धर्मामुळेच जीवनाला समृद्धी, ईश्वराचे दिव्यानुभव, परमशांती मिळते. धर्माअभावी जीव - जगत विनाशाकडे जाईल. एकूण धर्मामुळेच जीव - जग बहरेल. धर्म सोडल्यास मनुष्याला शांती, समाधान मिळू शकणार नाही. हृदयाचे माधुर्य हेच धर्म होय. असा हृदय नसल्यास, आणखी काहीही असले तरी काय प्रयोजन?
घराजवळच रंगीबेरंगी फुलांची बाग आहे. एकही दिवस तेथे गेले नाही. डोळे उघडून पाहिले नाही. हे जगच एक फुलबाग आहे. हे डोळे उघडून पाहण्याचा एक प्रयत्नही केला नाही तर कसे? शंभर वसंतांच्या या जीवनात प्रपंचाच्या बाजारातून एकही दिवस बाहेर आला नाही. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त पाहिला नाही. अनंत आकाशात चमचमणारे तारे पाहिले नाहीत. पक्ष्यांच्या गायनात सूर मिसळले नाहीत. मोराच्या मनमोहक नृत्याचा आनंद अनुभवला नाही. मूक, मुग्ध पशूंच्या डोळ्यांतील निर्मल भावसागरात डुबकी मारली नाही. असे झाले तर शंभर वसंतांचे आमचे जीवन कसे संतोषमय बनेल?
या सत्यं शिवं सुंदरम् अशा सृष्टीचे मर्म जाणणारी दिव्य कलाच धर्म होय. जगातील महात्म्यांनी आयुष्यभर अशा धर्माविषयी चिंतन - मंथन केले. देवर दासिमय्या यांनी आपल्या एका सुंदर वचनातून धर्माचे सत्यस्वरुप उलगडून दाखवले आहे.
धर्मवनेत्तुववर धर्मिगळेंबिरी
निम्म धर्मवनारू अविवरिल्ला!
धर्मगळनिक्की उत्त भूमिय डोणी
निनेत्मनेल्लर नोडी सलहिदै रामनाथ.
कोणीतरी बनवलेले स्वयंपाक आणून देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार्यांना काहीजण धर्मवंत म्हणतात. खरे देव, धर्म कोणते हे कोणीही जाणून घेऊ शकतो. परंतु देवाने मात्र विश्वातील सकल जीवराशींना फळे, धान्य, पाऊस, वारा, प्रकाश आदी देऊन करुणा दाखवली आहे. त्या महादेवाने दिलेले दुसर्यांना देऊन आपण दानधर्म केल्याचे सांगणे, त्याचा अभिमान बाळगणे योग्य आहे? त्या महादेवाने या गर्द हिरव्या निसर्गात करुन ठेवलेले पंचक्वान्नाचे स्वयंपाक साधारण नाही. तो महादेवच महान पाकशास्त्रज्ञ! त्याच्यासारखे फुले, फळे, दूध मध, धान्य बनवणे कोणाला साध्य आहे? धर्मसागर असलेल्या महादेवाने बनवलेले हे स्वयंपाक देवाचा प्रसाद म्हणून भक्तिभावाने स्वीकारुन संतोषाने राहणे हेच आपले धर्म! आपले कर्तव्य! भगद्गीतेत हे धर्म अथवा आध्यात्मिक विद्येच्या संदर्भात खुपच सुंदर वर्णन केले आहे-
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम।
प्रत्यक्षावमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम॥
ही आत्मविद्या सर्व विद्येचा राजा होय. तेवढेच नाही ही अत्यंत श्रेष्ठ, पवित्र, मंगलकारी, धर्मस्वरुपी आहे. अनुसरण्यास सुलभ आहे. अविनाशी आहे!
हसत हसत सदा प्रसन्नचित्त राहणे हेच धर्म होय. ही आध्यात्मविद्या, राजविद्या आहे. गंभीर राहणे हे कष्टदायक आहे. सतत हसत हसत संतोषमय, विजयी भावाने राहणे हे काही फारसे कष्टाचे नाही. हृदय स्वच्छ अथवा मन मुग्ध बालकाचे बनल्यास पुरेसे आहे. हसर्या चेहर्याचे झोपडीत असले तरी ते राजवाड्यासारखे वाटते. रडक्या चेहर्याचे राजवाड्यात असले तरी ती झोपडीपेक्षाही कनिष्ट वाटते.
एका श्रीमंताच्या घरासमोरील झाडावर बसून एक पक्षी दिवस उजाडताच गात होते. एके दिवशी श्रीमंत पक्ष्याला विचारला, “तू सतत इतक्या खुशीत गातोस कसा काय? अपार संपत्ती गोळा करुन ठेवलास काय?’’ पक्ष्याने सांगितले, “ या झाडावर असलले गवत, काड्यांचे घरटे, त्यात असलेले दोन अंडे हेच माझी संपत्ती. तरीही आम्ही गात राहतो. कारण आमचा जन्मच गाण्यासाठी, आकाशात उडडण्यासाठी झाला आहे. तुमच्याप्रमाणे जमीन धरुन बसायला नव्हे!!’’ हसतहसत जगायला आणखी कशाची आवश्यकता नाही, निर्मल हृदय हे एक असले तर पुरेसे आहे, याची जाणीव श्रीमंताला आता झाली.
हजारो वर्षांपूर्वी याच भूमीत उपगुप्त नावाचा एक सुप्रसिद्ध बौद्ध संन्यासी होऊन गेला. हा धर्मोपदेश करत एका गावी आला. त्या गावी एगक श्रीमंत नर्तकी होती. तिच्या सौंदर्यावर, संगीतावर फिदा होऊन त्या गावातील लोक आपली संपत्ती उधळायचे. उपगुप्त तिच्या घरी भिक्षेसाठी गेला. उपगुप्ताच्या सौंदर्याला भाळलेली नर्तकी स्वत:सह आपली संपत्ती त्याला अर्पण करण्यास सिद्ध झाली. उपगुप्त सांगितला - “ मी आता अन्नाच्या भिक्षेसाठी आलो आहे, सोन्याच्या भिक्षेसाठी नव्हे; योग्य वेळ येताच मी परत येईन. त्यावेळी आणखी काहीतीर वेगळं दे!’’आज नाही तर उद्या कधीतरी उपगुप्त येईल, या भरवशाने नर्तकी गप्प बसली. काळ गेला. नर्तकीला महारोग झाला. सर्व गावकर्यांनी तिला गावाबाहेर हाकलून लावले आणि तिची संपत्ती हडपली. तेथे असलेल्या प्रेतांच्या मध्ये ती जीवंत शव बनून राहिली. तेवढ्यातच “बुद्धं शरणं गच्छामि’’ हे शब्द कानावर पडले. हा उपगुप्ताचाच आवाज असावा म्हणून ती डोळे उघडून पाहिली.समोर तोच उभा होता. ती म्हणाली, “हीच काय तू सांगतिलेली योग्य वेळ?’’ “होय, तू मागचं सर्व विसरून जा. सर्व जग आपली साथ सोडल्यावर आपल्याविषयी करुणा दाखवून धर्ममार्गावर नेऊन निर्वाण अथवा मोक्ष प्राप्त करुन देतात तेच खरे बंधू -नातीगोती, गुरू, देव, सर्वस्व!! असे उपगुप्तने सांगितले. हे उपदेशामृत ऐकता क्षणी नर्तकी हसत - हसत देवलोकापर्यंत पोहोचली. मृत्यूच्या वेळीही अमरत्वाचे अमृतानुभव देणेच धर्म अथवा अध्यात्म! हीच राजविद्या!!
No comments:
Post a Comment