Sunday, 23 April 2023
कोण हे ? कोण हे शेट्टर ?
Thursday, 6 April 2023
शाब्बास ! बहुसंख्यकांवर दडगफेक करण्याइतके स्वातंत्र्य
दगडफेक करण्याच्या रोगाने यांना कसे पछाडलेय देवच जाणे. आधी आपण दूरच्या काश्मिरमध्ये दगडफेक करताना आपण या लोकांना पाहायचो. आता गावोगावी यांची गर्दी झाली आहे. काश्मिरात प्रत्युत्तरादाखल सैनिकांनी चार वाजवले ना, तसे सर्वत्र केल्यास हे नीट होतात का पहावे. बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रासह सर्वत्र हे दगडफेक करणारे जोरात आहेत. मशिदीवर लपून उभे राहायचे, शेवटी हिंदूंच्या मिरवणुका आल्यावर चोहोबाजूंनी दडफेक करायच्या, या हीनबुद्धीचे कोणी शहाणा माणूस समर्थन करू शकत नाही. अशातच इस्लाममध्ये स्थान नसल्याने मशिदीबाहेर डीजेसह येणार्या मिरवणुकांचा ते विरोध करत असल्याचे सांगतात. शाब्बास ! दररोज अजानावेळी अल्ला हा एकच देव असल्याचे सांगितले जाते. तेहतीस कोटी देवांची पूजा करणारे हिंदू ते ऐकतच आले नाहीत का ? दररोज मशिदीबाहेर गोंगाट निर्माण करणार्या स्पीकरवर दगडफेक करुन नष्ट केले आहेत का ? यांना या मिरवणुकीतील संगीत सहन होत नसेल तर काय काय हवे सांगा ? गुजराती लोक संगीताच्या तालावर दांडिया नृत्य करताना याच समुदायाचे तरुण चोरुन येऊन निर्लज्जपणे ठेका धरतात ना, तेव्हा इस्लामला संगीत चालते का ? सेक्युलॅरिझमची शिकवण हिंदूंनाच का ? दगडफेक करणार्यांना किती दिवस अल्पसंख्यकाच्या छत्राखाली सांभाळून घ्यायचे ?
अल्पसंख्यक म्हणजे संख्येने कमी असलेले हा अर्थ. मात्र, 2011 च्या जनगणनेनुसार मुसलमानांची संख्या शेकडा 15 असून, 18 कोटींची संख्या ओलांडले आहेत. इंडोनेशिया, पाकिस्तान वगळता ते भारतातच सर्वाधिक संख्येने आहेत. यांची लोकसंख्या जगातील 95 देशांपेक्षाही अधिक आहे. उत्तर प्रदेशातील मुसलमानांची संख्या ही इस्लामचा उदय झालेल्या सौदी अरेबियातील मुसलमानांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे ! पश्चिम बंगाल, केरळ, आसाम येथे मुस्लिमांची भूमिका निर्णायक ठरते. तसे असूनही हे अल्पसंख्याकच ? तसे पाहिल्यास भारतात समलैंगिक, तृतीयपंथी हे खरे अल्पसंख्यक. सुविधा द्यायच्याच तर त्यांना द्यायला हव्या, यांना नव्हे. त्यामुळेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, जेथे धर्माला प्रामुख्यता आहे त्या देशात अल्पसंख्याक विभाग हवे. भारतात सर्व समान आहेत. त्यामुळे अशा गोष्टींना येथे संधी देऊ नये. त्या दृष्टीने सांगायचे झाल्यास इस्लाम प्रधान राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात, सौदी अरेबियात आणि ख्रिश्चॅनिटीच राष्ट्रधर्म असलेल्या इंग्लंडमध्ये इतर धर्मियांना अल्पसंख्याक म्हणून दर्जा द्यायला हवा, भारतात नव्हे !
खरे तर जागतिकदृष्ट्या हिंदू अल्पसंख्य आहेत. जगात सर्वाधिक संख्येने आहेत ते ख्रिश्चन, मुस्लिमच. एकेकाच्या वाट्याला 50 हून अधिक देश आहेत. हिंदू केवळ इथेच राहतात. त्यामुळे जागतिकदृष्ट्या अल्पसंख्यकाच्या सुविधा आम्हालाच मिळायला हव्यात, तलवारीला घाबरुन धर्मांतर केलेल्यांना नव्हे. आमच्यात पंजाब, जम्मू काश्मिर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेशात हिंदूच अल्पसंख्यक आहेत. मात्र, तेथेही अल्पसंख्यकाच्या सर्व सुविधा लाटणारे लोक हे मुस्लिमच आहेत. वास्तविकपणे देशभरात अल्पसंख्यक शब्दाला सन्मान मिळेल अशाप्रकारे खर्या अर्थाने पारसी हेच अल्पसंख्यक आहेत. खरेतर त्यांनाच अल्पसंख्यक म्हणून दर्जा मिळायला हवा, सुमारे 20 कोटींहून अधिक असलेल्या, दगडफेक करुन गोंधळ माजविणार्या या लोकांना नव्हे.
स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दिवसांतच काँग्रेसने मुस्लिमांना घरजावईप्रमाणे पाहायचा धडा गिरवायला सुरुवात केली. आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राजकीयदृष्ट्या चाणाक्ष नसलेले मुस्लिम मशिदीसाठी अंथरायला दिले तरी मते देतील. अशांनाच डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने अल्पसंख्यक धोरणाच्या माध्यमातून त्यांना बहुसंख्यक हिंदूंपेक्षाही वर बसवण्याची योजना आखली. वास्तविकपणे, आपल्या संविधानाच्या प्रकारे सर्वजण समान आहेत. मात्र, काँग्रेसने मुस्लिमांना बहुसंख्यकांपेक्षा वर बसवण्याचाच नव्हे तर अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाणार्या बौद्ध, शीख, जैनांना कोपर्यात सारुन मुस्लिमांच्या वैभवीकरणासाठी प्रयत्न केले. एकेकाळी मनमोहन सिंग यांनी या देशाच्या साधनसंपत्तीवर मुसलमानांचाच पहिला अधिकार असल्याचे सांगून टाकले होते. आताही तेवढेच. काँग्रेसच्या राज्यांत रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मुस्लिमांची घरे पाडावी लागणार असतील तर रस्त्यांचे रुंदीकरणच थांबवले जाते. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची कथा काही यापेक्षा वेगळी नाही. काही प्रमाणात उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी मात्र चार वाजवून यांच्या गुंडगिरीला आळा घातला आहे. तर त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही प्रमाणात या विषयी यश मिळवले आहे. उर्वरित सर्वजण त्यांच्या दगडफेकीला घाबरुन लपून बसणारे नेतेच आहेत. मुस्लिमांना अल्पसंख्यकाचा दर्जा द्यायलाच हवा, म्हणणारे काही डावे बुद्धीजीवी अल्पसंख्यक शैक्षणिकदृष्ट्या मागे असल्याने हे धोरण आवश्यक असल्याचे सांगतात. हिंदू आणि मुस्लिमांचा शैक्षणिक स्तर सुमारे शेकडा 64 इतके म्हणजे समसमान आहे. अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाणार्या जैनांचे शैक्षणिक स्तर शेकडा 87 इतके आहे. उर्वरित अल्पसंख्यकांचा शैक्षणिक स्तर हिंदूंपेक्षा अधिक आहे. तरीही अधिकाधिक सवलती यांनाच दिल्या जातात याचा अर्थ काय आहे ! इतके होऊनही इतर अल्पसंख्यकांची लोकसंख्या दर जनगणतीला घटत असताना मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. याला या समाजातील महिला शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिल्याचे कारण सांगितले जाते. आकडेवारीनुसार हिंदू आणि मुस्लिम महिलांचा शैक्षणिक स्तर शेकडा 90 आहे. तरीही त्या मुली लग्न झाल्यावर अपत्य देणार्या यंत्र बनतात म्हणजे यामागे एखादे प्रबळ षडयंत्र असलेच पाहिजे. योजना आखाणारा कोणीही याकडे लक्षही देत नाही, हे आश्चर्यजनक आहे. त्यातही संविधानाच्या प्रकारे दोन प्रकारचे अल्पसंख्यक आहेत. एकीकडे आतापर्यंत पाहिलेले धार्मिक अल्पसंख्यक तर दुसरीकडे भाषिक अल्पसंख्यक आहेत. मात्र, या भाषिक अल्पसंख्यकांची आपल्या राजकारण्यांनी काळजी वाहिल्याचेे खूपच अतिविरळ आहे. बोलायचे झाले तर मुस्लिमांना सोयीसुविधा वाटणार्या या लोकांनी कधीतरी महाराष्ट्रातील भाषिक अल्पसंख्यक असलेल्या कन्नडिगांना योजनेत वाटा दिला आहे का ? हिंदीवगळता उर्वरित सर्व भाषा भाषिक अल्पसंख्यक वर्गात मोडत असतील तर तेथे आरक्षण नको काय ? याविषयी आवाज उठविल्यावर न्यायालयाने भाषिक अल्पसंख्यकांविषयी त्या त्या राज्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. मात्र, धार्मिक अल्पसंख्यकांविषयी राष्ट्रीय स्तरावरच निर्णय घेतले जातात ना ! थोडेसे गोंधळ आहे वाटते ना ? या कारणामुळेच धार्मिक अल्पसंख्यक असलेले मुस्लिम देशातील बहुतेक योजना लाटून वाढतानाच त्यांच्या सुखकर जीवनासाठी कर भरणार्या हिंदूंवर दगडफेक करण्याचे धैर्य दाखवत आहेत.
सगळी चूक हिंदूंचीच आहे. हे सर्वजण स्वत:ची रिलिजन म्हणून ओळख जपत असताना आपण मात्र, हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती समजतो. संविधानात धर्माला जागा आहे, जीवनपद्धतीला जागाच नाही. हिंदूंना लहानपणापासूनच चांगले संस्कार देऊन उत्तम नागरिक बनेल, यादृष्टीने घडविले जाते. साहजिकच तो विवेकी बनतो. विवेकी आणि अविवेकी यांच्या हाणामारीत अडकल्यास जिंकणार तो अविवेकीच. कारण विवेकी तर्कशुद्ध विचार मांडतो. टीव्ही डिबेटमध्ये विचारलेल्या प्रश्नामुळे सर तनसे जुदा म्हणत रस्त्यावर उतरलेल्या अविवेकींमुळे हिंदू शांत झाला. कारण त्यांच्यासारखे रस्त्यावर उतरुन भांडणे त्याला कधीही शक्य नाही. तर गुंडगिरीपुढे सरकारही झुकतात. त्यांना सरकारात आहे तितके दिवस शांतपणे कारभार करणे पुरेसे आहे. अशी सरकारे शांतपणे राहणार्याला पाठीवर मारुन चांगल्या गोष्टी सांगतील मात्र, गुंडांच्या कानाखाली चार वाजवून तोंड न उघडता गप्प बसायला सांगणार नाहीत. त्यामुळेच दगडफेक करणारे हे लोक जिंकतात. म्हणून सभ्य समाज याला जय म्हणत नाही. त्याला पाहून त्यांना वाईट वाटते. शेवटी शेजारीपाजारी ते असल्यास घर विकून सभ्य लोक राहणार्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळेच चार मुस्लिमांच्या घरांपासून सुरू झालेला एरिया कालांतराने मिनी पाकिस्तानात बदलतो !
तसे सर्वच मुस्लिम या दगडफेक करणार्यांचे समर्थक नाहीत. मुस्लिमांत अशाप्रकारे दगडफेक करणारे अल्पसंख्यक वर्ग असला तरी याविषयी काही न बोलता शांतपणे सहन करत राहणारे बहुसंख्य मुस्लिमही आहेत. अशा शांतिप्रिय बहुसंख्यकांत मुस्लिमांनी विकासाच्या वाटेवरुन पुढे जावे असे सांगत आत्यंतिक आदर्शवाद नाकारणारे लोक असले तरी दुसरीकडे या गुंडांचा निषेध करुनही मुस्लिमांच्या विकासाविषयी कल्पनाही न करणारे लोकही आहेत. तेच बुरखा, हिजाबाचे समर्थन करत रस्त्यावर उतरतात. यांना दगडफेक करणारे आवडत नाहीत हे खरे आहे. मात्र, मुस्लिमांना विकासाच्या वाटेवर पाहणेही यांना आवडत नाही. अशांचाच काँग्रेस, जनता दलाला पाठिंबा आहे. गेली सात दशके राजकारणात मुख्य भूमिकेत राहिलेल्या या पक्षांनी मुस्लिमांना उच्च पदावर बसविण्याची कल्पनाही केली नाही. मोदींच्या आधी दहा वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मुस्लिमांना पंतप्रधान केले होते का ? अहमद पटेल यांच्या सावलीतच वाढलेल्या काँग्रेसने त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केलीच नाही ना ! इतके सारे बोलणार्या ममता बॅनर्जी यांनी आपले स्थान कोणा मौलवीला सोडून दिल्याचे पाहिलात का ? सिद्धरामय्या यांनी तर गेल्या निवडणुकीत परमेश्वर यांचा पराभव घडवून आणून ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपासून दूर राहतील असे केले ना ! हे सगळे व्यासपीठावर बोलतात ना, तसे जीवनात आचरण करत नाहीत. तरीही मुस्लिमांचा यांच्यावर विश्वास आहे. असूद्या, काहीही चुकीचे नाही. त्यांचा हा विश्वास कायम राखण्यासाठी पीडित, वंचितांच्या सवलती त्यांना देणे हे ते कसे सहन करतील ? या पार्श्वभूमीवर बोम्मई सरकारने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण काढून ते गौडा आणि लिंगायतांना दिले ही वस्तुस्थिती कौतुकास्पद आहे.
- चक्रवर्ती सुलिबेले
- अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
Monday, 27 March 2023
वीरशैव लिंगायत हिंदूच
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर
न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने लिंगायत समाजाविषयी दिलेला अहवाल कर्नाटक सरकारने स्वीकारला आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म असून लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा द्यावा, अशी शिफारस आयोगाने केली. ती काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने केंद्र सरकाला पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बाबींचा विस्ताराने विचार करणे गरजेचे बनले आहे.
Sunday, 26 February 2023
कन्नडमधील उपनिषद : वचन साहित्य
Saturday, 25 February 2023
ज्ञानालाच नव्हे, ज्ञानींनाही मृत्यू नाही, ते खऱ्या अर्थाने 'प्रज्ञा'वंत !
पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्याविषयी विचार करताना आठवतेय त्यांचे प्रवचन. मी स्वतः त्यांच्या दहा - बारा प्रवचन कार्यक्रमात सहभागी झालो आहे. शेकडो प्रवचने यूट्यूबसह इतर सोशल मीडियांत ऐकलो आहे. सुमारे १९ वर्षांपूर्वी कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील जत येथे चाललेल्या प्रवचनात सुमारे १५ हजार लोक सहभागी झाले होते. दूरदूरच्या गावातील लोक पहाटे तीन - चारला झोपेतून उठून बैलगाड्या - ट्रॅक्टरने एक - दोन तासाचा प्रवास करून त्यांच्या प्रवचनाला आल्याचे मी डोळ्यांनी पाहिलो आहे. हे केवळ एक - दोन दिवस नव्हे, तर महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमात दररोज न चुकता लोक हजेरी लावायचे. पहिल्या दिवशी आलेले एकही दिवस न चुकवता शेवटच्या दिवसापर्यंत कार्यक्रमात सहभागी होणारेच बहुसंख्य असायचे. तेव्हा गावात कोणतेही कार्यक्रम होत नव्हते. दिवसातून एक तास प्रवचन ऐकण्यासाठी संपूर्ण कुटुंबीय यायचे.
त्यादिवशी मी प्रथमच त्यांचे प्रवचन ऐकत होतो. त्यादिवशी ग्रामीण जनताच बहुसंख्य असलेल्या कार्यक्रमात सिद्धेश्वर स्वामीजी 'गणित आणि जीवन' याविषयी बोलले. 'आज मी तुम्हाला गणिताविषयी सांगणार आहे...' म्हणून सुरुवात केल्यावर मला खरेच आश्चर्य वाटले. या खेड्यातल्या लोकांपर्यंत हा विषय कसा पोहोचेल, ते तो कसा स्वीकारतील, असे वाटले होते. जर मला त्याविषयी एक तास बोलायला सांगितले असते तर ते शक्य झाले नसते. इतरांना फारसे माहिती नसलेला, कठीण विषय सामान्यातल्या सामान्यालाही समजेल अशा प्रकारे सांगणे सामान्य काम नाही. आपण एखादा विषय स्पष्टपणे, खोलवर, विस्तृत जाणत असला तरच इतरांना नीट, सुलभरीत्या समजावून सांगणे शक्य आहे. तुम्हाला माहीत असलेला विषय इतरांना समजेल अशाप्रकारे सांगता येत नसल्यास तो विषय तूम्हालाच पूर्णपणे कळला नाही, असा त्याचा अर्थ आहे. काहीजण इतरांना सांगताना, 'हे तुला कसे सांगावे हे मला समजेना' ऐकला असाल. आपण नीट समजून घेतले तरच इतरांना समजेल अशा प्रकारे सांगणे शक्य आहे. त्यातच इतरांना माहीत नसलेला विषय समजावून सांगणे एक आव्हान आहे. त्या दिवशी सिद्धेश्वर स्वामीजींनी खेडुतांना गणिताच्या पायथागोरस थेरम, गुरुत्वाकर्षण नियम, E=mc^2, व्यास, त्रिज्या, थर्मोडायनामिक्स याविषयी सांगत ते त्यांनी (खेडूत) समजून घेण्याच्या प्रयोजनाविषयी विवेचन केले. मी विज्ञानाचा विद्यार्थी असूनही, ते शिकूनही सत्य जीवनात गणित, विज्ञानाची सूत्रे कशी आचरणात आणली पाहिजेत, याचा विचार केला नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनात 'विमान कसा उडतो' याविषयी बोलले. कार्यक्रमात एखादाही झोपताना, जांभया देताना दिसला नाही. त्यादिवशी त्यांनी एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगितले. दहा - बारा शास्त्रज्ञांच्या नावांचा उल्लेख केला. एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगताना मधमाशाची कथा सांगितली.
'आपण सर्वजण मधमाशी पाहिलात; त्याचा देह मोठा आहे, मात्र, पंख पातळ आहेत. देहाचा आकार आणि पंख यांच्यात खूप विरोधाभास आहे. एरोडायनामिक्स नियमानुसार मधमाशी उडायलाच नको. उडणेही शक्य नाही. तरीही ते कितीतरी हजारो वर्षांपासून उडत आहे. विमानाचा शोध लागण्याच्या आधीपासून मधमाशी उडत आहे. ते कसे ?' म्हणून विचारले. 'नंतर स्वामीजींनीच विवेचन केले - ',कारण त्या मधमाश्यांना एरोडायनामिक्स थिअरी म्हणजे काय, हे माहिती नाही. त्यांनी ती थिअरी वाचली नाही. त्यामुळे ते उडत आहेत. मनुष्य ही थिअरी जाणण्यामागे मधमाशी हे एक कारण आहे. मधमाश्याप्रमाणे विमान डिझाइन केल्यास उडेल, मात्र, खूप दूरपर्यंत उडणार नाही' असे सामान्यांनाही समजेल अशाप्रकारे विवेचन केले. मनुष्यही या मधमाश्यांसारखा आहे. आपल्याला आपल्या बल आणि बलहीनता माहिती असाव्यात. भीमाला त्याची शक्ती माहिती नव्हती म्हणे. त्यामुळे त्याने दहा हत्तींसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. कृष्णाला आपल्या बलहीनतेची माहितीच नव्हती. त्यामुळे तो देव झाला.' असे सांगून स्वामीजींनी त्या प्रसंगाची खऱ्या जीवनाशी तुलना केली.
सिध्देश्वर स्वामीजी हे उत्तम व्याख्यात्यापेक्षा अद्भुत संवादक आहेत, असे अनेकदा मला वाटले आहे. व्याख्यात्यातील शाब्दिक चढ - उतार, अतिशयोक्ती, अलंकार आदी कोणतेही नव्हते. त्यात उद्वेग, उद्घोष, गर्जना, अवमानकारकही नव्हते. त्यांचे प्रवचन म्हणजे एकप्रकारे संथ वाहणाऱ्या नितळ शाल्मलेचा प्रवाह होय. तेथे कोणतीही घोषणा, खुशामत, आत्मप्रशंसा काहीही नाही. त्यांचे बोलणे अशिक्षितापासून शिक्षितापर्यंत एकाच तरंगांतराने भिडायचे. त्यांचे बोलणे कधीही श्रोत्यांना संभ्रमित करणारे नसायचे. कोणीही न ऐकलेल्या मोठमोठ्या तत्त्वज्ञानी, विचारवंत, बुद्धिजीवींच्या नावांचा ते उल्लेख करायचे. बसव, बुद्ध, अरिस्टाटल, प्लेटो, कन्फ्युशियस, गुड्जिफ, थामस अक्विनास, इमर्सन, डेव्हिड ह्युम, जॉन लोके...आदी अनेक तत्त्वज्ञानी मंडळींचे विचार प्रवचनातून मांडायचे. त्यात तत्त्वज्ञानी मंडळींचा गौरव असायाचा, ते सगळे मला माहिती आहेत, हे स्वकौतुक नव्हे. त्या महान तत्त्ववेत्त्यांचे विचार आपल्या सामान्य शेतकरी, खेड्यातील लोकांच्या ज्ञान, विचारांशी किती साधर्म्य राखतात, हे सांगण्यासाठी ते त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करायचे. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसायचा. एकदा ते प्रवचन सुरू करण्याआधी जवळच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. त्यादिवशी ते पक्ष्यांचे स्वारस्य आणि रोचक जगताविषयीच ते एक तासभर बोलले. त्यांच्या प्रवचनासाठी उभारलेल्या व्यासपीठासमोर साकारलेली सुंदर रांगोळी पाहून 'रांगोळी का घालावी, त्याचे महत्त्व काय?' याविषयीच संपूर्ण प्रवचन केले. त्यात दहाएक कथा, दृष्टांत, घटना, नीतिकथा असायच्या. स्वामीजी कोणत्याही प्रवचनाची कधीही पूर्वतयारी करत नव्हते. छोटीसी चिठ्ठीही कधी लिहून ठेवून घ्यायचे नाहीत. टिपण काढायचे तर विचारुच नका. ते लहान मुलांनाही रॉकेट सायन्स समजेल, कुतूहल निर्माण होईल अशा प्रकारे सांगायचे. त्यांच्याकडे मनगटी घड्याळ नसायचे. बरोबर एक तास होताच ते प्रवचन थांबवायचे. पुन्हा उद्या सर्वकाही नवीन असायचे.
स्वामीजींच्या बोलण्यात 'हिडन अजेंडा' नसायचे. जाती, धर्म, पंथ, कुल - गोत्रांचे प्रवर्तकपण, प्रवक्तेपण नसायचे. त्यांची मुख्य चिंता ही मनुष्य कल्याण, समाजहित असायची. त्यामुळे ते सर्वधर्मियांना आवडायचे. साधारणपणे कोणत्याही मनुष्याला कोठेतरी आपले विचार, सिद्धांत, अस्तित्व मांडण्याची इच्छा असते. त्याला छोटे मोठे का होईना पण आपलेच एक साम्राज्य उभे करण्याची हितासक्ती असते. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींची हितासक्ती स्वतःला सर्वत्र नाकारण्यातच होती. ती लौकिकापासून दूर होण्यात होती. त्यांनी स्वतः साठी कशाचीही आकांक्षा बाळगली नाही. त्यांना खासगी आणि वैयक्तिक असे काहीच नव्हते.
मनुष्याला आरामात जगण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र, त्यांनी त्याचीही आकांक्षा बाळगली नाही. पैसा पाहिल्यावर आगीला पाहिल्यासारखे व्हायचे. त्याला कधी करंगळीनेही शिवले नाही. त्यांनी ज्ञानलोकात महाल बांधला होता. त्या जगतात पैशांचा व्यवहारच नव्हता. त्यामुळे त्यांनी पैशाच्या स्त्रोतापासून निर्माण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षाच केली नाही. ज्ञान आणि विवेक यापेक्षा काहीही चांगले नाही. पैसा त्यापुढे नीरस असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांच्या जवळ आलेल्यांना त्यांनी ज्ञान व विवेक दिले. त्यातच त्यांनी सुख अनुभवले. तेवढेच नव्हे, त्यासाठीच ते आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. ज्ञान कोणीही चोरून नेऊ शकत नाही, त्याचा नाश करू शकत नाही. त्याचा ठाव कुणाला लागू शकत नाही. त्यामुळे स्वामीजी केवळ ज्ञानार्जनाच्याच मार्गाने चालले आणि त्यात ते यशस्वीही झाले. अपार ज्ञान मिळविले. त्यांनी एकट्यांनीच त्याचा आनंद घेतला नाही, तर ते संपूर्ण जगाला वाटले. ते जेथे असायचे ते ठिकाणच ज्ञानयोगाश्रम बनवून टाकले. ज्ञानयोगी झाले. त्या जगात असलेल्या आनंदापेक्षा अन्य कोठेही ते असणे शक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करताच ते 'नको' म्हणाले. मनुष्याला आनंदाने जगण्यासाठी कोणत्याही नावाची गरज नाही. नाव ओझे आहे. ओळख म्हणून ते हवे, मात्र, तेच अस्तित्व बनून राहू नये.
असे असताना नावाआधी पद्मश्री म्हणून शेपूट कशाला हवे म्हणाले. स्वामीजींनी मनात आणले कसते तर त्यांच्या ज्ञानयोगाश्रमात पैशांची नदीच वाहिली असती. त्यांना तसे भक्त, चाहतेही होते. त्यांनी फक्त डोळ्यांनी सूचना केली तरी पुरेसे होते. मात्र, ज्ञानापुढे सर्व नश्वर आहे, यावर विश्वास असलेल्या त्या सुज्ञानीने य:कश्चित गोष्टींसाठी हात पसरले नाही. व्यक्ती म्हटल्यावर साहजिकपणे गुण - दोष असणारच. नसल्यास तो देव बनतो. तसे असल्यास देवांमध्ये गुणदोष नाहीत का ? मात्र, सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यात तसे दोषही नव्हते. परंतु ही गोष्ट त्यांच्यासमोर सांगितली असती तर त्यांना सहन झाली नसती. ते संकोचाने आक्रसून गेले असते. कारण या प्रशंसेतील अपायकारकता, कृत्रिमतेची चाल त्यांना माहीत होती. ज्ञानी नावाचा चादर पांघरलेल्यांना बिरुद - उपाधी, प्रशंसा हे सगळे चिल्लर ! आपल्या वागण्या - बोलण्यात समानता राखलेल्या स्वामीजींनी आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींकडे कधीही लक्ष दिले नाही. एक संत कसा असावा याविषयी स्पष्टता होती. ते गम्य शेवटपर्यंत जपलेले स्वामीजी आगीजवळ राहूनही त्याची उष्णता न लागता बकुळ, काटेरी धोतऱ्यासारखे राहिले !
सुमारे दोन दशकांपासून माझा 'श्रीं'शी निकटचा संबंध होता. ते कोणत्याही गावी असले तरी मी संपादित वर्तमानपत्रे दररोज वाचायचे. भेटल्यावर ते त्याविषयी बोलायचे. आम्ही दिलेले मथळे आठवणीत ठेवून उद्धृत (quote) करायचे. त्यामुळे ते किती गंभीरपणे वर्तमानपत्रे वाचायचे हे समजायचे. कर्नाटकातील कोणत्याही गावी प्रवचन असले तरी माझ्या परिचित स्नेहींच्या माध्यमातून बोलवायचे. 'श्रीं'च्या सूचनेनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये भालकी येथे चाललेल्या आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा आम्ही दोघेच एका शेतातील मोठ्या झाडाखालील खूर्चीवर बसून सुमारे दोन तास केलेली लोकाभिमुख चर्चा विसरता येणारी नाही. ते संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवलेले क्षण एक सुंदर आठवण आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचन होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे 'श्रीं'चे प्रवचन ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते. सर्वत्र नीटनेटकेपणा, शिस्त होते. आलेल्या सर्वांनी आंघोळ करून, कपाळावर विभूती (भस्म) लावून स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती. इतर धर्मीयही श्रोत्यांच्या रांगेत बसलेले होते. मात्र, त्यादिवशी स्वामीजी बोललेच नाहीत. 'म्हणाले, आज भट बोलतील!' त्या पवित्र व्यासपीठावरून बोलण्याचे सौभाग्य स्वामीजींनी दिले. त्यादिवशी भालकीच्य हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरु आणि सुत्तुरु मठाचे जयराजेंद्र स्वामीजीही व्यासपीठावर होते. सिद्धेश्वर स्वामीजींनी दिलेली ती 'भेट' माझ्यासाठी शाश्वत आठवणीत राहणारी आहे.
ज्ञानाला मरण नाही, ती शाश्वत आहे. ज्ञानींचेही तसेच आहे. तसे ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजींनाही. ते अमर आहेत. ते दोन्ही अर्थांनी 'प्रज्ञावंत!'
- विश्वेश्वर भट, संपादक, विश्ववाणी
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
Thursday, 23 February 2023
गोविंदराव पानसरे हत्या : त्यांना लढाई एकट्याने लढायचे आहे
२३ फेब्रुवारी २०१५
कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या निंदनीय आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जायला हवी. मात्र, नरेंद्र दाभोलकर व त्यानंतर पानसरे यांची हत्या पाहता तसे होताना दिसत नाही. या हत्यांचा तातडीने तपास होऊन सत्य बाहेर यायला हवे. त्यासाठी सर्वच विचारप्रवाहांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवावा. परंतु पानसरे यांच्या हत्येनंतरच्या पुरोगामी मंडळींच्या बिनबुडाच्या प्रतिक्रिया पाहता हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करत त्यांना ही लढाई एकट्यांनीच लढायची आहे. परंतु ती कशासाठी, हे मात्र संशयास्पद आहे. कारण पानसरे यांच्या हल्ल्यानंतरच्या पहिल्या क्षणापासूनच अशी वक्तव्ये सुरू झाली की, हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले, जेणेकरुन ते या लढाईत त्यांच्यासोबत उतरुच नयेत. दाभोलकर व पानसरे या दोघांची हत्या आणि त्यासाठी वापरलेली नीती यातील साम्य आणि यांचा समान वैचारिक विरोधक यामुळे ते हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करत आहेत. युक्तीवादापुरते जरी मान्य केले तरी दाभोलकर हत्येवेळी राज्यात हे पुरोगामी विचारवंत उठता बसता ज्यांची जपमाळ ओढतात त्या पुरोगाम्यांचेच तर सरकार होते. मग ते आरोपींपर्यंत का पोहोचले नाहीत. काही पुरोगामी यामागे कोणाचा दबाव आहे, असाही सवाल करताना दिसत आहेत. परंतु ते हा प्रश्न थेट या सरकारची सूत्रे ज्यांच्या इशार्यावर हलायची, त्या आपल्या प्रिय नेत्यालाच का विचारत नाहीत. तसे केले असते आणि त्यासाठी रान पेटवले असते तर आज आरोपी गजाआड असते ना. का केवळ या हत्यांचे राजकीय भांडवल करुन ते ज्यांना पुरोगामी समजून सातत्याने तळी उचलतात त्या पक्षांना भविष्यात केवळ राजकीय लाभ मिळवून द्यायचा आहे. दुसरा मुद्दा देशात व राज्यात हिंदुत्ववाद्यांचे सरकार आल्याने हे घडते आहे, असा यांचा आरोप आहे. का देशात आणि राज्यात यापूर्वी हत्याच झाल्या नाहीत? (हा प्रश्न विचारण्यामागे भाजपच्या राज्यात हत्या झाल्या तर चालतील अथवा व्हाव्यात असा उद्देश असल्याचे कुणी समजू नये. ) माहिती अधिकार कार्यकर्ते शेट्टी यांची हत्या तर पुरोगाम्यांच्या राज्यातच झाली.स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या, सहा प्रचारकांचे अपहरण, केरळातील संघ स्वयंसेवकांच्या हत्या याही घटना त्यांच्याच काळात तर घडल्या. का ती माणसं नव्हती? त्यांच्या जीवनाचे मोल नाही? या दुटप्पी नीतीतून इतकेच दिसते, यांना मारेकरी सापडावा यात आणि वैचारिक लढाईत रस नाही तर राजकारणात रस आहे. कारण भाजप सत्तेत येऊच शकत नाही, अशी या पुरोगाम्यांची भविष्यवाणी होती. ती खोटी ठरली. आणि ते सत्तेवर आलेच कसे, ही खरी पोटदुखी आहे. त्यामुळे सत्ताधार्यांची बदनामी हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. यांचा हिंदुत्ववाद बदनाम व्हावा, हा एकच अजेंडा पूर्वीही होता, आणि आताही असल्याचे या एकूणच वक्तव्यांवरुन दिसते. मिशनर्यांच्या हत्येतही हिंदुत्ववादी असल्याची ओरड या पुरोगाम्यांनी केली होती. परंतु ती खोटी ठरल्यानंतर या पुरोगाम्यांनी माफी मागितली का, तर नाही. पुरोगाम्यांच्याच भाषेत इतिहासाचे मढे उकरल्यासही यांची दुटप्पी नीती दिसते. पानसरे यांच्या हत्येनंतरही गोडसे प्रवृत्तीचा उल्लेख सुरू आहे. महात्मा गांधीजींची हत्या निंदनीयच होती. मात्र, त्यापूर्वी स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली, याचा पुरोगामी कधी उल्लेख करताना दिसत नाहीत. का स्वामी श्रद्धानंद माणूस नव्हते? का केवळ ते हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांच्या हत्येचा उल्लेख टाळायचा? पुरोगाम्यांनो, इतके मानवतावादी, गांधीवादी असाल तर गांधींनी स्वामी श्रद्धांनदांच्या मारेकर्याला माफ करायला सांगितले तसे आपण अजुन गोडसेला का माफ केले नाही? प्रत्येक निवडणूक आल्यावर कॉंग्रेसचा पुढारी जे बोलतो तेच या पुरोगामी बोरुबहाद्दरांच्या लेखणीतून का पाझरते. त्यावेळी गोडसे, गोडसे का सुरू होते. गोडसे वगळला तर कॉंग्रेसचे भांडवलच संपणार आहे. कारण मते कशाच्या आधारावर मागायची, हा प्रश्न कॉंग्रेससमोर असेल. परंतु मानवतेचे गोडवे गाणार्या पुरोगाम्यांना कशाची भीती आहे? स्वातंत्र्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा रहस्यमय मृत्यू, रेल्वे प्रवासात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा खून झाला. त्याची चौकशी होऊन मारेकर्यांना शिक्षा व्हावी, हे आपल्याला का वाटले नाही? कृष्णा देसाईच्या खुनाचेही तसेच. उठसूठ त्याचा दाखला देणार्यांना त्यापूर्वीची डाव्यांची मुंबईतील गुंडगिरी आणि त्यांनी पाडलेले खून याविषयी कधी का लिहावेसे वाटले नाही? का तुमचा पुरोगामीपणा हा कोणत्या विचाराच्या कार्यर्त्याचा खून झाला, यावर ठरतो का?डाव्यांनी केलेले खून, त्यांची गुंडगिरी, लोककल्याणकारी असल्याचे म्हणायचे आहे काय? हत्या कोणाचीही असो, ती मानवतेला काळीमा फासणारी, लोकशाहीला नख लावणारी असते, असे का वाटत नाही?
- अप्पासाहेब हत्ताळे
Wednesday, 22 February 2023
निर्मोहत्वाचा मार्गदर्शन केलेले खरे संत
दहा लोक जरी जमले तरी रसाळ बोलणारे राज्यात सर्वत्र सापडतील. यक्षागानाप्रमाणे अभिनयासह भाषण करणारे कलाकारही अनेक आहेत. चढ उतार, व्यंगात्मक शरसंधान करून, थोडा मसाला घालून भाषणालाच कलाकृती बनवून टाकणारे वक्तेही आहेत. टाळ्या मिळविणारे वक्तेही आहेत. भाषणाने समाजातील वाईट गोष्टी दूर करू हा भ्रम बाळगणारेही आहेत. चार व्यासपीठांवर बोलण्याची संधी मिळताच विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवणारेही आहेत ! मात्र, हे तसे नाहीत. बोलण्यात चढ - उतार नाही. त्यांना प्रवचनाला लोकांना जमवण्याची गरज भासली नाही. त्यासाठी बोलले पाहिजे ही त्यांची इच्छाही नाही ! समाजात त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले अनेकजण आहेत; व्याख्याने देणारेही आहेत, मूल्ये देणारेही आहेत. मात्र, समाजाने यांना दिलेला सन्मान त्या कोणालाही दिला नाही ! म्हणजे समाजाला ते सर्वजण तसे वाटले नाहीत. यांना अवधूत मानल्यास तशा बिरुदावल्या नाहीत. त्यांनी कधीही पापाचे पुण्यात रुपांतर करण्याचा दावा केला नाही. लोकांनीही त्यांच्याकडून ती अपेक्षा केली नाही. नावापुढे पीठाधिपतिपदाचे विशेषण लावले नाही, जातीचे बंधन पाळले नाही. कोणीही त्यांचा अनुयायी म्हणून दावा केला नाही. कोणा मंत्र्यालाही विशेष दर्शन दिले नाही. स्टुडिओत बसून प्रवचनांचे रेकॉर्ड करवले नाही. कोणाही राजकारण्याला शाल पांघरुन स्तुतिसुमने उधळली नाहीत. तेवढेच कशाला नेसलेल्या कपड्याला खिसा नाही, बसलेल्या खुर्चीलाच पीठ मानले, भगवी वस्त्रे धारण करण्याची संधी असतानाही ती धारण केली नाहीत. कोणाच्या मर्जीखातर अथवा त्याच्या दबावाखाली राहिले नाहीत. ते जसे होते तसेच राहिले. सर्वांना आपण आहात तसेच राहायला सांगितले. धावपळ न करता हे जीवन सुखी व समृद्ध बनवणे हेच साध्य आहे. अशाप्रकारे धर्माचे परमोत्कृष्ट निरुपण केलेले सिद्धेश्वर स्वामीजी हे खरे संत होत. त्यांच्या अंतिम यात्रेला १५ लाखांहून अधिक लोक जमले होते.
आजच्या भडक युगात जे गुण कालबाह्य समजले जातात त्या सर्व गुणांनी संपन्न एका व्यक्तीच्या अंतिम यात्रेला इतके लोक का जमले हे आश्चर्यकारक आहे. आजचा काळ हा तसे जगण्याचा नाही, ही भावना दिवसेंदिवस वाढीस लागली असताना त्याच गुणांनी ते जीवंत देव म्हणून ओळखले जाणे हे अतार्किक आहे. होय, हे न सोडवता येणारे कोडे आहे. सोशल मीडियात खरडून, मेकअप करुन कॅमेऱ्यासमोर तोंड दाखवत महान चिंतक म्हणून मिरवणे, बड्या मंडळींशी असलेल्या संबंधांचा इतरांना पायदळी तुडवण्यासाठी अस्त्र म्हणून वापर करण्याचे प्रकार फोफावत असताना अशी व्यक्ती आपल्यात होती, हे आश्चर्यकारक आहे. मग सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यात असलेली वैशिष्ट्ये तरी काय आहेत ? स्वतःला एक सामान्य मनुष्य समजणाऱ्या माणसावर समाजाने इतके प्रेम कसे केले ? 'बड्या मंडळीं' त नसलेल्या कोणत्या गोष्टी यांच्यात होत्या ? हा सध्याचा प्रश्न आहे. मात्र, त्याचे उत्तर धर्म विषयावरील अत्यंत सोप्या प्रवचनात आहे. कारण धर्म म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे. ती आचरणात आणायची गोष्ट आहे, उपदेश करण्याची नव्हे. अथवा आचरणानुसार त्याविषयी उपदेश करावा. त्यामुळे वेळोवेळी धर्म उपदेशकांनी आधी त्याचे आचरण केले, लोकांना सांगितले. आपण धर्ममार्गावर चालल्यानंतर त्याचा प्रचारक बनले. त्यामुळे धर्मप्रचारकांचे वैशिष्ट्य हे त्यांचे गुण समजण्याऐवजी ते धर्माचे गुण म्हणणे अधिक योग्य होईल. सिध्देश्वर स्वामीजी यांच्यात असा धर्म होता.
हजारो वर्षांपासून धर्माविषयी सांगितलेले सर्वजण तसे जगले होते. त्यांचे जीवनच एक धडा आहे. तसे जगलेल्यांचे समाज ऐकायचा. त्या गुणामुळेच समाजाने सिद्धेश्वर स्वामीजींचे अनुकरण केले. वेळोवेळी समाजाला त्यांच्या सारख्यांची आवश्यकता निश्चितच आहे. कारण अशा लोकांशिवाय जगात आदर्श, सत्य आणि धर्म यांचे मूल्यांमध्ये रूपांतर होणार नाही. मूल्ये नसलेल्या जगात दुष्ट लोक धर्मात्मा म्हणून ओळखले जाण्याचा, रमणाश्रमाला जाणारे परम सात्विक समजले जाण्याचा, अहंकाराच्या नशेत चूर लोक महात्मा होण्याचा धोका संभवतो. धूर्त लोक नैतिकतेचा मुखवटा पांघरुन समाजात मिरवतील. एकीकडे यांच्याभोवतीची मंडळी त्यांच्या वाईट गोष्टींचा विरोध न करता, दुसरीकडे ते चांगुलपणा आचरणात न आणता दोलायमान स्थिती निर्माण होते. ही पूर्वीपासूनच जगाची रीत बनली आहे. मात्र, त्या त्या काळात जगात अवतरलेल्या काही सत्पुरुषांनी मूल्यांचे पालन करीत तसे जगून दाखवले आहे. भारतात असे कितीतरी अवधूत होऊन गेले. त्यात अलिकडे होऊन गेलेल्या रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी यांचा उल्लेख करता येईल. सिध्देश्वर स्वामीजीही तसे जगले. होऊन गेलेले दार्शनिक, योगी तसेच होते. कारण भारत नावाच्या महालाला धर्म हाच खांब होय ! त्यामुळे या मातीने केवळ सत्य सांगणाऱ्या, धर्माचे आचरण करणाऱ्यालाच सत्पुरुष मानले आहे. तशाप्रकारे सिद्धेश्वर स्वामीजी जगले. तसेच तशाप्रकारची श्रद्धा समाजात रूजवली. ती श्रद्धा रुजवण्यासाठी वाक्चातुर्याची आवश्यकता नाही. शिवाय संघटनेच्या ताकदीचीही गरज नाही, हे सिद्धेश्वर स्वामीजींनी दाखवून दिले. आज दांभिकता शिखरावर आहे. अशा काळातही हे साध्य असल्याचे सिद्धेश्वर स्वामीजींच्या जगण्यातून दिसून येते.
जे अल्लम, सर्वज्ञ, बसवादि शरणांना अत्यंत सहजपणे गवसले तेच सिद्धेश्वर स्वामीजींनीही मिळविले. जे शंकराचार्यांना चांडाळामुळे प्राप्त झाले, ज्याची रामानुजाचार्यांनी देवस्थानच्या गोपुरावरून घोषणा केली तेच चिंतन सिद्धेश्वर स्वामीजींनी मांडले. रमण महर्षींनी 'तुझ्या अंतरंगातही बघ' म्हणून सांगितले. सिद्धेश्वर स्वामीजीही तशाच प्रकारे जगले. सिद्धेश्वर स्वामीजी यांचे जीवन इतके साधे आणि शांत होते की 'जीवन अनुभवांचा प्रवाह' आहे ही जाणीवच त्यावर उपाय ठरू शकते. ती जाणीव आत नव्हे आणखी कोठे शोधायची ? अनुभवण्यासाठी असलेले जीवन अनुभवांचा प्रवाह नव्हे, आजचे आजच ही मनोवृत्ती संपवण्यासाठीच जगलेल्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी देहत्यागानंतर समाजाला आणखी एका उंचीवर नेले. भारतात होऊन गेलेले बहुतेक महापुरुष हे मृत्यूनंतर जगाला अधिक प्रस्तुत ठरले आणि लोकप्रिय झाले. रमण महर्षी यांना पाहिले तरी कळेल. आपल्या जीवनात कधीही तिरुवन्नामलै सोडून कोठेही ते गेले नाहीत. मात्र, मृत्यूनंतर संपूर्ण जगच तिरुवन्नामलैला येण्यासारखे केले. रमण महर्षी हे आपल्याकडे येणाऱ्या काही भक्तांना मी एक वेडा असल्याचे सांगायचे. सिद्धेश्वर स्वामीजींसारखे रमण महर्षीही पापाचे पुण्यात रूपांतर करून देईन, चमत्काराने उद्धार करेन, असे कधीही सांगितले नाहीत. ते महर्षी बनले. म्हणजे गोंधळाविना जीवन कसे जगायचे हे सांगितले. त्यामुळे सिद्धेश्वर स्वामीजीही महर्षीच होत.
जे बोलल्याप्रमाणे जगले तेच जगात मोठे झाले आहेत. आज कसे जगायचे हे सांगण्यासाठी मॅनेजमेंट कोर्स आहेत. त्याविषयी सेमिनारमध्ये लीलया पटवून देणारे मॅनेजमेंट गुरुही आहेत. मात्र, जीवनविषयक जाणीव ? धार्मिक जाणीव ? अशा काळात सिद्धेश्वर स्वामीजींनी लोकांना या दोन्ही जाणिवा दिल्या. देशात धार्मिक जाणीव दिलेले काही मठाधीश आहेत. काही मठाधीशांनी केवळ जीवनविषयक जाणीव दिले आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींनी दोन्ही जाणिवा दिल्या. विद्वानांसाठी त्यांनी जसे कैवल्य सूत्र, नारद सूत्र, आनंद योग, पतंजल योगसूत्रावर भाष्य लिहिले तसे सामान्यांसाठी कथामृत, अंतरंगद कृषी, भगवत चिंतन, नानू यारू आदी पुस्तके लिहिली. आपल्या प्रवचनांतून पंचमहखभूतांच्या माध्यमातून मूल्यांचा उपदेश केला. समाजाच्या सर्व वर्गापर्यंत पोहोचतील अशा सर्व विषयांना स्पर्श केला. त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले.
ऋषींना स्वतः धर्म आणि आपल्या शरीराला प्रयोगशाळा समजण्याची ताकद असते. त्याला दधिची, अगस्त्य यांच्यासारख्या महाऋषींची उदाहरणे आहेत. सिद्धेश्वर स्वामीजींनी तसे प्रयोग केले. आचारांचा मूळ उद्देशच धर्माचरण आहे. धर्माचरणासाठी आचरण हे डबके बनू नये, हे सांगण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. एकदा सिद्धेश्वर स्वामीजी हे शिष्यांसह बंगळुरुच्या सुत्तुरू मठाच्या केतोहळ्ळी आश्रमात मुक्कामी होते. एके दिवशी सकाळी त्यांच्या शिष्यवृंदापैकी एक असलेले गदगच्या शिवानंद मठाचे जगद्गुरु सदाशिवानंद यांना लिंगपूजेसाठी वेळेवर बेलपत्र सापडले नाही. ते त्याच्या शोधात होते. ते पाहून सिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, "जर बेलपत्र नसेल तर तुळशीपत्राने पूजा उरका. भक्तिभावाने अर्पण केल्यास ते सर्व भगवंतापर्यंत पोहोचेल. सतत त्या लिंगाची आराधना केल्यास पुढे त्यात पांडुरंगही असेल !" अशी समग्रता, विशालता, धर्मविषयक जाणीव असलेले सिद्धेश्वर स्वामीजी हे दुर्मिळ संत होते. अशाप्रकारची जाणीव असलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींनी सहजपणे समाजाशी जवळीक साधली. दिवसातील बराचवेळ चेकवर स्वाक्षऱ्या करण्यात घालविणारे स्वामीजी सहजपणे मठाधिपती म्हणून मिरवू शकतील. मात्र, ते समाजाशी जवळीक साधू शकणार नाहीत.
जीवनाची तुलना 'बयलु'शी करणाऱ्या अनुभावींच्या वचनांना पाठ्यपुस्तकांपुरते सीमित करणारे हे जग, काम असताना तो रुद्रासारखा, काम गेल्यावर दुसऱ्याच दिवशी तो उडणारा गरुड पाहा असे सांगितलेल्या सर्वज्ञांना, निसंगत्व - निर्मोहत्व - निर्मलत्व सांगितलेल्या शंकराचार्यांना जातिय नजरेतून पाहते. मात्र, आपल्या काळातच जगलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या जीवनाचे यथार्थ पालन केल्यास जगाच्या काही समस्या सुटतील. तसेच जगात शांती नांदेल. आता अशांचा जन्म कधी ! त्यामुळे तरी जगाला सिद्धेश्वर स्वामीजी यांची आठवण येतच राहावी.
- संतोष तम्मय्या, कार्यकारी संपादक, होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
हरिका : तेव्हाची अन् आताची
हरिकाचे सोलापुरातील पहिले व्याख्यान आज झाले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी जुळे सोलापूर शाखेने विश्वबंधुत्व दिनानिमित्त या व्याख्यानाचे आयो...
-
ಎಲ್ಲ ವೀರಶೈವರು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಹೊಂದಿದ್ದು, ಹಲವು ದೈವಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯಿರುವವರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವೇದ-ಸಂಸ್ಕೃತ ಪಾಠಶಾಲೆಗಳನ್ನು ಹಲವು ವೀರಶೈವ ಮಠಗಳು ನ...
-
ವೀ ರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಹೋರಾಟ ಸದ್ಯಕ್ಕೆ ತಣ್ಣಗಾಗುವ ಲಕ್ಷಣವಿಲ್ಲ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಬೇಡಿಕೆಯು ಧರ್ಮವನ್ನು ಇಬ್ಭಾಗಗೊಳಿಸು...
-
माझ्या शालेय आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात ‘ दैनिक संचार ’ मधील ‘ नौबत ’ आणि ‘ चिंतन ’ या दोन सदरांचा माझ्यावर प्रभाव राहि...











.jpeg)

.jpeg)
