Friday, 24 February 2017

संत साहित्याचे अभ्यासक : दा. का. थावरे



माझ्या शालेय आणि पुढे महाविद्यालयीन जीवनातदैनिक संचारमधीलनौबतआणिचिंतनया दोन सदरांचा माझ्यावर प्रभाव राहिला. दर गुरुवारी प्रसिद्ध होणारे ना. . कुलकर्णी यांच्यानौबतने माझ्यात वैचारिक स्पष्टता निर्माण केली. तरचिंतनहे त्याकाळात माझ्यासह अनेकांचेस्वाध्यायच बनले होते. नित्य नवे अशा या  दैनंदिन सदरामुळे धार्मिक, आध्यात्मिक आणि संत साहित्यविषयक जाणिवा जागृत केल्या. सलग साडे एकोणीस वर्षे हे सदर चालवणारे सत्पुरुष आहेत संत साहित्याचे अभ्यासक श्री. दा. का. थावरे. वयाच्या 83 व्या वर्षांपर्यंत संत साहित्याची सेवा करणाऱ्या या सत्पुरुषाशिवाय केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील संत साहित्याचा धांडोळा घेता येणार नाही, इतके मोलाचे व अपूर्व योगदान त्यांनी संत साहित्यात दिले आहे.
अद्भुत व गौरवशाली परंपरा
एखाद्या कुटुंबात एखादी परंपरा अखंडितपणे तीही अनेक पिढ्या जोपासली जाईल, हे दुर्मिळच. मात्र, थावरे कुटुंबाच्या सोळा पिढ्यांनी संत साहित्य सेवा व भगवद्भक्तीची अखंड परंपरा जोपासली आहे. श्री. दा. का. तथा भाऊ थावरे हे ज्ञानेश्वरीचे लेखकू श्री सच्चिदानंदबाबांचे सोळावे वंशज. श्री सच्चिदानंद बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी चितेवरुन उठवून स्वत:चे लेखकू केलेत्यामुळे ग्रंथराजज्ञानेश्वरीआज आपणाला उपलब्ध झाला आहे.
समृद्ध आध्यात्मिक वारसा 
थावरे कुटुंब मूळचे श्री क्षेत्र नेवासे (मोहिनीराजाचे). या गावचे कुलकर्णी असेलेले सच्चिदानंदबाबा हे कुलकर्णी होते. बालपणापासूनच प्रकृतीने अशक्त असलेल्या सच्चिदानंदबाबांचे क्षयरोगामुळे अकाली निधन झाले. दरम्यानत्यांची पत्नी सौदामिनीने नवस सायास केले. उपास तपास केले. कुलदैवत जगदंबा, ग्रामदैवत मोहिनीराजाला साकडे घातले, परंतु आजारात उतार पडला नाही. शेवटी सच्चिदानंदबाबांचा मृत्यू झाला. सौदामिनीने सती जाण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्कारावेळी सौदामिनीचे लक्ष जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली विसावलेल्या चार साधू पुरुषांकडे गेले. तिने तिथे जाऊन ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग दंडवत घालून अश्रू ढाळू लागली. भक्त करुणाकर ज्ञानदेवानेअखंड सौभाग्यवती भवअसा आशीर्वाद दिला. त्यावर सती सौदामिनी म्हणाली, हे महासाधो, माझ्या पतीचे निधन झाले आहे. मी त्यांच्यासमवेत सहगमन करणार आहे. आपला आशीर्वाद पुढील जन्मी जरी फळाला आली तरी मी ती आपली कृपाच समजेन.’ ते ऐकून श्री ज्ञानेश्वर तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ गेले आणि म्हणाले, ‘काय, सत् चित् आनंदयाचा कोणी मृत्यू कोणी कधी ऐकला आहे काय? सच्चिदानंद हे सर्वोपाधीरहित आहेत. त्यास मृत्यू कसा येईल?’ तसेच ज्ञानेश्व ?माऊलीने सच्चिदानंदांच्या अंगावरुन हात फिरवला आणि काय आश्चर्य! श्री सच्चिदानंद झोपेतून जागा व्हावा इतक्या सहजगतेने जिवंत होऊन उठून उभा राहिला. सौदामिनीच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने ज्ञानेश्वरांच्या चरणी लोळण घेतली. तेव्हा  ज्ञानेश्र म्हणाले, ‘हे सुभिगे, तुझी पूर्व पुण्याई थोर म्हणूनच तुझा पती जिवंत झाला. भविष्यात सच्चिदानंदांचे हातून मोठे कार्य होणार आहे. तू निश्चिंत अस.’ पुढे श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना राठी भाषेत गीता भाष्य लिहिण्याची आज्ञा केली. सच्चिदानंद बाबा हे मूळचे कुलकर्णी. त्यांचे अक्षर मोत्यासारखे. त्यांनी ज्ञानेश्वर कथन करतील ते भाष्य ग्रथित करावे असे ठरले. गुरू आज्ञेनुसार श्री ज्ञानेश्वरांनी या ठिकाणच्या महादेव मंदिरात निरुपणास सुरुवात केली. ज्ञानदेवांनी हात जोडून ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जयजय स्वसंवेद्या। आत्मरुपा॥ वेदांनाही ज्याच्या खऱ्या स्वरुपाचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडले त्या ॐकार स्वरुपी  परमात्म्याला वंदन करुन श्री ज्ञानदेव ओव्यामागून ओव्या सांगू लागले आणि सच्चिदानंदबाबांनी अमृतातेही पैजा जिंके अशा मराठीतील या अमृतवाणीचे लेखन केले.
संत साहित्य लेखनाची परंपरा
 त्यानंतरही थावरे कुटुंबातील संत साहित्य सेवा अविरतपणे पिढ्यान्पिढ्या सुरू राहिली. दा. का. तथा भाऊ थावरे यांचे वडील श्री काशिनाथपंत थावरे गुरुजी हे तर ज्ञानेश्वरीचे पाईकच होते. त्यांनाही ज्ञानेश्वरीची संपूर्ण प्रत नकलून काढण्याचा आदेश झाला. त्यानुसार एक जुनी प्रत घेऊन ते नेवासे येथे गेले आणि नवी प्रत तयार करू लागले. तेव्हा जुनी प्रत त्यांच्या हातून गळून पडली. श्री ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून थावरे यांचे पूर्वज सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबातूनच ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकू येऊ लागल्या आणि त्यावरुन त्यांनी नवीन प्रत तयार केली. हे सारे पाहता महाभारतकार महर्षी व्यास आणि त्यांचे लेखक श्री गणेशाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे श्री धुंडा महाराज देगलूरकर यांच्या श्री ज्ञानेश्वरीवरील निरुपणाचे लेखन दा. का. तथा भाऊ थावरे यांनी केले. थावरे कुटुंबात सच्चिदानंदबाबा यांच्यापासून  ज्ञानेश्वरी लेखनाने सुरू झालेली संत साहित्य सेवेची, भगवद्भक्तीची, पारमार्थिकतेची ही गंगा आजही अखंड वाहते आहे.
नेवासे येथे 9 जून 1929 रोजी दा. का. तथा भाऊ थावरे यांचा जन्म झाला. कुटुंबाला लाभलेल्या संतपरंपरा, भगद्भक्ती व उच्च कोटीच्या आध्यात्मिक परंपरेमुळे बालपणापासूनच तसे संस्कार झाले. वडील काशिनाथपंत थावरे हे शिक्षक असल्याने कोपरगाव, राहुरी (जि. अहमदनगर) येथे त्यांचे बालपण गेले. शिक्षणानंतर सहकार खात्यातील नोकरीमुळे भाऊ सोलापूर येथे स्थिरावले आणि त्यांच्या संत साहित्य सेवेने सोलापूरच्या संत साहित्याच्या आणि आध्यात्मिक व पारमार्थिक क्षेत्रात अमूल्य अशी भर पडली. भाऊंनी केवळ संत साहित्याचे लेखन केले नाही तर ते संतवचन जगले. साधी राहणी असलेले भाऊ निरपेक्ष भावनेने आदर्शवत कार्य करत राहिले. सहकार खात्यातील  नोकरी म्हणजे आमिषांची कमतरता नाही. मात्र, सहकार खात्यात अधिकारीपदावर असलेल्या भाऊंच्या मनात कधी मोह डोकावू शकला नाही. स्वच्छ चारित्र्य व प्रामाणिकपणा जपत आपल्या पारमार्थिक जनसेवेने इतरेजनांवरही आपला प्रभाव पाडत त्यांच्यात ईश्वरभक्तीची ओढ निर्माण केली. त्यांच्या पत्नी विजया थावरे सांगतात,  ‘ लग्नानंतर भाऊंनी मला सांगूनच ठेवलं होतं, घरी कोणीही कोणतीही वस्तू, पैसे आणून दिले तर घ्यायचे नाही.’ भाऊ दर एकादशीला पंढरपूरची वारी करायचे तर चतुर्थीला अक्कलकोटला श्री स्वामीर्थांच्या दर्शनाला जायचे. त्यासाठी ते पहाटे उठायचे. वारी करुन ते कार्यालयात कामावर हजर व्हायचे. अनेकदा कामात न जल्यास कार्यालयीन काकाज संपल्यावर संध्याकाळी पंढरपूर व अक्कलकोटला जायचे. परंतु त्यांनी कधी पंढरपूरची वारी व अक्कलकोटच्या स्वामीर्थांचे दर्शन चुकवले नाही.

प्रसिद्धी, पैसा, मानमतराब यापासून दूर राहत भाऊंनी पारमार्थिक जनसेवा केली. संत साहित्य घरोघरी पोहोचावा, संतविचार मनोमनी रुजावेत यासाठी भाऊंची सतत धडपड असायची. त्यांनी वृत्तपत्रांतून पाच हजारांहून अधिक चिंतनपर लेख लिहिले. 725 संतांच्या जीवनचरित्रावर लेखन केले. ज्ञानेश्व, सिद्धरामेश्व, वै. धुंडा महाराज देगलूरकर, गुंडा महाराज देगलूरकर, मामासाहेबा दांडेकर, मुकुंद महाराज जाटदेवळेकर, संतकवी महिपती महाराज यासह केवळ भागवत संप्रदायातीलच नव्हे तर अन्य संप्रदायातील संतांवरही त्यांनी लेखन केले. त्यांच्या लेखनाविषयी माजी आमदार पांडुरंग तथा तात्यासाहेबा डिंगरे एके ठिकाणी म्हणतात, ‘त्यांची दृष्टी इतकी विलक्षण आहे की त्यांना सर्वत्र संत व सर्व माणसांत सतत्व दिसते.’ तसेच त्यांनी  सकल संतगाथा दोन खंडात, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदी 12 ग्रंथांचे लेखन केले. आनंद संप्रदायातील संतत्रयीसह 59 संतचरित्रे आणि वृत्तपत्रांतून 750 हून अधिक संतांचे चरित्र लिहिले. श्री महिपती महाराज, श्री दासगणू महाराज, श्री समशेरपूरकर महाराजांचीच वाट भाऊंनी चोखाळली. तसेच भाऊंनी गोरखपूरच्या गीता प्रेससाठी  भागवताचे हिंदीतून मराठीत भाषांतर केले.त्यांचा सोलापूरसह राज्यभरातील अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे. 
पारमार्थिक जनसेवा
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, दासबोध या ग्रंथांच्या सव्वालाख प्रतींचे अल्पदरात वितरण केले. श्री ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीनिमित्त 1600 हून अधिक भाविकांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेऊन बारावेळा आळंदीला जाऊन समर्पित केली. 150 महिला भाविकांना नेऊन श्री क्षेत्र आळंदीमधील सुवर्ण पिंपळाला सुमारे साडेचार लाख प्रदक्षिणा घातल्या. ज्ञानेश्वरांच्या माऊलीने पतीने संन्यास घेतल्यानंतर याच सुवर्णपिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्यानंतर पती गृहस्थाश्रमात परतले होते. 250 भक्तांना देहू येथे नेऊन 1100 तासतुकाराम, तुकारामजप करुन घेतला. 150 भक्तांकडून 450 तासरामकृष्ण हरिचा जप करुन घेतला. तसेच तुकाराम गाथाच्या 300 प्रती लिहून घेऊन देहू येथे तुकाराम महाराजांना समर्पित केल्या. तसेच संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातही भाऊंनी सप्ताह, पारायण आदी अनेक उपक्रमांसाठी प्रवास केला. तेथील उपक्रमांना प्रोत्साहन दिले. गेल्या दोन वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाऊंचे संत साहित्य लेखन थांबले असले तरी मनीचे भगवद् चिंतन कायम आहे.

2 comments:

  1. श्रीसकळसंतगाथा मिळेल काय

    ReplyDelete
  2. कोण आहात, हे कळत नाही. अननोन दाखवतंय.

    ReplyDelete

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...