नाव : सर्वानंद कौल
स्थळ : शाली, अनंतनाग जिल्ह्यातील एक गाव
व्यवसाय : निवृत्त शिक्षक आणि काश्मिरी कवी
सर्वानंद कौल ‘प्रेमी’ म्हणून परिचित होते. जम्मू - काश्मिरच्या शिक्षण खात्यात 23 वर्षे सेवा बजावलेले कौल हे प्रथितयश काश्मिरी साहित्यिक होते. त्यांनी कवी रूपा भवानी आणि संत मिर्झा कक्र यांचे जीवनचरित्र लिहिले. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे काश्मिरी आणि उर्दूत अनुवाद केले. 1924 मध्ये जन्मलेले कौल हे महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभवित झाले होते आणि स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला होता. 1947 मध्ये धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली तरी त्यांची धर्मनिरपेक्षतेवर अढळ निष्ठा होती. 1953 मध्ये शेख अब्दुल्ला यांना झालेली अटक, 1963 मध्ये हजरत बाल मशिदीतून प्रेषित मोहम्मद यांचे पवित्र केस गायब, 1965 मध्ये पाकिस्तानचे आक्रमण, 1967 मधील पंडितांचे आंदोलन, 1968 ची अनंतनाग दंगल आदी घटनांच्या वेळी प्रेमींची लेखणी तलवारीसारखी तळपली होती.
1965 आणि 1971 च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तानने भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतंकवादी कारवाया सुरू केल्या. स्वातंत्र्यानंतर इस्लामी मूलतत्त्ववादाचा पहिला प्रयोग काश्मिरमध्ये केला गेला. काश्मिरी खोºयातील हिंदूंना वेचून ठार मारण्यास सुरूवात झाली. संपूर्ण काश्मिर खोºयातील हिंदू भयभीत झाले. जगण्यासाठी काश्मिर खोरे सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 19 जानेवारी 1990 पासून मशिदींवरील लाउडस्पीकरवरुन काश्मिर सोडून जाण्याची धमकी देण्यात येऊ लागली. तरीही धर्मनिरपेक्ष असलेल्या प्रेमी यांचा शेजारपाजारचे मुस्लिम आपले रक्षण करतील, यावर दृढ विश्वास होता. तो दिवस होता 29 एप्रिल 1990 चा. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून तीन बुरखाधारी आत घुसले. सर्व कुटुंबीयांना एका खोलीत जमण्यास सांगितले. घरातील मौल्यवान वस्तू, अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड, साड्या, शालू काढून द्यायला सांगितल्या. अंगावरील दागिनेही सोडले नाहीत. सर्व वस्तू एका सूटकेसमध्ये भरायला लावून ते घेऊन सुखरुपपणे बाहेर सोडण्याचा इशारा प्रेमी यांना केला. कुटुंबीय भयभीत झाले. त्यांना ते म्हणाले, ‘त्यांना कोणताही त्रास देणार नाही, बाहेर गेल्यावर त्यांना परत पाठवू.’ ते ऐकून प्रेमी यांचा 27 वर्षांचा मुलगा विरेंदर कौल हाही त्यांच्यासोबत गेला. दोन दिवसांनंतरही पिता - पुत्र दोघेही घरी परतले नाहीत.
दोन दिवसांनंतर हृदयद्रावक स्थितीत दोन मृतदेह सापडले! प्रेमी दररोज सकाळी देवदर्शनानंतर कपाळावर टिळा लावायचे. अतिरेक्यांनी धारदार शस्त्राने तो भागच चिरला होता. शरीरावरील सर्व भागांवर सिगारेटचे चटके दिले होते. पिता - पुत्र दोघांचेही डोळे फोडून काढले होते. हात - पायही तोडले होते. हुकूमशहा हिटलर वांशिक हत्याकांडापेक्षाही अमानवीयतेने प्रेमी आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली.
तेज कृष्णन राजदान, अशोक कुमार काझी, नवीन सप्रू, पी. एन. कौल, बी. के. गंजू, दीपक गंजू, भूषण लाल रैना, दीननाथ मुजू, गिरिजा टिकू, अशोक सूरी, प्रो. के. एल. गंजू, चुनी लाल शल्ला अशा एकेकाचा मृत्यू एकेक करुणाजनक गोष्ट सांगेल. बॉलिवूड अभिनेता संजय सूरीला ओळखता ना? तोही काश्मिरीच. त्यांच्या वडिलांची त्यांच्या डोळ््यादेखत हत्या झाली. यासंदर्भातील त्यांची मुलाखत वाचल्यास मन विदीर्ण होऊन जाते. काश्मिरमधून हुसकावून लावले गेलेले, भीतीने काश्मिर सोडलेल्यांची संख्या सुमारे सहा लाख असेल तर हत्या झालेल्यांची, अत्याचारांमुळे घाबरुन धर्मांतरण केलेल्यांची संख्या किती? काश्मिरमध्ये हत्या झालेल्या पंडितांची देण्याची मागणी माहिती अधिकारात करण्यात आली. मात्र जम्मू काश्मिर शासनाने या मागणीचा अर्ज फेटाळला. हा अर्ज फेटाळण्यामागे भीती कशाची ? हिशेब दिल्यास इस्लामी मूलतत्त्ववादामुळे मृत्यूमुखी पडलेल्या असंख्य हिंदूंची दुर्दशा जगासमारे येईल, हीच भीती नव्हे काय? 790 मुस्लिमांचा बळी गेलेल्या गुजारात दंगलीविषयी सगळेच बोलतात, मात्र, कल्पनाही करू शकणार नाही, मोजदादही नाही इतक्या पंडितांची, हिंदूंची बळी घेतलेल्या आणि त्यांचे जगणेच अशक्यप्राय करुन टाकलेल्या काश्मिरी इस्लामी दहशतवादाविषयी कितीजण बोलातात बरे? गुजरात दंगलीकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी, हिंदू किती क्रूर आहेत हे दाखवण्यासाठी ‘फायन सोल्यूशन’, ‘फिराक’, ‘पर्झानिया’ आदी इंग्रजी, हिंदी चित्रपट तयार करण्यात आले. त्यांना राष्टÑीय पारितोषिकही देण्यात आले. मल्याळममध्ये ‘कथावशेषन’, ‘विलपांगळक्कपूरम’, ‘भूमियडे अवकाशीकुल’ आदी चित्रपट आले. चेतन भगत यांच्या ‘थ्री स्टेट्स’ व आधारित ‘काई पो च्ो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला. अनावश्यकरित्या या चित्रपटात गुजरातची घटना घुसडण्यात आली. मात्र, काश्मिरी पंडितांविषयी बाहेरचा कोणी येऊन चित्रपट बनवलाय, याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय का, हे सांगा? तेवढेच कशाला काश्मिरीच असलेल्या पत्रकार राहुल पंडीत यांनी गतवर्षी ल्ििहलेल्या ‘अवर मून हॅज ब््लड क्लाट्स’ या पुस्तकाविषयी एकाही चॅनलवर एखादी छोटीही चर्चा झाली नाही! आतापर्यंत गुजरात दंगलीशी संबंधित सुमारे 600 लोकांना शिक्षा झाली आहे. परंतु काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडप्रकरणी एकही ‘एफआयआर’ दाखल झाला नाही, म्हटल्यास विश्वास ठेवाल? गुजरात दंगलीचे भांडवल करुन मुख्यमंत्री मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारावा यासाठी प्रयत्न झाले. मात्र, सहा काश्मिरी पंडितांना मातृभूमीतच निर्वासिताचे जगणे जगण्यास बाध्य केलेल्या, हजारो काश्मिरी पंडितांच्या हत्येकडे डोळेझाक करणाºया तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात आवाज उठवणारा एखादा तरी माणूस दाखवा पाहू? साडेतीन हजार शीखांच्या हत्याकांडाचे नेतृत्व करणारे आणि काश्मिरी लोकांच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्या राजीव गांधींना कोणी जाब विचारलाय? त्यांनी जे केले ती काय सामान्य चूक होती काय?
प्रिय श्री राजीव गांधी,
मी तुम्हाला आठवण करुन द्यावी काय, सांगा? काश्मिरमधील अशांततेविषयी मी 1998 च्या सुरुवातीला तुम्हाला सावध केलो होतो. मात्र, तुम्हाला आणि तुमच्या भोवतालच्या मंडळींकडे तो संदेश पाहायला वेळ आणि इच्छा नव्हती. मी दिलेल्या इशाºयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ऐतिहासिक पाप करण्यासारखे असल्याचे त्यात नमूद केले होते. भयानक शस्त्रास्त्रे आणली जात आहेत आणि आखणी येतील, हे तुम्हाला कळवले होते. तातडीने कार्यवाही न केल्यास स्थिती गंभीर बनेल, हे एप्रिल 1989 मध्येच लिहिले होते. तुमचे मौन संभ्रम निर्माण करीत आहे. आश्चर्य म्हणजे आज काश्मिरच्या स्थितीला मीच जबाबदार असल्याचे तुमच्या भोवतालचे मणिशंकर अय्यर, एसकेपी साळवे, शिवशंकर म्हणताहेत. तुमचे आणखी एक शिष्य फारुख अब्दुल्ला यांनी सोडलेले 70 कुख्यात अतिरेकी हे सारे घडवत असताना त्यालाही राज्यपाल म्हणून मलाच जबाबदार धरणार का? 19 जानेवारी 1990 पासून जम्मू काश्मिरमध्ये राष्टÑपती राजवट लागून होण्यापूर्वीच मानसिकरित्या भारताने शरणागती पत्करली होती. 1600 हिंसाचाराच्या घटना घडल्या, 351 बाँबस्फोट झाले, 72 दंगली झाल्या. मात्र, तुम्ही त्याची कधीच चिंता केली नाही. Þ
जगमोहन, 21 एप्रिल 1990
दोनवेळा जम्मू काश्मिरचे राज्यपाल राहिलेल्या जगमोहन यांनी त्यावेळी घडलेल्या घटना, परिस्थितीचा आपल्या ‘फ्रोजन टर्ब्युलन्स इन काश्मिर’ या पुस्तकात सविस्तर वर्णन केले आहे. एवढे झाले तरी त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेले राजीव गांधी असोत की मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि काश्मिरींनी हुसकावून लावलेले मुलतत्त्ववादी यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. आणखी एक विशेष गोष्ट पाहा : हिंदू बहुसंख्याक असलेला जम्मू आकाराने काश्मिरपेक्षा मोठा आहे. मात्र, काश्मिरमध्ये विधानसभेचे मतदारसंघ जास्त आहेत. हा विषय उचलण्याचा कारण म्हणजे, भारत लोकशाही देश असल्याची बढाई मारतात ना, मग काश्मिरमध्ये एखादा हिंदू मुख्यमंत्री करा पाहू? महान राष्टÑवादी आणि हिंदूरक्षक शिवाजी महाराजांच्या महाराष्टÑात अब्दुल रहमान अंतुले हे मुस्लिम मुख्यमंत्री होऊ शकतात, हिंदूच बहुसंख्याक असलेल्या केरळमध्ये ए. के. एन्टोनी, ओमान चंडी हे ख्रिश्चन मुख्यमंत्री झाले तरी कोणीही विचार करत नाही. आंध्रप्रदेशात बहुसंख्य असलेला हिंदू समाज ख्रिश्चन असलेल्या येसूपद सॅम्युअल राजशेखर रेड्डीला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतो. तसेच त्यांचा मुलगा जगमोहन राज्यात लोकप्रिय नेता बनतो. हिंदू बहुसंख्याक असलेल्या मतदारसंघातूनच मुस्लिम आमदार, खासदार म्हणून निवडून येतात. मग काश्मिरमध्ये एखादाही हिंदू मुख्यमंत्री होणे शक्य नाही? या मानसिकतेमुळेच आमच्या पंडितांची हत्या होत आहे. त्यांच्यावर मायभूमीतच निर्वासिताचे जिणे जगण्याची पाळी आली आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चार महिन्यांपूर्वी गाव सोडावे लागलेल्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) मधील सहा हजार निर्वासितांविषयी आपले टीव्ही चॅनल्स दररोज घोषा लावत आहेत. तेथील लोक आणि मुलांची करुणाजनक स्थिती यावर विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहेत. निश्चितच हे चुकीचे नाही. परंतु गेल्या 25 वर्षांपासून दिल्ली आणि जम्मूमधील निर्वासितांच्या छावणीमध्ये अत्यंत अमानवीय स्थितीत जीवन जगणाºया चार लाख काश्मिरी पंडितांची दुर्दशा आमच्या सदसदविवेकबुद्धीला डाचत नाही? काश्मिरी पंडितांची स्थिती पाहून आपल्या माध्यमातील विद्वानांचे करुणामयी हृदय का द्रवत नाही? अशातच प्रशांत भूषण यासारखे महाशय काश्मिरमध्ये जनमत आजमावयाला हवे म्हणजे काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकावे म्हणताहेत. या वक्तव्याचा प्रत्येक राष्टÑवादी नागरिकाने निषेध करायला हवा. मात्र आपले केजरीवाल ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून सोयीस्कर भूमिका घेत आहेत. अशा प्रकारची मंडळी आपल्यावर राज्य करत असताना काश्मिरी पंडितांना न्याय मिळणे शक्य आहे? जनमत म्हणजे सहा लाख काश्मिरी पंडितांचे मत अजमावयाला हवे, हे प्रशांत भूषण सारख्यांना कळत नाही का? भारतातील प्रतिष्ठित गुप्तचर संस्था ‘रॉ’ची स्थापना केलेले आर. एस. काओ हेही काश्मिरी पंडितच. त्यांचा 2002 मध्ये मृत्यू झाला. तोपर्यंत त्यांनी पंडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याला संवेदनाहीन नेतृत्व लाभल्याने काही करणे शक्य आहे का?
आता हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे हिंदूंना काश्मिर खोरे सोडून जाण्यासाठी मशिदीवरील लाऊस्पीकरवरुन धमकावण्यास 19 जानेवारी 1990 पासून सुरुवात झाली. त्याला 19 जानेवारी रोजी 24 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी हा दिवस ‘सामुदायिक हत्याकांड’ दिवस म्हणून साजरा केला जातो. अशाप्रकारचा दिवस साजरा करणे, 24 वर्षांनंतरही पंडितांना न्याय न देऊ शकणे, हे या देशाची शोकांतिका आणि हिंदूंच्या निष्क्रियतेचे द्योतकच नव्हे तर आणखी काय सांगा?
लेखक : प्रतापसिंह
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
साभार : कन्नडप्रभा
ँ३३स्र://्र‘ं२ँे्र१.ल्ली३/ं३१ङ्मू्र३्री२/11.ँ३े’
No comments:
Post a Comment