च्ो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला. अनावश्यकरित्या या चित्रपटात गुजरातची घटना घुसडण्यात आली. मात्र, काश्मिरी पंडितांविषयी बाहेरचा कोणी येऊन चित्रपट बनवलाय, याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय का, हे सांगा? तेवढेच कशाला काश्मिरीच असलेल्या पत्रकार राहुल पंडीत यांनी गतवर्षी ल्ििहलेल्या ‘अवर मून हॅज ब््लड क्लाट्स’ या पुस्तकाविषयी एकाही चॅनलवर एखादी छोटीही चर्चा झाली नाही! आतापर्यंत गुजरात दंगलीशी संबंधित सुमारे 600 लोकांना शिक्षा झाली आहे. परंतु काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडप्रकरणी एकही ‘एफआयआर’ दाखल झाला नाही, म्हटल्यास विश्वास ठेवाल? गुजरात दंगलीचे भांडवल करुन मुख्यमंत्री मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारावा यासाठी प्रयत्न झाले. मात्र, सहा काश्मिरी पंडितांना मातृभूमीतच निर्वासिताचे जगणे जगण्यास बाध्य केलेल्या, हजारो काश्मिरी पंडितांच्या हत्येकडे डोळेझाक करणाºया   तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात आवाज उठवणारा एखादा तरी माणूस दाखवा पाहू? साडेतीन हजार शीखांच्या हत्याकांडाचे नेतृत्व करणारे आणि काश्मिरी लोकांच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्या राजीव गांधींना कोणी जाब विचारलाय? त्यांनी जे केले ती काय सामान्य चूक होती काय?

प्रिय श्री राजीव गांधी,

मी तुम्हाला आठवण करुन द्यावी काय, सांगा? काश्मिरमधील अशांततेविषयी मी 1998 च्या सुरुवातीला तुम्हाला सावध केलो होतो. मात्र, तुम्हाला आणि तुमच्या भोवतालच्या मंडळींकडे तो संदेश पाहायला वेळ आणि इच्छा नव्हती. मी दिलेल्या इशाºयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ऐतिहासिक पाप करण्यासारखे असल्याचे त्यात नमूद केले होते. भयानक शस्त्रास्त्रे आणली जात आहेत आणि आखणी येतील, हे तुम्हाला कळवले होते. तातडीने कार्यवाही न केल्यास स्थिती गंभीर बनेल, हे एप्रिल 1989 मध्येच लिहिले होते. तुमचे मौन संभ्रम निर्माण करीत आहे. आश्चर्य म्हणजे आज काश्मिरच्या स्थितीला मीच जबाबदार असल्याचे तुमच्या भोवतालचे मणिशंकर अय्यर, एसकेपी साळवे, शिवशंकर म्हणताहेत. तुमचे आणखी एक शिष्य फारुख अब्दुल्ला यांनी सोडलेले 70 कुख्यात अतिरेकी हे सारे घडवत असताना त्यालाही राज्यपाल म्हणून मलाच जबाबदार धरणार का? 19 जानेवारी 1990 पासून जम्मू काश्मिरमध्ये राष्टÑपती राजवट लागून होण्यापूर्वीच मानसिकरित्या भारताने शरणागती पत्करली होती. 1600 हिंसाचाराच्या घटना घडल्या, 351 बाँबस्फोट झाले, 72 दंगली झाल्या. मात्र, तुम्ही त्याची कधीच चिंता केली नाही. Þ

जगमोहन, 21 एप्रिल 1990

दोनवेळा जम्मू काश्मिरचे राज्यपाल राहिलेल्या जगमोहन यांनी त्यावेळी घडलेल्या घटना, परिस्थितीचा आपल्या ‘फ्रोजन टर्ब्युलन्स इन काश्मिर’ या पुस्तकात सविस्तर वर्णन केले आहे. एवढे झाले तरी त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेले राजीव गांधी असोत की मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि काश्मिरींनी हुसकावून लावलेले मुलतत्त्ववादी यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. आणखी एक विशेष गोष्ट पाहा : हिंदू बहुसंख्याक असलेला जम्मू आकाराने काश्मिरपेक्षा मोठा आहे. मात्र, काश्मिरमध्ये विधानसभेचे मतदारसंघ जास्त आहेत. हा विषय उचलण्याचा कारण म्हणजे, भारत लोकशाही देश असल्याची बढाई मारतात ना, मग काश्मिरमध्ये एखादा हिंदू मुख्यमंत्री करा पाहू? महान राष्टÑवादी आणि हिंदूरक्षक शिवाजी महाराजांच्या महाराष्टÑात अब्दुल रहमान अंतुले हे मुस्लिम मुख्यमंत्री होऊ शकतात, हिंदूच बहुसंख्याक असलेल्या केरळमध्ये ए. के. एन्टोनी, ओमान चंडी हे ख्रिश्चन मुख्यमंत्री झाले तरी कोणीही विचार करत नाही. आंध्रप्रदेशात बहुसंख्य असलेला हिंदू समाज ख्रिश्चन असलेल्या येसूपद सॅम्युअल राजशेखर रेड्डीला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतो. तसेच त्यांचा मुलगा जगमोहन राज्यात लोकप्रिय नेता बनतो. हिंदू बहुसंख्याक असलेल्या मतदारसंघातूनच मुस्लिम आमदार, खासदार म्हणून निवडून येतात. मग काश्मिरमध्ये एखादाही हिंदू मुख्यमंत्री होणे शक्य नाही? या मानसिकतेमुळेच आमच्या पंडितांची हत्या होत आहे. त्यांच्यावर मायभूमीतच निर्वासिताचे जिणे जगण्याची पाळी आली आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चार महिन्यांपूर्वी गाव सोडावे लागलेल्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) मधील सहा हजार निर्वासितांविषयी आपले टीव्ही चॅनल्स दररोज घोषा लावत आहेत. तेथील लोक आणि मुलांची करुणाजनक स्थिती यावर विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहेत. निश्चितच हे चुकीचे नाही. परंतु गेल्या 25 वर्षांपासून दिल्ली आणि जम्मूमधील निर्वासितांच्या छावणीमध्ये अत्यंत अमानवीय स्थितीत जीवन जगणाºया चार लाख काश्मिरी पंडितांची दुर्दशा आमच्या सदसदविवेकबुद्धीला डाचत नाही? काश्मिरी पंडितांची स्थिती पाहून आपल्या माध्यमातील विद्वानांचे करुणामयी हृदय का द्रवत नाही? अशातच प्रशांत भूषण यासारखे महाशय काश्मिरमध्ये जनमत आजमावयाला हवे म्हणजे काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकावे म्हणताहेत. या वक्तव्याचा प्रत्येक राष्टÑवादी नागरिकाने निषेध करायला हवा. मात्र आपले केजरीवाल ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून सोयीस्कर भूमिका घेत आहेत. अशा प्रकारची मंडळी आपल्यावर राज्य करत असताना काश्मिरी पंडितांना न्याय मिळणे शक्य आहे? जनमत म्हणजे सहा लाख काश्मिरी पंडितांचे मत अजमावयाला हवे, हे प्रशांत भूषण सारख्यांना कळत नाही का? भारतातील प्रतिष्ठित गुप्तचर संस्था ‘रॉ’ची स्थापना केलेले आर. एस. काओ हेही काश्मिरी पंडितच. त्यांचा 2002 मध्ये मृत्यू झाला. तोपर्यंत त्यांनी पंडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याला संवेदनाहीन नेतृत्व लाभल्याने काही करणे शक्य आहे का?

आता हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे हिंदूंना काश्मिर खोरे सोडून जाण्यासाठी मशिदीवरील लाऊस्पीकरवरुन धमकावण्यास 19 जानेवारी 1990 पासून सुरुवात झाली. त्याला 19 जानेवारी रोजी 24 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी हा दिवस ‘सामुदायिक हत्याकांड’ दिवस म्हणून साजरा केला जातो. अशाप्रकारचा दिवस साजरा करणे, 24 वर्षांनंतरही पंडितांना न्याय न देऊ शकणे, हे या देशाची शोकांतिका आणि हिंदूंच्या निष्क्रियतेचे द्योतकच नव्हे तर आणखी काय सांगा?

लेखक : प्रतापसिंह

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

साभार : कन्नडप्रभा

ँ३३स्र://्र‘ं२ँे्र१.ल्ली३/ं३१ङ्मू्र३्री२/11.ँ३े’

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...