२०११
स्थळ
: कोलकाता
साल्ट
लेक संगीत
महोत्सव :
यात
सोलापूरचे
सुंद्रीवादक
भीमण्णा
चिदानंद जाधव
यांचा पुरस्कार
देऊन सन्मान
करण्यात आला.
याप्रसंगी
बोलताना
ग्रॅमी अवार्ड
विजेते, पद्मविभुषण
मोहनवीणा
वादक विश्वमोहन
भट म्हणाले,
'मला
एकाच कुटुंबातील
आजोबा, मुलगा
आणि नातू
अशा तिघांचे
सुंद्रीवादन
ऐकायला मिळाले,
हे
माझे भाग्य
आहे.'
११ डिसेंबर २०१४
स्थळ
: पुणे
सवाई
गंधर्व महोत्सव
: दोनवेळा
वडिलांसमवेत
या महोत्सवात
सुंद्रीवादन
केलेल्या
भीमण्णा जाधव
यांच्या
सुंद्रीवादनाने
६२ व्या
महोत्सवाची
सुरुवात
झाली. जाधव
यांच्या
सुंद्रीवादनाने
रसिकांना
डोलायला
लावले. यानंतर
सतारवादनासाठी
व्यासपीठावर
आलेले पद्मविभूषण
पं. शिवकुमार
शर्मा जाधव
यांची पाठ
थोपटत म्हणाले,
'व्वा
क्या बात
है, दादाजी
की याद
दिलाई.'
वरील
दोन्ही
महोत्सवांतील
संगीत
क्षेत्रातील
दिग्गजांच्या
गौरवोदगारांतून
केवळ जाधव
कुटूंब, त्यांच्या
तीन पिढ्यांच्या
कलासाधनेचा, त्यांनीच
बनवलेल्या
आणि फक्त
त्यांच्याकडूनच
वाजवल्या
जाणाऱ्या
सुंद्रीचेच
कौतुक नव्हे
तर सोलापूरच्या
कलावैभवाचा
सन्मान झाला.
सोलापूरसह
महाराष्ट्र
– कर्नाटकच्या
सीमाभागातील
लोकसंगीतात
आपल्या
कलासाधनेने
सुंद्री
वाद्याला
महत्वपूर्ण
स्थान मिळवून
दिलेल्या
जाधव यांनी
फक्त जयपूर
ते भुवनेश्वर,
जगन्नाथपुरी,
कोलकाता
आणि दिल्ली
ते बंगळुरू,
चेन्नई,
हैदराबाद,
गुंटूर,
वरंगल
असे संपूर्ण
भारतातच
नव्हे फ्रान्स,
बेल्जियम
या पाश्चिमात्य
राष्ट्रांतील
महोत्सवांतही
भारताचे
प्रतिनिधीत्व
आणि सुंद्री
वादनाने
युरोपियन
रसिकांना
मंत्रमुग्ध
करत सोलापूरच्या
कलावैभवाला
आंतरराष्ट्रीय
स्तरावर
पोहोचवले.
जन्मकथा
: बाॅबीन
ते सुंद्री
सनईची
छोटी बहीण
मानली जाणारी
सुंद्री
सोलापूरच्या
ग्रामीण
भागात जन्मली,
सोलापूर
शहराच्या
बहुविध
सांस्कृतिक
वातावरणात
वाढली आणि
ती देशाच्या
बाहेरही
पोहोचली. तिच्या
जन्माची
चित्तरकथाही
तितकीच
चित्तवेधक
आहे. आहेरवाडी
(ता.
दक्षिण
सोलापूर) येथील
परंपरागत
सनईवादक
भीमण्णा जाधव
(भीमण्णा
यांचे पणजोबा)
हे
रोज २४
किलोमीटर
पायी ये
- जा
करत सोलापुरातील
जुनी मिलसमोर
टोपल्या
विकून उदरनिर्वाह
करायचे. मिलमध्ये
बाॅबीन
ठेवण्यासाठी
या टोपल्यांचा
वापर केला
जायचा. १८९५
च्या सुमारास
एकेदिवशी
चुकून
टोपल्यांमध्ये
काही बाॅबीन
आल्या. दुसऱ्या
दिवसापासून
मिलमध्ये
संप सुरू
झाला. त्यांच्या
पत्नीने
त्यांना
उरलेल्या
टोपल्या
शेजारच्या
गावांमध्ये
विकून येण्यास
सांगितले
तेव्हा त्यांचे
लक्ष त्या
बाॅबीनकडे
गेले. ते
मिलच्या
व्यवस्थापकांकडे
परत करावे,
हा
विचार होता.
मात्र,
मिल
बंद असल्याने
ते देणे
शक्य नव्हते.
त्यामुळे
ते सनईची
रीड दुरुस्त
करू लागले.
त्यावेळी
त्यांचा
मुलगा बाबूराव
याचे त्या
बाॅबीनकडे
लक्ष गेले
आणि त्याला
काही छिद्रे
मारुन पत्ती
बसवून
वाजवल्यानंतर
सुस्वर उमटले
आणि या
अनोख्या, सुषिर
लोकवाद्याचा
जन्म झाला.
सुंदर
ती सुंदरी
कालांतराने
रोजगारासाठी
सोलापुरात
स्थायिक
झालेले
बाबूराव, लक्ष्मण
आणि सिद्राम
हे बंधू
सुंद्रीसह
परंपरागत
सनई, ढोल,
ताशा
याचे सामुदायिक
वादन करायचे.
अक्कलकोटचे
तत्कालीन
संस्थानिक
फत्तेसिंह
महाराज यांनी
एका समारंभात
सुंद्रीवादनासाठी
बाबूराव जाधव
यांना आमंत्रित
केले. तेथे
२७ फेब्रुवारी
१९३६ ला
हा कार्यक्रम
झाला. कार्यक्रमानंतर
फत्तेसिंह
महाराजांची
प्रतिक्रिया
होती, सुंदर,
सुंदर...
त्यांनी
वाद्याच्या
नावाची विचारणा
केली. त्यावर
जाधव यांनी
बाॅबीन असे
सांगितले. तोपर्यंत
या वाद्याचे
नाव बाॅबीन
हेच प्रचलित
झाले होते.
प्रतापसिंह
महाराजांनी
त्याचे सुंदरी
(सनईत
पुरुषतत्त्व
तर सुंद्रीत
स्त्रीतत्त्व
असते.) असे
नामकरण केले,
जिचे
पुढे अपभ्रंश
होऊन सुंद्री
बनली.
पंतप्रधानांनाही
घातली भुरळ
बाबूराव
यांनी सुंद्री
जन्माला
घातली, मात्र
सिद्राम, त्यांचे
चिरंजीव
चिदानंद आणि
नातू भीमण्णा
यांनी आपल्या
अथक साधनेने
त्यांचा
वारसा पुढे
नेत त्याला
वाढवले, सर्वसामान्य
रसिकापासून
संगीतक्षेत्रातल्या
दिग्गजांना
त्याची भूरळ
पाडली. बाबूराव
यांच्या
निधनानंतर
इंग्रज
अधिकाऱ्यांनी
बागेवाडीकर
हाॅस्पिटलच्या
इमारतीत
हिराबाई
बडोदेकर
यांच्या
कार्यक्रमाचे
आयोजन केले
होते. त्यावेळी
बाहेर त्यांच्या
स्वागतासाठी
सुंद्रीवादनाकरिता
सिद्राम जाधव
यांना बोलावले
होते. सुंद्रीवादनाने
प्रभावित
बडोदेकर
हाॅलमधून
बाहेर आल्या
आणि त्यांना
व्यासपीठावर
नेऊन त्यांचा
सन्मान
केला.तसेच
भागवत
चित्रपटगृहात
संगम चित्रपटाच्या
प्रिमियरला
पं. उस्ताद
बिस्मिल्ला
खाँ यांचा
सनईवादनाचा
कार्यक्रम
होता. तर
खालच्या
हाॅलमध्ये
सिद्रामप्पा
यांचा कार्यक्रम.
त्यावेळचे
सिनेक्षेत्रातील
दिलीपकुमार
व राज
कपूर हे
दोन्ही दिग्गज
उस्ताद
बिस्मिल्ला
खाँ यांचा
कार्यक्रम
सोडून
सुंद्रीवादन
ऐकण्यास खाली
आले. त्याने
मोहित दिलीपकुमार
यांनी आपला
कोट आणि
राजकपूर
यांनी रेश्मी
फेटा सिद्रामप्पा
यांना देत
त्यांच्या
कलेचा गौरव
केला. तत्कालीन
पंतप्रधान
पंडीत नेहरु
यांनीही
शंकराची
प्रतिमा व
चांदीचा चषक
देऊन तर
तुळजापूर
येथे तत्कालीन
पंतप्रधान
इंदिरा गांधी
यांनी सुंदरी
सम्राट अशा
शब्दांत
सिद्रामप्पा
यांचा गौरव
केला. ते
ए प्लस
ग्रेडचे
आकाशवाणी
कलाकार होते.
त्यांनी
बीबीसी लंडन,
दूरदर्शन
यावरुनही
रसिकांसाठी
सुंद्रीवादन
केले. १९४२
मध्ये एचएमव्ही
कंपनीने
त्यांच्या
सुंद्रीवादनाचे
लाँग प्ले
रेकाॅर्ड
प्रकाशित
केले.
सुंद्री
आयफेल टाॅवरच्या
भेटीला
त्यांच्यानंतर
त्यांचे
चिरंजीव
चिदानंद
यांनी हा
कलाप्रवाह
वाहता ठेवला.
त्यांनी
घरगुती
समारंभांसह
आकाशवाणी, दूरदर्शनवर
कार्यक्रम
केले. पंडीत
भीमसेन जोशी
यांच्यासह
संगीत
क्षेत्रातील
दिग्गजांशी
त्यांचा
स्नेह होता.
त्यांना
संगीत नाटक
अकादमी, पश्चिम
क्षेत्र
सांस्कृतिक
संस्थेने
गौरवले. त्यांनीच
कै. सुंद्री
सम्राट सिद्राम
जाधव सांस्कृतिक
कला मंडळाची
मुहूर्तमेढ
रोवली. तसेच
मुलगा भीमण्णा
याच्यावर
वयाच्या
चौथ्या
वर्षांपासून
कलासंस्कार
केले. भीमण्णाने
तबला, हार्मोनिअम
आदींचे संगीत
शिक्षण घेत
सुंद्रीवादनाचे
धडे गिरवले.
तसेच
परिश्रमपूर्वक
वयाच्या ३३
व्या वर्षी
आकाशवाणीच्या
ए ग्रेड
कलाकारांमध्ये
स्थान मिळवले.
भोपाळच्या
भारत भुवनमधील
दुर्लभ, ग्वाल्हेरच्या
तानसेन यासह
देशभरातील
प्रतिष्ठित
संगीत
महोत्सवांमध्ये
आणि १९९८
मध्ये
प्रजासत्ताकदिनी
राष्ट्रपती
भवनात अनोख्या
सुंद्रीचा
जादुई आविष्कार
घडवतानाच
फ्रान्स, बेल्जिअमच्या
रसिकांवरही
सुरांची
मोहिनी घातली.
फ्रान्समधील
आयफेल टाॅवरसमोर
उभा राहिल्यानंतर
मातीचे भांडी
विकणाऱ्या
माझ्यासारख्या
सर्वसामान्य
माणसाला हा
गौरव केवळ
सुंद्रीमुळे
मिळाला, या
भावनेने
भावविभोर
होऊन माझ्या
डोळ्यांतून
आनंदाश्रू
तरळल्याचे
भीमण्णांनी
सद्गगदित
होऊन सांगितले.
तसेच
आता अमेरिकेतील
दरबार महोत्सवाद
सुंद्रीवादनाची
आस असल्याचे
म्हटले. देशभरात
विविध ठिकाणी
पद्मश्री
कोदंडराम, देवदत्त
जोशी, कृष्णा
बालेश, रोहन
नायडू, संदीप
चटर्जी, फ्रान्सचे
लाँग्स
यांच्याशी
भीमण्णाच्या
सुंद्रीची
जुगलबंदीही
रसिकजनांनी
अनुभवली.
भारताच्या
प्रजासत्ताकदिनी
उस्ताद
बिस्मिल्ला
खाँ यांच्या
सनईवादनाने
आकाशवाणीची
सुरुवात
व्हायची. त्यांच्या
निधनानंतर
२०१२ मध्ये
देशभरातील
आकाशवाणी
केंद्रांवरुन
भीमण्णाचे
सुंद्रीवादन
प्रसारित
झाले. विशेष
उल्लेखनीय
म्हणजे
बिसिल्ला
खाँ यांच्या
निधनानंतर
त्यांच्या
नावे दिला
जाणारा पहिलाच
युवा पुरस्कार
भीमण्णा
यांना प्रदान
करण्यात आला.
उस्ताद
बिस्मिल्ला
खाँ यांनीही
जाधव कुटुंबियांचे
गौरव करताना
म्हटले आहे,
'आम्ही
मोठी सनई
वाजवतो, पण
तुमच्या
छोट्या
सुंद्रीतही
तेवढेच
स्वरमाधुर्य
आहे.' भीमण्णा
यांना कला
अकादमीसह
अनेकविध
फेलोशिप, शिष्यवृत्ती
मिळाले असून
अनेक पुरस्काराने
गौरवले आहे.
तसेच
ते दिल्लीच्या
भारतीय
सांस्कृतिक
संबंध परिषदेवरही
आहेत.
भीमण्णा
हे सुंद्रीसम्राट
कै. सिद्राम
जाधव संगीत
सांस्कृतिक
कला मंडळाच्या
माध्यमातून
सुंद्रीच्या
प्रचार, प्रसारासाठी
प्रयत्नशील
आहेत. सध्या
त्यांच्याकडे
नऊ विद्यार्थी
मोफत
सुंद्रीवादनाचे
धडे गिरवत
आहेत. मात्र,
त्यांची
एक खंत
आहे. त्यांच्या
आजोबांनी
पुणे, माढा
येथील काहीना
सुंद्रीवादनाचे
धडे दिले.
तीन
पिढ्यांपासून
त्यांच्या
या कलेच्या
प्रचार
प्रसाराच्या
प्रयत्नांना
फारसा प्रतिसाद
मिळाला नाही.
तरीही
'सूर
हेच ईश्वर'
मानून
त्यांची
साधना सुरू
आहे.
No comments:
Post a Comment