धर्म हे आपल्या जीवनाला समृध्द, संतृप्त करणारे माध्यम आहे. आपले तन, मन, बुद्धी, भाव हे सर्व धर्ममय व्हायला हवेत, तेव्हा आपले जीवन सुंदर बनेल. आपल्या जगातील सर्व समस्यांना धर्माचे अभाव हेच कारण आहे. आपले वागणे - बोलणे, आचार - विचार, भाव - बुद्धी हे सर्व योग्य आणि सुंदर असावेत. हेच धर्म होय. अन्यथा ते अधर्म होय. त्यामुळे पारिवारिक आरोग्य, सामाजिक सौहार्द बिघडते. युद्ध, कलह, कोलाहल निर्माण होते. एकूणच या जगात सर्व संकटांना धर्माचे अभाव हेच कारण होय. आपले जीवन धर्ममय बनल्यास जगातील सर्व समस्यांचे आपोआप परिहार होईल.
एखादे सुंदर कापड तयार करावयाचे झाल्यास त्यातले सर्व ताणे - बाणे चांगले असायला हवेत. ताणे म्हणजे उभे धागे, बाणे म्हणजे आडवे धागे. प्रत्येक ताण्या - बाण्याचे वर्ण, गात्र व भूमिका सर्व चांगले असायला हवे. एखादे धागे चांगले नसल्यास कापड आपले मूल्य, सौंदर्य गमावून बसेल. त्याच प्रकारे आपल्या जीवनाचे कापडही चांगले व्हावयाचे असल्यास प्रतिक्षणी आपले वागणे - बोलणे सर्व चांगले असायला हवे. जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. एकदम दिवस, महिना, वर्ष बनून जीवन आपल्याकडे येत नाही. एकेक क्षणाने ते आपल्याकडे येते. या क्षणीचे आपले वागणे - बोलणे यावरच आपले संपूर्ण जीवन अवलंबून आहे. कितीही मोठे घर असले तरी त्याची सुरुवात एका विटेनीच सुरुवात होते. एक एक वीट जुळूनच महाल बनते. एखादे वीट अथवा दगड चांगले नसल्यास त्या घराच्या सौंदर्याला बाधा आणते. आपले प्रत्येक पाऊल आपल्या जीवनाला आकार देते.
एखादे लहान मूल खेळल्यास, बोलल्यास, पळाल्यास, उभा राहिल्यास, पडल्यास, हसल्यास, रडल्यास, शेवटी गप्प झोपल्यासही ते सर्वांना आवडते. त्याचे चालणे, बोलणे तेवढे पवित्र, परिशुद्ध असते. आपलेही वागणे - बोलणे त्या बाळासारखे झाल्यास केवळ मानवजातच नव्हे तर साक्षात् महादेवालाही ते आवडेल.
कंड भक्तरिगे कै मुगिवातने भक्त,मृदु वचनवे सकल जपंगळय्या,मृदु वचनवे सकल तपंगळय्या,सदुविनयवे सदाशिवन वलुमेयय्या,कूडलसंगय्यनंतल्लदोल्लनय्या
मराठी : भक्तासी बघुनी जोडी जो हात, तोच भक्त जाण या जगी!मृदुवाणितचि असे सारे जप!मृदुवाणितचि असे सारे तप!सद्विनयाने सदाशिवाची होई करुणा,कूडलसंगमेशासी न रुचे याविना!जप, तप म्हणजे केवळ अरण्यात जाऊन, कंदमुळे खाऊन करावयाचे व्रताचरण नव्हे. आपले दैनंदिन वागणे - बोलणे, आचार - विचार, भाव - बुद्धी परिशुद्ध, पवित्र व्हायला हवे. विनयशील असावे. याच्याहून श्रेष्ठ जप - तप, रीती -नीती, योग - धर्म कोणते आहे? असे मृदुमधुर जीवन जगणारेच सर्वांना प्रिय असलेले संत - शरण होत.
सुकरात एक महान तत्त्वज्ञानी होता. ती अशी मोठी व्यक्ती होती की, संपूर्ण युरोप त्याला कधीही विसरणे शक्य नाही. तेथील युवक त्याचे मार्गदर्शन ऐकायला धडपडत असत. मात्र, सुकरातचे आपल्या घराकडे, संसाराकडे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी झांतीपी त्याला पदोपदी बोलायची. सुकरात मात्र हसत हसतच असायचा. एका दिवशीही तो पत्नीला उलट बोलत नव्हता. एके दिवशी मित्रांनी विचारले, - “असल्या भांडखोर पत्नीशी काय संसार करतो, तिला सोडत का नाहीस?’’ सुकरात म्हणाला, -“मला तत्त्वज्ञानी बनवणारी तीच आहे.’’ झांतीपीलाही तिच्या मैत्रिणींनी विचारले, -“ अशा वाईट नवर्याशी कसा संसार करतेस, त्याला का सोडत नाहीस?’’ झांतीपी म्हणाली, -“ असा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पती मला कुठे मिळेल? मी दिवसातून 24 तास कितीही बोलले तरी तो हसत हसतच असतो. एकही शब्द तो उलट बोलत नाही. मला असा पती मिळाला, हे माझे पुण्यच आहे!’’
सुकरात ऐश्वर्य, संपत्ती मिळवायचे शिकला नव्हता. तो जगायचे कसे हे शिकला होता. तो हसत हसत जगायची कला शिकवत होता. आपल्या प्रांतात होऊन गेलेले नगेमारी तंदे हे घरोघरी जाऊन सर्वांना हसवायचे. “संपूर्ण जगचे ओझे वाहिल्यासारखे का गंभीर झाला आहात? थोडेसे ईश्वराची आराधना करत हसत हसत जगा!’’ असे ते मार्गदर्शन करायचे. हास्य हेच एक योग आहे. जगातील सर्व समस्यांना हास्य हेच दिव्यऔषधी यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. जीवनभर सर्वांना हसवत, स्वत: हसत, सदा प्रसन्नचित्त राहणारे नगेमारी तंदे यांचे जीवन हेच धर्मजीवन! असे सुंदर जीवन आपण कधी जगणार!
अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वत:।नित्यं सन्निहितो मृत्यू: कर्तव्यो धर्मसंग्रह:॥(सुभाषित मंजिरी)
हे शरीर अनित्य आहे. संपत्ती शाश्वत नाही. मृत्यू सतत जवळच असते. धर्ममार्गावर चालणे हेच आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य बनले आहे.
अंगवे भूमियागी लिंगवे बेळेयागीविश्वावेंब बित्तु बलिदु उंडु सुखियागिरबेकुकामभीम जीवधनदोडेय.वक्कलिग मुद्दण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीररुपी भूमीत आत्मविश्वासाचे बीज पेरुन लिंगांगाचे, ब्रह्मानंदाचे पीक घेऊन सदासुखी व्हायला हवे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे धर्मजीवन होय. कसल्याही संकटात सतत हसत प्रसन्नचित्ताने राहायचे. हेच हास्ययोग!!
No comments:
Post a Comment