Wednesday, 23 August 2023

आधुनिक कर्ण शिरसंगी लिंगराज देसाई यांचे घराणे मूळचे सोलापूरचे !



उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील शैक्षणिक विकासात दिलेय अपूर्व योगदान

-अप्पासाहेब हत्ताळे

शैक्षणिक क्षेत्रात उत्तर कर्नाटकाचा विकास झाला. धारवाड विद्येचे माहेरघर बनले. तर महाराष्ट्राच्या सीमाभागातील सोलापुरात अण्णप्पा काडादी प्रशाला, अक्कलकोटला मंगरुळे प्रशाला, बार्शीत सिल्व्हर ज्युबिली प्रशाला आदी शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. यामुळे केवळ वीरशैव लिंगायत समाजातीलच नव्हे तर समाजाच्या सर्वच वर्गातील वंचित समाजघटकांना शिक्षण मिळाले. संपूर्ण उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील अशा अनेक शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेऊन अनेकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत उन्नत स्थान मिळवले.  या शैक्षणिक संस्थांचे नाव घेतल्यावर केएलई (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी) सारख्या शिक्षण संस्थांचे नाव समोर येईल. मात्र, या उदात्त व पवित्र कार्यासाठी आपले सर्वस्वच अर्पण करणारे त्यागवीर लिंगराज देसाई क्वचितच आपल्याला आठवत असतील. कारण त्यांच्यासारख्यांच्या अतुलनीय दातृत्वातून आणि श्रमातून उभ्या राहिलेल्या बहुतांश शिक्षण संस्था कुरणं आणि राजकीय अड्डे बनले आहेत. आज लिंगैक्य लिंगराज देसाई यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कळकळीला, त्यांच्या दानशूरतेला उजाळा देण्याचा, त्यांच्या स्मृती जागविण्याचा अल्पसा प्रयत्न. 
शिक्षणात अत्यंत मागासलेला उत्तर कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समाज आज सुशिक्षित होऊन समाजाच्या अनेकविध क्षेत्रात प्रगत बनला आहे. यामागे १९ व्या शतकात समाजात होऊन गेलेल्या मठाधीश, समाजधुरिणांसह शिरसंगीचे सरदेसाई लिंगराज देसाई यांच्या असामान्य व अलौकिक दातृत्वाचे योगदान आहे. त्यांनी वार्षिक सुमारे ६० - ७० हजार रुपये उत्पन्नाची संपूर्ण जहागीरच समाजाच्या शिक्षण कार्याला अर्पण केली. केवळ वीरशैव लिंगायत समाजालाच नव्हे तर देशातील सर्व दानी लोकांसमोर एक उदात्त आदर्श घालून दिला. अशा या महान पुरुषाविषयी उत्तर कर्नाटकातील जनतेला माहिती असली तरी महाराष्ट्रातील समाजबांधव त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे लिंगराज देसाई यांचे घराणे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहे.











देसाई घराणे दक्षिण सोलापूरचे !
शिरसंगीकर देसाई यांच्या घराण्याला ४०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. या घराण्याच्या संस्थापकाचे, मूळ पुरुषाचे नाव विठ्ठप्पा. ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद गावाचे पाटील होते. ते शूर लढवय्ये व पराक्रमी होते. १६ व्या शतकात विजयपूरच्या इब्राहिम अदिलशहाच्या कारकिर्दीधधत त्यांनी पराक्रमाने व कर्तृत्वाने सरदारकी व आजच्या कर्नाटकातील कोकटनूर परगण्याची देसगत मिळविली. त्यानंतर अली अदिलशहाच्या काळात १५६५ मध्ये विजयनगरचे साम्राज्य आणि मुस्लिमांत प्रसिद्ध ऐतिहासिक तालिकोटची लढाई झाली. यात विठ्ठप्पा पाटिल यांनी मुस्लिमांना साथ देत पराक्रम गाजवला. त्यामुळे बादशहाने त्यांना नवलगुंद संस्थानची जहागीर व तीन लक्ष वराहांचा 'मुंडीपाच्छा' पदवी बहाल केली. त्यानंतर त्यांनी बादशहाच्या इच्छेनुसार तेव्हाचा अत्यंत मजबूत तोरगल किल्ला व त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकला. बादशहाने त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन १५६६ मध्ये त्यांना तोरगल प्रांताचे सरदेसाई म्हणून नेमले. औरादसारख्या एका खेड्याचे पाटील असलेले विठ्ठप्पा पाटील आपल्या पराक्रम व कर्तृत्वाने कोकटनूर परगणे, नवलगुंद संस्थान आणि तोरगल प्रांत एवढ्या मोठ्या प्रांताचे सरदेसाई बनले. 
त्यांच्या घराण्यात प्रसिद्धीस आलेले दुसरे थोर पुरुष म्हणजे जायप्पा पाटील होत. बुद्धिमान व कर्तबगार असलेल्या जायप्पा यांनी अत्यंत प्रयासाने आपल्या जहागीरीचा विस्तार केला. सध्याचा सौंदत्तीचा किल्ला त्यांनीच १७३४ मध्ये बांधला. सरदेसाई यांची ही जहागीर उत्तरेस पेशवे, दक्षिणेस हैदर अली - टिपू यांच्या सीमेवर होती. त्यांच्या त्रासामुळे जहागीरीत सतत चढउतार होत राहिली. ब्रिटिश सत्ता स्थापनेनंतर त्यांच्या घराण्याला व देसगतीला स्थिरता लाभली. 



लिंगराज देसाई यांचे दत्तक विधान
धारवाड जिल्ह्यातील वनशिंग्ली या खेड्यातील गरीब शेतकरी घराण्यात १० जानेवारी १८६२ रोजी लिंगप्पाचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव रामप्पा होते. त्यांच्या वडिलांचे नाव धुळप्पा होते. त्यांचे चौथे पुत्र असलेले लिंगप्पा जात्याच सुदृढ, देखणे व बाणेदार होते. सरदेसाई यांच्या घराण्यातील शेवटचे देसाई जायप्पा हे निपुत्रिक वारले. तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी गंगाबाई यांनी मूल दत्तक घेण्याचे ठरविले. अशा घराण्यात दत्तक पुत्राची निवड योग्यायोग्यता न पाहता वशिलेबाजीने होते, हे आपण जाणता. मात्र, गंगाबाई निर्भीड, कर्तव्यदक्ष आणि धीट स्वभावाच्या होत्या. त्यांनी कोणाची भीड न बाळगता दत्तकपुत्र निवडीसाठी आपल्या नात्यातील सर्व घराण्यांमधील मुलांना भेटीला बोलावले. रामप्पा सुदृढ, देखणा व बाणेदार असल्यामुळे धुळप्पा यांनी त्यालाच देसाईण गंगाबाई यांच्या भेटीला पाठवले. कर्मधर्म संयोगाने रामप्पा त्यांच्या पसंतीस उतरल्याने कायदेशीर आणि विधियुक्त दत्तक विधानानंतर त्याचे लिंगप्पा असे नाव ठेवण्यात आले. परंतु त्या घराण्यातील रिवाजाप्रमाणे सर्व लोक त्यांना अप्पासाहेब म्हणू लागले. दत्तक विधानावेळी ते ११ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी मातोश्री गंगाबाई यांनी त्यांना कोल्हापूरला पाठवले. परंतु थोड्याच काळात त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची सवत उमाबाई लिंगप्पा यांच्या दत्तक विधानास सरकार दरबारी आव्हान दिले. त्यामुळे लिंगप्पा यांना शिक्षण अर्धवट सोडून गावी परतावे लागले. शिवाय न्यायालयात खेटे मारावे लागले. १८८० मध्ये कमिशनर क्राफर्ड यांनी त्यांचे दत्तक विधान रद्द ठरवले. त्या विरोधात लिंगप्पा यांनी मुंबई सरकारकडे अपील केले. १८८१ मध्ये मुंबई सरकारने त्यांचे दत्तक विधान वैध ठरवून त्याला मंजुरी दिली. 


मुळातच शेतकरी घराण्यातील असलेले लिंगप्पा हे बुद्धिमान व कर्तबगार होते. दत्तक कायम झाल्यावर त्यांनी जहागीरीची नीट घडी बसवून उत्पन्न वाढवले. जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. दुष्काळी भागातील त्यांच्या जहागीरीतील जनतेला सतत त्याचे चटके सहन करावे लागत होते. पाण्याची व्यवस्था नसल्याने शेती तोट्यात होती. त्यासाठी त्यांनी एक लाख रुपये खर्चून भवानी तलाव बांधला. शिवाय पटबंधाऱ्याने शेतीला पाण्याची सोय करून दिली. आपला देश शेतीप्रधान आहे, ती सुधारल्याशिवाय तरणोपाय नाही, हे ओळखून त्याच्या सुधारणेसाठी अनेक प्रयत्न करतानाच सोयी, सवलती दिल्या. 
लिंगप्पा उर्फ अप्पासाहेब देसाई हे सद्गुणी, उद्योगप्रिय व उदार मनोवृत्तीचे होते. त्यांचे शालेय शिक्षण केवळ इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत झाले तरी त्यांचा वाचनव्यासंग दांडगा होता. त्याद्वारे त्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली होती. समाज विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी अनेक गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत केली. तसेच ते वीरशैव लिंगायत समाजाने सुरू केलेल्या समाजोद्धाराच्या कार्यातही सहभागी होत होते. तेव्हा गिलगिंची व अर्ताळ यांनी समाजासाठी लिंगायत फंडाची सुरुवात केली होती. १९०३ मध्ये  अप्पासाहेबांनी काही जमीन विकून त्या फंडाला २० हजार रुपयांची देणगी दिली. समाजाच्या व्यापार, उद्योग वाढीसाठी संघ स्थापन करून आर्थिक उन्नतीला चालना दिली. समाजातील अनिष्ट चालीरीती संपवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.  परमपूज्य शिवयोगी श्री हानगल कुमारस्वामी यांच्या योजनेनुसार स्थापन झालेल्या अखिल भारत वीरशैव महासभेला सक्रिय मदत केली, शिवाय सुरूवातीपासून त्यांचा तितकाच सक्रिय सहभाग राहिला. धारवाड येथे भरलेल्या महासभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांचे सामाजिक कार्य पाहून मुंबई सरकारने त्यांना मुंबई कौन्सिलचे सदस्य म्हणून नेमले होते. तसेच मजिस्ट्रेटचे अधिकारही दिले होते. 
सार्वजनिक जीवनात गढून गेलेल्या अप्पासाहेबांना व्यक्तिगत जीवनात सुख लाभले नाही. त्यांची पहिली प्रिय पत्नी निपुत्रिक वारली. त्यानंतर दुसऱ्या पत्नीपासून झालेली दोन मुले अल्पायुषी ठरली. ही चिंता त्यांना रयतेच्या, समाजाच्या चिंतेपासून दूर सारू शकली नाही. उलट वैराग्य वृत्ती दृढ झाल्याने समाजोद्धाराचा मार्ग प्रशस्त झाला. वंश चालवण्यासाठी मूल दत्तक घेण्याऐवजी आपल्या जहागीरीची संपूर्ण संपत्ती समाजाच्या शैक्षिक कार्यासाठी समाजालाच सुपूर्द करण्याचा निश्चय केला. तसेच आपला हा निश्चय कुटुंबीय, नातेवाईक व स्नेहीजनांना कळविला. तेव्हा एखादा संस्थानिक अथवा जहागीरदार असणे भूषण मानले जायचे. त्यामुळे आपल्या समाजाची ही जहागीर अशीच नष्ट होऊ नये, यासाठी त्या साऱ्यांनी त्यांना त्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र, त्यापासून ते किंचितही ढळले नाहीत. त्यावर ते ठाम राहिले. 


दत्तक घेतल्यास एखाद्या मुलाचा उद्धार होईल.  समाजाची सर्व मुले ही आपलीच मुले आहेत. त्या सर्वांचा उद्धार करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. एवढेच नव्हे तर हे सत्कार्य दत्तकापेक्षा शतपटीने श्रेयस्कर आहे, असा खडा जवाब त्यांनी आप्तेष्टांसह स्नेहीजनांना दिला. शेवटी सर्वांना ही गोष्ट पटली. त्यानंतर ६ जून १९०६ रोजी सर्व जहागीरीचा ट्रस्ट करुन तो जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवला. हा दिवस खरोखरच वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासात सूवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखा आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक कार्यासाठी मदतीकरिता त्यांनी करुन ठेवलेल्या या ट्रस्टमध्ये शेतकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम व सढळ हाताने मदत द्यावी, असे एक कलम त्यांनी घालून ठेवलेले आहे. यावरुन त्यांच्या चाणाक्षतेची, दूरदृष्टीची व त्यांना शेती सुधारणेविषयी असलेल्या कळकळीची कल्पना येते. 


ट्रस्टचा कारभार सुरू झाला तेव्हा त्याच्या मिळकतीचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६५ हजार रुपये होते. त्याच्या व्यवस्थेकरिता २० हजार रुपये खर्च व्हायचे. उर्वरित  45 हजार रूपये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर खर्च  केले जातात. आजपर्य़त लाखो विद्यार्थ्या़नी कोट्यवधी रूपया़चा लाभ घेतला आहे. असा महान दानवीर, दासोही गणेश चतुर्थीच्य़ा दिवशी 23 ऑगस्ट 1906 रोजी लि़गैक्य झाला. त्या़च्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!





Sunday, 2 July 2023

भास्कराचार्यांच्या भूमीतला ज्ञानसूर्य



विजयपूर जिल्ह्यातील बिज्जरगी ही पुण्यभूमी. या गावातील दोन नक्षत्रांनी आपल्या ज्ञान प्रकाशाने नभांगण सुंदर बनवले. १२ व्या शतकात आकाशात स्थान मिळवत पहिले नक्षत्र अमर झाले तर दुसर्‍या नक्षत्राने वैकुंठ एकादशीला गोधुली मुहूर्तावर आकाशी पोहोचले. भास्कराचार्य हे विज्ञान, गणित क्षेत्रात चमकले तर आध्यात्मिक क्षेत्रात श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी हे ध्रुव तारा बनले. 

विख्यात खगोलशास्त्रज्ञ, गणिततज्ज्ञ भास्कराचार्य  यांचा जन्म झालेल्या बिज्जरगी गावातच श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी जन्मले, हा निश्‍चितच योगायोग नाही. त्या मातीचे ते गुण आहे. अनेक प्रतिभावंत तेथे जन्माला आले आहेत. 

भास्कराचार्य बिज्जरगीचे, कर्नाटकातील हे या भागातील लोकांना माहीत नव्हते. तेवढेच कशाला, कर्नाटक सरकारलाही माहीत नव्हते. हा विषय सिद्धेश्‍वर स्वामीजींनीच उजेडात आणला. आपल्या प्रवचनात सॉक्रेटिस, रुसो, अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासारख्या तत्त्वज्ञानींसह गॅलिलिओ, न्युटन, कणाद, आर्यभट आदी वैज्ञानिकांचाही ते उल्लेख करायचे. तेव्हा ते भास्कराचार्यांचीही स्मृती जागवायचे. भास्कराचार्य बाहेरचे नव्हेत, याच बिज्जरगीचे. ते विश्‍वश्रेष्ठ वैज्ञानिक, त्यांनी गणितजगताला दशमान पद्धतीची ओळख करुन दिली. ग्रहांची हालचाल मोजण्याची अचूक सूत्रे दिली. तेच बीजगणिताचे जनक. ते आपले असल्याचा अभिमान हृदयी असावा, असे ते सांगायचे. 

भास्कराचार्यांविषयीचा अभिमान केवळ त्यांच्या प्रवचनापुरते सीमित नव्हते. विजयपूरच्या ज्ञानयोगाश्रमात ‘भास्कर बळग’चीही स्थापना केली. त्या माध्यमातून भास्कराचार्यांविषयी अध्ययन केलेल्या, त्याविषयी आसक्ती असलेल्या लोकांना एकत्र आणले. भास्कराचार्यांची ९०० वी जयंती  दूरच्या कॅनडामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ते पाहून स्वामीजींनी ते जन्मलेल्या जिल्ह्यात एक मोठा कार्यक्रम घेण्याविषयी सूचना केली. त्यानुसार २०१६ मध्ये विजयपुरात भास्कराचार्यांचा ९ वा शतमानोत्सव साजरा करण्यात आला. स्वामीजींच्या विचाराला कर्नाटक सरकारनेही प्रतिसाद दिला. अक्कमहादेवी महिला विद्यापीठात भास्कराचार्य अध्यासन केंद्रही स्थापन झाले. 

केवळ अध्यासन केंद्र स्थापन करुन भागणार नाही, भास्कराचार्य घरोघरी पोहोचायला हवेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मी भास्कराचार्य यांच्यासारखा वैज्ञानिक बनण्याची आस निर्माण करायला हवी, या स्वामीजींच्या विचाराला अनुसरुन गेल्या काही वर्षांपासून भास्कराचार्यांच्या नावाने दिनदर्शिका छापून, दरवेळी ५० हजारांपेक्षा जास्त दिनदर्शिका माफक दरात वितरित केल्या जात आहेत. तसेच स्वामीजींची तळमळ पाहून सिंदगीच्या सारंग मठाचे श्री प्रभू सारंगदेव शिवाचार्य यांनी भास्कराचार्यांच्या नावे 'भास्कर पुरस्कार'ची सुरुवात केली. ख्यात वैज्ञानिक सी. एन. आर. राव, यू. आर. राव यांना पुरस्कार देण्यात आला. कन्नडिगांच्या मनात भास्कराचार्य यांचे नाव अमीट अशाप्रकारे पुनर्स्थापित करण्याचे कार्य स्वामीजींच्या संकल्पसिद्धीने साध्य झाले.

भारतीय संस्कृतीविषयी स्वामीजींना अतिशय काळजी होती. स्वामीजींच्या विचारांनुसार ख्यात चिंतक गोविंदाचार्य, माजी खासदार बसवराज पाटील सेडम यांनी 'भारतीय संस्कृती उत्सव'ची सुरुवात केली. तितक्याच ताकदीने त्याचे आयोजन करत स्वामीजींना अपेक्षित अशाप्रकारे तिचे संयोजन केले. आज हे सांगायचे कारण म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक महत्वपूर्ण उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. स्वामीजींनी आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून केवळ मानवी मनाची मशागत, हृदये स्वच्छ करण्याचेच नव्हे तर विज्ञाननिष्ठ विचार पेरतानाच, आपल्या श्रेष्ठतम पूर्वसूरींचा अभिमान मनी बाळगावा, हा विचार लाखो लोकांत रुजवण्याचे कार्य केले. शिवाय,  भास्कराचार्य व सिद्धेश्‍वर  स्वामी यांचा जन्म एकाच गावी झाला होता, हे आजच्या पिढीला कळावे, हा हेतू आहे. तसेच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भास्कराचार्य सांगावा, हा उद्देश नव्हे तर एका गणिततज्ञाविषयी स्वामीजींना किती कळकळ होती, हे सांगण्यासह पुढील प्रपंच...

श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींची आपले गुरू श्री वेदांत केसरी मल्लिकार्जुन शिवयोगी यांच्याविषयी अपार श्रद्धा, प्रेम होते. स्वामीजींनी कोणाला लिंगदीक्षा देऊन आपला संप्रदाय निर्माण केला नाही. लिंगैक्य झाल्यानंतरही या भूतलावर त्यांचे म्हणून असे कोणतेही अस्तित्व राखू दिले नाही. आपल्या शिष्यवृदांनाही ते म्हणायचे, मी आपला गुरू नाही, मल्लिकार्जुन शिवयोगी हेच आपले गुरू.  तरीही भास्कराचार्यांच्या भूमीत जन्माला आलेल्या या नक्षत्राला लाखो लोकांनी आपल्या मनी गुरु मानले. का ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक व विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता या नात्याने संघसंस्थापक प. पू. डॉ. बळीराम हेडगेवार, त्यांच्याच नेतृत्वात जडघडण झालेले केंद्र संस्थापक माननीय एकनाथजी रानडे यांची संघटनात्मक दूरदृष्टी मनाला भावते. कारण दोघांनी कोणा व्यक्तीऐवजी तपोमय व ज्ञाननिष्ठ भारतीय संस्कृतीच्या सर्वाधिक सशक्त आणि पुरातन अशा भगवा ध्वज व ओंकाराला गुरू मानले, ते कार्यकर्त्यांसमोर प्रतिष्ठित केले. यामागे हा विचार होता की, व्यक्ती पतीत होऊ शकते, पण विचार आणि पवित्र प्रतीक पतीत होऊ शकत नाहीत. मानवी जीवनात या पुरातन प्रतीकांइतके पावित्र्य संपादन करणे कष्टाचे असले तरी सिद्धेश्‍वर स्वामीजी हे तितकेच (तुलना नव्हे) पवित्र होते.  जीवनाच्या कोणत्याही क्षणी, प्रसंगी वाणी अथवा आचरणाने ते ढळले नाहीत. आपल्याला दीक्षा दिली नसतानाही लाखो लोकांनी त्यांना गुरू मानण्यामागे हेच कारण आहे. सिद्धेश्‍वर स्वामीजी म्हणायचे, गुरू हा विशाल मनाचा हवा. त्यांच्यातील ती विशालता लक्षलक्ष मनांनी, हृदयांनी अनुभवली होती. गुरुदेव रा. द. रानडे यांनी संत कोण ? याविषयी एक साधी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, ‘ज्याच्याकडे पाहिले असता देवाकडे पाहिल्याचे समाधान मिळते तो संत.’  श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी कोणालाही आपल्या पायी मस्तक टेकवू द्यायचे नाहीत. तरीही त्यांच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी लाखो लोक ते जिथे असतील तेथे जायचे, त्यांची अमृतवाणी ऐकायचे. कारण त्यांच्या सुहास्यमुद्रेच्या दर्शनातच त्यांना ईश्‍वरी समाधान लाभायचे. गुरुदेव रानडे यांनी सद्गुरु शिष्यासाठी काय करतात? हे सांगताना असेही म्हटले आहे, ‘ते देव व भक्त यांची गाठ घालून देतात व आपण दूर राहतात.’ ज्ञानयोगी श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींनी हेच केले. तेथे ‘मी’ नव्हता. साधकाने आत्मसाक्षात्कारार्थ चालविलेला उपायवन फुलविणारे ते वसंत होते. 

स्वामीजी आध्यात्मिक प्रवचनानिमित्त कोठेही असले तरी गुरुपौर्णिमेनिमित्त ते महिनाभर विजयपूरच्या ज्ञानयोगाश्रमात असायचे. त्यांचा महिनाभर ज्ञानदासोह चालायचा. गुरुपौर्णिमेला त्यांचे गुरू लिंगैक्य श्री वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी यांच्या स्मृती जागविल्या जायच्या. त्यांच्या समाधी दर्शनासाठी भाविकभक्त यायचे. स्वामीजी लिंगैक्य होऊन कालच सहा महिने पूर्ण झाले. त्यानंतरचा आज पहिला गुरुपौर्णिमा. आजही भाविकभक्तांत तोच उत्साह कायम आहे. मल्लिकार्जुन शिवयोगी यांच्या समाधी दर्शनासह ‘कणाकणांत शिव’ झालेल्या ‘ज्ञानयोगी’च्या दर्शनासाठी. 

अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 

Sunday, 23 April 2023

कोण हे ? कोण हे शेट्टर ?

संतोष तम्मय्या, कार्यकारी संपादक, होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे


भरलेल्या न्यायालयात न्यायाधीश चौगले साहेब कामकाज चालवत होते. तेव्हा अजून वकिलांनी काळे कोट परिधान करणे बंधनकारक नव्हते.त्यामुळे आवारात वकील कोण ? अशील कोण ? हे समजत नव्हते. त्या दिवशी शांतपणे बसून आपल्याकडे  एकटक पाहणाऱ्या युवकाकडे बोट  करून न्या. चौगले यांनी प्रसिद्ध वकील भंडीवाड यांना विचारले, 'कोण हा मुलगा?' त्यावर  भंडीवाड उत्तरले,  'साहेब, मला माहिती नाही.' न्यायाधीश रागीट चेहऱ्याने कामकाजात व्यस्त झाले. तो युवक कंटाळून बाहेर पडला.दुसऱ्या दिवशी कचेरीत आल्यावर एक लखोटा त्यांची वाट पाहत होती. ते वाचताच चौगले साहेब रागाने थरथरू लागले. त्या पत्रात असे लिहिले होते, 'न्यायालयात येऊन कामकाजाचे निरीक्षण करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, अधिकार आहे. नव्याने वकिली  पेशा स्वीकारलेल्यांना कामकाजाचे निरीक्षण करून अनुभव आणि मार्गदर्शन मिळवावे लागते. एक तरुण वकील या नात्याने मी ज्येष्ठ वकिलांच्या शेजारी बसून कामकाजाचे निरीक्षण करतो. आपण थेट मलाच प्रश्न विचारायला हवे होते. मात्र, आपण मी कोण याविषयी ज्येष्ठ वकिलांकडे विचारणा केली. त्यामुळे मी काही न सांगता गप्प राहिलो. दुसऱ्यांना प्रश्न विचारुन माझ्याविषयी समजून घेण्याची आपली कार्यपद्धती माझ्यासह वकिली पेशासाठी अवमानकारक असल्याचे मी समजतो. तसेच त्याविषयी नाराजी व्यक्त करीत आहे. यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. आपण आपल्या या चुकीपोटी माफी मागून वकिली पेशाची प्रतिष्ठा राखावी. 
- सदाशिव शंकरप्पा शेट्टर'
हे पत्र वाचून न्यायाधीश गोंधळून गेले. ती मोठी बातमी बनल्याने शहरातही चर्चेचा विषय बनला. 'कोण हा ? कोण हा शेट्टर ?'शेवटी काहीतरी आठवून चौगले यांनी त्या युवकाला कचेरीत बोलावून घेतले. त्याला  विचारले, 'तू शंकरप्पा शिवप्पा शेट्टर (एस. एस. शेट्टर) यांचा मुलगा का ?' मुलगा उत्तरला, होय !   या सर्व घटनेला अर्धशतक उलटून गेले आहे. मात्र, हे कोण ? कोण हे शेट्टर ?' हा प्रश्न वेगळ्या प्रकारे संपूर्ण कर्नाटक राज्याला सतावत आहे !  एस. एस. शेट्टर यांचा मुलगा हा सदाशिव शेट्टर तर मग हा कोणता शेट्टर ?  यांचेही वडील एस. एस. शेट्टरच ना ? आदी प्रश्न काहींना सतावत आहेत. हे केवळ प्रश्नच राहिले असते तर त्यात काही विशेष राहिले नसते. मात्र, आता निर्माण झालेला प्रश्न मूल्ये, निष्ठा, प्रामाणिकतेचा आहे. आता चर्चेत असलेले सत्तालोलुप शेट्टर यांना काहीजण वकील सदाशिव शेट्टर यांचे पुत्र समजले आहेत. जनसंघाच्या महानायकांच्या तालमीत तयार झालेल्या सदाशिव शेट्टर यांच्या मुलाने असे का केले म्हणून काहीजण दुखावले गेले आहेत. मात्र, सदाशिव शेट्टर यांच्या घराण्याच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास तेथे तीन शतकांपासून फक्त प्रामाणिक, धर्मरक्षणासाठी जीवन समर्पित केलेले, माजासाठी जगलेले दिसतात विन: सत्तेसाठी हपापलले, धनलोलुप 'शेट्टर' दिसत नाहीत. तसे असेल तर मग हे रंग बदललेले शेट्टर कोण ? ती कथा राजमौली यांच्या सिनेमासारखे, त. सु. शामराय यांच्या 'मूरु तलेमारु' (तीन पिढ्या) पुस्तकासारखे रोचक आहे. 
उपलब्ध पुराव्यांनुसार शेट्टर वंशाच्या इतिहासाची सुरुवात १६ व्या शतकातील गोकाकचे काडप्पा शेट्टर नावाच्या शिवभक्तापासून  होते. शरणतत्त्वांनुसार जीवन व्यतीत केलेल्या दयाळू काडप्पा यांना दोन मुले होती. दुसरा मुलगा बसप्पा शेट्टर पित्याप्रमाणेच शिवभक्त होता. त्यांची समाजसेवा आणि सात्विकता पाहून गदगचे तोंटदार्य स्वामीजी, सवणूरचे नवाब आणि जडे मठाचे स्वामीजी यांनी त्यांना सन्मानाचे स्थान दिले होते. त्यांनी चित्रदुर्गचे गुरुसिद्धेश्वर स्वामीजींना बोलावून हुब्बळ्ळीमध्ये मूरुसाविर मठाची निर्मिती केली. पुढे त्यांचे तिसरे पुत्र गुरुसिद्धप्पा शेट्टर हे त्या मठाचे पीठाधीशही झाले. ही काडप्पा शेट्टर यांच्या वंशातील तिसरी पिढी होय. यांच्या नंतरच्या पाचव्या पिढीत जन्मलेलेच शंकरप्पा शिवप्पा शेट्टर अथवा एस. एस. शेट्टर होत. हेच न्यायाधीशांना माफी मागायला सांगितलेल्या स्वाभिमानी सदाशिव शेट्टर यांचे वडील. वकील सलेले एस. एस. शेट्टर हे हुब्बळ्ळी - धारवाड भागातील प्रसिद्ध व्यक्ती होते. शेट्टर चाळीत आलेल्या कोणालाही  रिकाम्या हाताने न पाठविणारे महादानी होते. धारवाड भागातील खेड्यांतील मुलांना बोलावून आणून आपल्या घरात ठेवून शिक्षण देणारे एस. स. शेट्टर आपल्या वयाच्या ३४ व्या वर्षी निवर्तले. ते निवर्तण्याधी काही वर्षांपासून ते कलघटगी, मिसरकोटी आदी गावांतील गरीब कुटुंबातील मुलांना आणून आपल्या घरी ठेवून शिक्षण देत होते.  त्याचप्रकारे शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर हा बुद्धिमानी मुलगाही आला होता. पुढे हेही एस. एस. शेट्टर म्हणूनच प्रसिद्ध झाले. या शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर यांना आपल्याला लोक एस. एस. शेट्टर म्हणूनच ओळखतात याचा अभिमान वाटायचा. शिवाय ते अन्न - शिक्षण दिलेल्या शेट्टर घराण्याचे निष्ठावंतही होते. थोरले एस. एस. शेट्टर यांच्या अपार संपत्तीला किंचितही अपाय होणार नाही अशाप्रकारे सुरक्षित राखलेले हे सवाई एस. एस. शेट्टर होत. कोणतेही रक्ताचे नाते नसतानाही सवाई एस. एस. शेट्टर हे थोरले एस. एस. शेट्टर यांचा मुलगा सदाशिव शेट्टर हे वकिली पेशा सुरू करण्याच्या काळापर्यंत त्या कुटुंबाची सेवा करत सार्थक जीवन जगले.
  इकडे सदाशिव शेट्टर यशस्वी वकील झाले. विवाह झाल्यानंतर त्यांना पाच मुले झाली. सोबतच ते काँग्रेसचे कार्यकर्ते बनले. तिकडे काडप्पा शेट्टर यांचे वंशज नसलेले शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर म्हणजे सवाई एस. एस. शेट्टर हेही सांसारिक जीवनात पडले होते. त्यांनाही मुले झाली होती. त्यातील एकजण पुढे भारतीय जनता पक्षात अनेक पदे, सत्ता उपभोगून जगदीश शेट्टर म्हणून प्रसिद्ध झाले.  काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले वकील सदाशिव शेट्टर यांना काँग्रेस कार्यकर्त्यांत श्रद्धा, क्रियाशीलता नाही असे वाटले. सत्तेचा दंभ, जातियवाद आणि अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण हे राष्ट्रभावनेला अपायकारक असल्याचे त्यांनी जाणले. आपण येथेच राहिल्यास काँग्रेसप्रमाणे निष्क्रिय बनून राहू, ही भीती सतावू लागली. तेव्हा त्यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनांनी आकर्षित केले. त्यानंतर पुढचा - मागचा विचार न करता सदाशिव शेट्टर यांनी जनसंघात प्रवेश केला. जगन्नाथराव जोशी, भाऊराव देशपांडे आणि गदगचे डॉ. रामचंद्र अनंतराव जालिहाळर यांच्या मार्गदर्शनामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही संपर्कात आले. १९६२ हुब्बळ्ळीतून, १९६४ मध्ये धारवाडमधून विधासभेची निवडणूक लढवून त्यात पराभूत झाले. १९६७ च्या निवडणुकीत हुब्बळ्ळीमधून निवडणूक रिंगणात उतरून जिंकले. तसेच दक्षिण भारतातील जनसंघाचे पहिले आमदार म्हणून ओळखले गेले. उशिरा जनसंघात प्रवेश केला असला तरी निष्ठावंत कार्यकर्ता बनून राहिले. पक्षाच्या कार्यासाठीच प्रिंटिंग प्रेस सुरू केले. कार्यकर्त्यांना घरी जेऊ घालून पक्षाची बांधणी केली. दीनदयाळ यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांचे निकटवर्तीय राहिले. हुब्बळ्ळी हॉस्पिटलच्या निर्मितीनंतर कोणीही वाली नसलेल्या कामगारांसाठी लढा देऊन निवारा दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनांचे संघटन केले. मालमत्ता कराच्या विरोधात धरणे धरले. दरवाढ, रेशनमधील भेदभाव विरोधात रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले. 
दीनदयाळ उपाध्याय हे उत्तर कर्नाटकाच्या प्रवासावर आल्यानंतर त्यांच्यासोबत संघटन कार्य केले. हाती घेतलेले कार्य वेगाने संपविणारे सदाशिव शेट्टर यांनी आपले जीवनकार्यही घाईघाईत संपविले. १९६८ मध्ये आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षी आमदार असतानाच ते निवर्तले. तेथेच शेट्टर कुटुंबियांच्या राजकीय जीवनाचा अंत्य झाला.   यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कार्यकर्त्यांनी शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर (सवाई एस. एस. शेट्टर) यांना उमेदवार म्हणून उभे केले. मात्र, ते जिंकले नाहीत. आपल्याला अन्न दिलेल्या सदाशिव शेट्टर यांच्या कुटुंबाच्या मूल्यांना अनुसरून ते जगले. मात्र, सवाई एस. एस. शेट्टर तसे जगले म्हणून त्यांच्या मुलानेही तसे जगावे कसे काही आहे का ?  तसेही हुब्बळ्ळी - धारवाडमध्ये शेट्टर घराण्याची एक हवा होती. सदाशिव शेट्टर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व कारणांमुळे काँग्रेसला टक्कर देण्यासाठी शेट्टर कुटुंबातील कोणी  उमेदवार झाल्यास भाजप जिंकेल, ही गोष्ट राजकीय वलयात प्रचलित झाली होती. मात्र, सदाशिव शेट्टर यांच्या मुलांपैकी कोणीही राजकारणात येणार नसल्याचे सांगून गप्प राहिले. त्या वेळेस आकस्मिकपणे शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर म्हणजे सवाई एस. एस. शेट्टर यांचा मुलगा राजकीय नेत्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर तो मागे वळून पाहिला नाही. एकेक राजकीय पायऱ्या चढत राहिले. शेट्टर हे नावच त्यांना विजय मिळवून देत होते. त्यामुळे आधुनिक शेट्टर यांचे राजकीय जीवन सुलभ झाले. 
कालौघात जुन्या शेट्टर यांची मूल्ये जुळ्या शहरात दंतकथा बनून लोकप्रिय झाली असताना या शेट्टरमध्ये आपणच विचार, आपणच भाजप  हा भ्रमही वाढला. काडप्पा शेट्टर यांच्या घराण्याच्या प्रभाव व वलयाशिवाय आपण पुढे आलो हा अहंकारही निर्माण झाला. यडीयुरप्पा यांचे सरकार असताना हुब्बळ्ळीत सदाशिव शेट्टर यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीला या ट्टरांनी दाद दिली नाही. शेवटी चाहत्यांनी छोटासा पुतळा बनविल्यावर काहीनी त्याला अडथळा आणला !  सरकारने सदाशिव शेट्टर यांच्याविषयीचे पुस्तक प्रकाशित केले. त्या समारंभात मंत्री शेट्टर यांनी थोरले शेट्टर यांच्या मुलांना सौजन्य म्हणूनही व्यासपीठावर न बोलावता त्यांना मानसिक त्रास दिला. म्हणजे भाजपमध्ये असतानाच या शेट्टर यांच्या मनामध्ये षडयंत्र, कुटीलता, धूर्तपणा भरलेली होती. पण मुखवटाही किती दिवस लपवला जाऊ शकतो ? तो आता गळून पडला आहे. आता ते संघाच्या प्रचारकांविषयी अशोभनीय वक्तव्य करण्याइतके अधोगतीला पोहोचले आहे. मात्र, यात कोणतेही आश्चर्य दिसत नाही. कारण हे काडप्पा शेट्टर यांच्यासारखे जगलेच नाहीत ! त्यामुळे आश्चर्य का वाटावे ? शिवाय वडील शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर हेही निवर्तले होते. 
त्यातच या शेट्टरना कोणाच्या उपकाराची जाण राहिली नाही. त्यामुळे पक्ष सोडतानाही त्यांना लाज वाटली नाही.  विडंबन म्हणजे आजही बहुतांश लोक हे भाजपकडे पाठ फिरवलेल्या या शेट्टरना सदाशिव शेट्टर यांचे पुत्र, दीनदयाळ यांच्या संपर्कातील घराण्यातीलच समजले आहेत ! हे अगदी असे झाले की बिस्लेरी पाण्याची बाटली यशस्वी झाल्यानंतरत्याच नावाशी साधर्म्य राखणाऱ्या नकली बाटल्या बाजारात आल्या ना तसे झाले !संदर्भ ग्रंथ : संसदीयपटू सदाशिव एस. शेट्टर. ग्रंथालय उपसमिती, बंगळुरू

Thursday, 6 April 2023

शाब्बास ! बहुसंख्यकांवर दडगफेक करण्याइतके स्वातंत्र्य

 



दगडफेक करण्याच्या रोगाने यांना कसे पछाडलेय देवच जाणे. आधी आपण दूरच्या काश्मिरमध्ये दगडफेक करताना आपण या लोकांना पाहायचो. आता गावोगावी यांची गर्दी झाली आहे.  काश्मिरात प्रत्युत्तरादाखल सैनिकांनी चार वाजवले ना, तसे सर्वत्र केल्यास हे नीट होतात का पहावे. बिहार, पश्‍चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रासह सर्वत्र हे दगडफेक करणारे जोरात आहेत. मशिदीवर लपून उभे राहायचे, शेवटी हिंदूंच्या मिरवणुका आल्यावर चोहोबाजूंनी दडफेक करायच्या, या हीनबुद्धीचे कोणी शहाणा माणूस समर्थन करू शकत नाही. अशातच इस्लाममध्ये स्थान नसल्याने मशिदीबाहेर डीजेसह येणार्‍या मिरवणुकांचा ते विरोध करत असल्याचे सांगतात. शाब्बास ! दररोज अजानावेळी अल्ला हा एकच देव असल्याचे सांगितले जाते.  तेहतीस कोटी देवांची पूजा करणारे हिंदू ते ऐकतच आले नाहीत का ? दररोज मशिदीबाहेर गोंगाट निर्माण करणार्‍या स्पीकरवर दगडफेक करुन नष्ट केले आहेत का ? यांना या मिरवणुकीतील संगीत सहन होत नसेल तर काय काय हवे सांगा ?  गुजराती लोक संगीताच्या तालावर दांडिया नृत्य करताना याच समुदायाचे तरुण चोरुन येऊन निर्लज्जपणे ठेका धरतात ना, तेव्हा इस्लामला संगीत चालते का ? सेक्युलॅरिझमची शिकवण हिंदूंनाच का ? दगडफेक करणार्‍यांना किती दिवस अल्पसंख्यकाच्या छत्राखाली सांभाळून घ्यायचे ?

अल्पसंख्यक म्हणजे संख्येने कमी असलेले हा अर्थ. मात्र, 2011 च्या जनगणनेनुसार मुसलमानांची संख्या शेकडा 15 असून, 18 कोटींची संख्या ओलांडले आहेत. इंडोनेशिया, पाकिस्तान वगळता ते भारतातच सर्वाधिक संख्येने आहेत. यांची लोकसंख्या जगातील 95 देशांपेक्षाही अधिक आहे. उत्तर प्रदेशातील मुसलमानांची संख्या ही इस्लामचा उदय झालेल्या सौदी अरेबियातील मुसलमानांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे ! पश्‍चिम बंगाल, केरळ, आसाम येथे मुस्लिमांची भूमिका निर्णायक ठरते. तसे असूनही हे अल्पसंख्याकच ? तसे पाहिल्यास भारतात समलैंगिक, तृतीयपंथी हे खरे अल्पसंख्यक. सुविधा द्यायच्याच तर त्यांना द्यायला हव्या, यांना नव्हे. त्यामुळेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, जेथे धर्माला प्रामुख्यता आहे त्या देशात अल्पसंख्याक विभाग हवे. भारतात सर्व समान आहेत. त्यामुळे अशा गोष्टींना येथे संधी देऊ नये. त्या दृष्टीने सांगायचे झाल्यास इस्लाम प्रधान राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात, सौदी अरेबियात आणि ख्रिश्‍चॅनिटीच राष्ट्रधर्म असलेल्या इंग्लंडमध्ये इतर धर्मियांना अल्पसंख्याक म्हणून दर्जा द्यायला हवा, भारतात नव्हे !

खरे तर जागतिकदृष्ट्या हिंदू अल्पसंख्य आहेत. जगात सर्वाधिक संख्येने आहेत ते ख्रिश्‍चन, मुस्लिमच. एकेकाच्या वाट्याला 50 हून अधिक देश आहेत. हिंदू केवळ इथेच राहतात. त्यामुळे जागतिकदृष्ट्या अल्पसंख्यकाच्या सुविधा आम्हालाच मिळायला हव्यात, तलवारीला घाबरुन धर्मांतर केलेल्यांना नव्हे. आमच्यात पंजाब, जम्मू काश्मिर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेशात हिंदूच अल्पसंख्यक आहेत. मात्र, तेथेही अल्पसंख्यकाच्या सर्व सुविधा लाटणारे लोक हे मुस्लिमच आहेत. वास्तविकपणे देशभरात अल्पसंख्यक शब्दाला सन्मान मिळेल अशाप्रकारे खर्‍या अर्थाने पारसी हेच अल्पसंख्यक आहेत. खरेतर त्यांनाच अल्पसंख्यक म्हणून दर्जा मिळायला हवा, सुमारे 20 कोटींहून अधिक असलेल्या, दगडफेक करुन गोंधळ माजविणार्‍या या लोकांना नव्हे. 

स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दिवसांतच काँग्रेसने मुस्लिमांना घरजावईप्रमाणे पाहायचा धडा गिरवायला सुरुवात केली.  आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राजकीयदृष्ट्या चाणाक्ष नसलेले मुस्लिम मशिदीसाठी अंथरायला दिले तरी मते देतील. अशांनाच डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने अल्पसंख्यक धोरणाच्या माध्यमातून त्यांना बहुसंख्यक हिंदूंपेक्षाही वर बसवण्याची योजना आखली.  वास्तविकपणे, आपल्या संविधानाच्या प्रकारे सर्वजण समान आहेत. मात्र, काँग्रेसने मुस्लिमांना बहुसंख्यकांपेक्षा वर बसवण्याचाच नव्हे तर अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाणार्‍या बौद्ध, शीख, जैनांना कोपर्‍यात सारुन मुस्लिमांच्या वैभवीकरणासाठी प्रयत्न केले. एकेकाळी मनमोहन सिंग यांनी या देशाच्या साधनसंपत्तीवर मुसलमानांचाच पहिला अधिकार असल्याचे सांगून टाकले होते. आताही तेवढेच. काँग्रेसच्या राज्यांत रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मुस्लिमांची घरे पाडावी लागणार असतील तर रस्त्यांचे रुंदीकरणच थांबवले जाते. पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची कथा काही यापेक्षा वेगळी नाही. काही प्रमाणात उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी मात्र चार वाजवून यांच्या गुंडगिरीला आळा घातला आहे. तर त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही प्रमाणात या विषयी यश मिळवले आहे. उर्वरित सर्वजण त्यांच्या दगडफेकीला घाबरुन लपून बसणारे नेतेच आहेत. मुस्लिमांना अल्पसंख्यकाचा दर्जा द्यायलाच हवा, म्हणणारे काही डावे बुद्धीजीवी अल्पसंख्यक शैक्षणिकदृष्ट्या मागे असल्याने हे धोरण आवश्यक असल्याचे सांगतात. हिंदू आणि मुस्लिमांचा शैक्षणिक स्तर सुमारे शेकडा 64 इतके म्हणजे समसमान आहे. अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाणार्‍या जैनांचे शैक्षणिक स्तर शेकडा 87 इतके आहे. उर्वरित अल्पसंख्यकांचा शैक्षणिक स्तर हिंदूंपेक्षा अधिक आहे. तरीही अधिकाधिक सवलती यांनाच दिल्या जातात याचा अर्थ काय आहे ! इतके होऊनही इतर अल्पसंख्यकांची लोकसंख्या दर जनगणतीला घटत असताना मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. याला या समाजातील महिला शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिल्याचे कारण सांगितले जाते. आकडेवारीनुसार हिंदू आणि मुस्लिम महिलांचा शैक्षणिक स्तर शेकडा 90 आहे. तरीही त्या मुली लग्न झाल्यावर अपत्य देणार्‍या यंत्र बनतात म्हणजे यामागे एखादे प्रबळ षडयंत्र असलेच पाहिजे. योजना आखाणारा कोणीही याकडे लक्षही देत नाही, हे आश्‍चर्यजनक आहे. त्यातही संविधानाच्या प्रकारे दोन प्रकारचे अल्पसंख्यक आहेत. एकीकडे आतापर्यंत पाहिलेले धार्मिक अल्पसंख्यक  तर दुसरीकडे भाषिक अल्पसंख्यक आहेत. मात्र, या भाषिक अल्पसंख्यकांची आपल्या राजकारण्यांनी काळजी वाहिल्याचेे खूपच अतिविरळ आहे. बोलायचे झाले तर मुस्लिमांना सोयीसुविधा वाटणार्‍या या लोकांनी कधीतरी महाराष्ट्रातील भाषिक अल्पसंख्यक असलेल्या कन्नडिगांना योजनेत वाटा दिला आहे का ? हिंदीवगळता उर्वरित सर्व भाषा भाषिक अल्पसंख्यक वर्गात मोडत असतील तर तेथे आरक्षण नको काय ? याविषयी आवाज उठविल्यावर न्यायालयाने भाषिक अल्पसंख्यकांविषयी त्या त्या राज्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. मात्र, धार्मिक अल्पसंख्यकांविषयी राष्ट्रीय स्तरावरच निर्णय घेतले जातात ना ! थोडेसे गोंधळ आहे वाटते ना ? या कारणामुळेच धार्मिक अल्पसंख्यक असलेले मुस्लिम देशातील बहुतेक योजना लाटून वाढतानाच त्यांच्या सुखकर जीवनासाठी कर भरणार्‍या हिंदूंवर दगडफेक करण्याचे धैर्य दाखवत आहेत.  



सगळी चूक हिंदूंचीच आहे. हे सर्वजण स्वत:ची रिलिजन म्हणून ओळख जपत असताना आपण मात्र, हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती समजतो.  संविधानात धर्माला जागा आहे, जीवनपद्धतीला जागाच नाही. हिंदूंना लहानपणापासूनच चांगले संस्कार देऊन उत्तम नागरिक बनेल, यादृष्टीने घडविले जाते. साहजिकच तो विवेकी बनतो. विवेकी आणि अविवेकी यांच्या हाणामारीत अडकल्यास जिंकणार तो अविवेकीच. कारण विवेकी तर्कशुद्ध विचार मांडतो. टीव्ही डिबेटमध्ये विचारलेल्या प्रश्‍नामुळे सर तनसे जुदा म्हणत रस्त्यावर उतरलेल्या अविवेकींमुळे हिंदू शांत झाला. कारण त्यांच्यासारखे रस्त्यावर उतरुन भांडणे त्याला कधीही शक्य नाही. तर गुंडगिरीपुढे सरकारही झुकतात. त्यांना सरकारात आहे तितके दिवस शांतपणे कारभार करणे पुरेसे आहे. अशी सरकारे शांतपणे राहणार्‍याला पाठीवर मारुन चांगल्या गोष्टी सांगतील मात्र, गुंडांच्या कानाखाली चार वाजवून तोंड न उघडता गप्प बसायला सांगणार नाहीत. त्यामुळेच दगडफेक करणारे हे लोक जिंकतात. म्हणून सभ्य समाज याला जय म्हणत नाही. त्याला पाहून त्यांना वाईट वाटते. शेवटी शेजारीपाजारी ते असल्यास घर विकून सभ्य लोक राहणार्‍या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळेच चार मुस्लिमांच्या घरांपासून सुरू झालेला एरिया कालांतराने मिनी पाकिस्तानात बदलतो !

तसे सर्वच मुस्लिम या दगडफेक करणार्‍यांचे समर्थक नाहीत. मुस्लिमांत अशाप्रकारे दगडफेक करणारे अल्पसंख्यक वर्ग असला तरी याविषयी काही न बोलता शांतपणे सहन करत राहणारे बहुसंख्य मुस्लिमही आहेत. अशा शांतिप्रिय बहुसंख्यकांत मुस्लिमांनी विकासाच्या वाटेवरुन पुढे जावे असे सांगत आत्यंतिक आदर्शवाद नाकारणारे लोक असले तरी दुसरीकडे या गुंडांचा निषेध करुनही मुस्लिमांच्या विकासाविषयी कल्पनाही न करणारे लोकही आहेत. तेच बुरखा, हिजाबाचे समर्थन करत रस्त्यावर उतरतात. यांना दगडफेक करणारे आवडत नाहीत हे खरे आहे. मात्र, मुस्लिमांना विकासाच्या वाटेवर पाहणेही यांना आवडत नाही. अशांचाच काँग्रेस, जनता दलाला पाठिंबा आहे. गेली सात दशके राजकारणात मुख्य भूमिकेत राहिलेल्या या पक्षांनी मुस्लिमांना उच्च पदावर बसविण्याची कल्पनाही केली नाही. मोदींच्या आधी दहा वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मुस्लिमांना पंतप्रधान केले होते का ? अहमद पटेल यांच्या सावलीतच वाढलेल्या काँग्रेसने त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केलीच नाही ना ! इतके सारे बोलणार्‍या ममता बॅनर्जी यांनी आपले स्थान कोणा मौलवीला सोडून दिल्याचे पाहिलात का ? सिद्धरामय्या यांनी तर गेल्या निवडणुकीत परमेश्‍वर यांचा पराभव घडवून आणून ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपासून दूर राहतील असे केले ना ! हे सगळे व्यासपीठावर बोलतात ना, तसे जीवनात आचरण करत नाहीत. तरीही मुस्लिमांचा यांच्यावर विश्‍वास आहे. असूद्या, काहीही चुकीचे नाही. त्यांचा हा विश्‍वास कायम राखण्यासाठी पीडित, वंचितांच्या सवलती त्यांना देणे हे ते कसे सहन करतील ? या पार्श्‍वभूमीवर बोम्मई सरकारने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण काढून ते गौडा आणि लिंगायतांना दिले ही वस्तुस्थिती कौतुकास्पद आहे. 

- चक्रवर्ती सुलिबेले 

- अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

Monday, 27 March 2023

वीरशैव लिंगायत हिंदूच

 


अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 

 न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने लिंगायत समाजाविषयी दिलेला अहवाल कर्नाटक सरकारने स्वीकारला आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म असून लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा द्यावा, अशी शिफारस आयोगाने केली. ती काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने केंद्र सरकाला पाठवली आहे. या पार्श्‍वभूमीवर राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बाबींचा विस्ताराने विचार करणे गरजेचे बनले आहे.

बसवण्णा हेच लिंगायत धर्मसंस्थापक, लिंगायत आणि वीरशैव हे वेगवेगळे आहेत. पंचाचार्य हे वीरशैव आहेत. पंचाचार्य हे बसवोत्तर आहेत, आदी विविध तर्क काहीजण लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याच्या समर्थनार्थ मांडत आहेत. मात्र, त्याला कोणताही आधार नाही. विशेष म्हणजे बसवेश्‍वरांनी भारतीय समाजाचे आध्यात्मिक ऐक्य दृढ करण्यासाठीच भारतीय दर्शनांपैकी एक अशा प्राचीन वीरशैव मताचे पुनरुज्जीवन केले. शरण साहित्याच्या अभ्यासक जयदेवीताई लिगाडे म्हणतात, बाराव्या शतकात तत्कालीन समाजाची (विशेषत: हिंदूंचीच) विचारधारा व जीवनक्रम तेजोहीन आणि शिथिल बनला होता. उत्तरेकडे सतत होणार्‍या परकीय आक्रमणाचे भय व वर्णाश्रम धर्मांतील मूलभूत 
दोषांमुळे सर्वत्र फुटीरता वाढलेली होती. अशा पार्श्‍वभूमीवर हिंदू समाज एकसंध व एकजिनसी बनविण्याची नितांत आवश्यकता होती. याकरिता नव्या विचार प्रणालीची, आचारसंहितेची गरज होती. हे महान कार्य महात्मा बसवेश्‍वरांनी ‘वीरशैव’ या लिंगायत धर्माची (बसवधर्माची) स्थापना करून साधले.’’ 
संदर्भ : शून्य संपादन : शिवगण प्रसादी महादेव विरचित ‘शून्य संपादने’ या कन्नड पुस्तकाचा अनुवाद : जयदेवीताई लिगाडे, पृष्ठ 464. 
बसवेश्‍वरांनी मांडलेले तत्त्वज्ञान त्यापूर्वी श्री रेणुकाचार्यांनी मांडले होते. (संदर्भ : श्रीसिद्धांत शिखामणी) पंचाचार्य हेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक होत. वीरशैव धर्म हे बसवपूर्व आहे, हे संशोधक डॉ. चिदानंद मूर्ती यांनी अनेकदा साधार सांगितले आहे. त्यांनी चर्चेचे आव्हान देऊनही ते कोणी न स्वीकारल्याने स्वतंत्र धर्म समर्थकांची भूमिका संशयास्पद आहे. आता मोठ्या प्रमाणातील संशोधन आणि पुरातत्त्व विभागाने दिलेल्या पुराव्यांनुसार वीरशैव धर्म बसवपूर्व आहे, हे सिद्ध झाले आहे. बसवण्णांचे अनुयायी असलेल्या विरक्त मठाधीशांनीही हे आता स्वीकारले आहे. त्यातच विरक्त परंपरेचे मेरुमणी यडियुरू सिद्धलिंगेश्‍वर यांनीही वीरशैव 
धर्माविषयी पुष्कळ उल्लेख केल्याचे इतिहासात दिसून येते. 
बयरित्ती शिलालेख सन 1000, कक्केरी 1127, उद्रामी 1157, कोळ्ळुरू 1180, अम्मीनभावी 
मठातील पत्र 1130, शिरनाळ 1187, अव्वेरहळ्ळी 1193, चौडदानपूर 1193 आदी शिलालेखांमध्ये रंभापुरी पीठाविषयी उल्लेख आहे. बागळी सन 1078, अव्वेरहळ्ळी 1093, मरडीपूर 1280 शिलालेखात उज्जयिनी पीठाविषयी सांगितले आहे. 
सुप्रसिद्ध राजा जन्मेजयाचे ताम्रपट सन पूर्व 1500, मरडीपूर 1280 शिलालेख केदार पीठाच्या इतिहासावर प्रकाश टाकतात. पाणेम, गुंडाल, नडाल, हनुमकोंड, पालमपेट, बिजवाड, घंटामर आदी शिलालेखात श्रीशैल पीठाचा उल्लेख आहे. आणखी काशी पीठाविषयी सांगायचे तर जयनंद देव शिलालेख सन 574, जंगमपूर 631, नेपाळ जंगममठ 635 आदी शिलालेखांतून या पीठाविषयी स्पष्ट माहिती मिळते. 
हिंदू विरोधी असलेल्या मोगलांनी काशी मठाला दिलेल्या सहाय्याचे दस्तऐवज आजही जंगमवाडी मठात उपलब्ध आहेत. तसेच वीरशैव धर्मसंस्थापक रेणुकादि पंचाचार्यांनी हिंदू संस्कृतीचे संरक्षण केले, हे आपण समजून घ्यायला हवे. 



चन्नबसवण्णा, घट्टिवाळय्या, मरिमिंडदेवय्या, बाल बोम्मण्णा, अक्कनागम्मा, हाविनाळ कल्लय्या, अक्कमहादेवी, शिवयोगी सिद्धाराम, तोंटद श्री आणि बसवण्णांचे समकालीन ज्येष्ठ आदय्या, सकलेश मादय्या आदी शरणांनी आपल्या अनेक वचनांत भक्तिभावपूर्वक पंचाचार्यांचे स्मरण केले आहे. 
सिद्धरामांचे सहकारी हाविनाळ कल्लय्या म्हणतात, 
‘एन्न कतेयल्ली स्वायतवादनय्या शंकरदासिमय्यनु
एन्न करस्थलदल्ली स्वायतवादनय्या उरीलिंगपेद्दय्यनु
एन्न उरसेज्जियल्ली स्वायतवादनय्या घटिवाळ मुद्दय्यनु 
एक अमळोक्यदल्ली स्वायतवादनय्या अजगण्णनय्यनु
एन्न मुखज्जेयल्ली स्वायतवादनय्या निजगुणदेवरू
एन्न शिखेयल्ली स्वायतवादनय्या अनिमिषदेवरू
एन्न प्राणदल्ली स्वायतवादनय्या एकोरामीतंदेगळु 
एन्न जिव्हेयल्ली स्वायतवादनय्या पंडिताराध्यरु
एन्न नेत्रदल्ली स्वायवादनय्या रेवणसिद्धेश्‍वरदेवरु
एन्न त्वक्किनल्ली सिद्धरामेश्‍वरदेवरु
एन्न श्रोत्रदल्ली स्वायतवादनय्या मरुळसिद्धेश्‍वरदेवरु
एन्न हृदयदल्ली स्वायतवादनय्या प्रभुदेवरु
एन्न भ्रूमध्यदल्ली स्वायतवादनय्या चेन्नबसवण्णनु 
एन्न ब्रह्मरंध्रदल्ली स्वायतवादनय्या संगनबसवण्णनु
एन्न उत्तमांगदल्ली स्वायतवादनय्या मडिवाळय्यनु
एन्न ललाटदल्ली स्वायतवादनय्या सोड्डळ बाचररसनु
एन्न पश्‍चिमदल्ली स्वायतवादनय्या हडपदप्पण्णनु
एन कंठदल्ली स्वायतवादनय्या किन्नर ब्रह्मय्यनु
एन्न सर्वांगदल्ली स्वायतवादनय्या गणंगळु 
महालिंग कल्मेश्‍वरा, निम्म शरणर श्रीपादक्के 
नमो नमो एनुतिर्देनु. 



या वचनात हाविनाळ कल्लय्या यांनी एकोराम, पंडिताराध्य, मरुळसिद्ध या पंचाचार्य आणि  श्री रेवणसिद्धेश्‍वर यांचा उल्लेख केला आहे. हाविनाळ कल्लय्या हे बसवण्णांचे समकालीन शरण होते. ते शिवयोगी सिद्धराम यांचे सहकारी शरण होते. रेवणसिद्ध हे बसवपूर्व वीरशैव संत होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. वचनांमध्ये आणि त्यापूर्वीच्या वेदागमात वीरशैव शब्दाचा पुष्कळवेळा वापर झाला आहे. त्यातही बसवण्णांपासून हेमगल्ल हंप यांच्यापर्यंत 30 शिवशरणांनी एकूण 142 वचनांमध्ये 221 वेळा वीरशैव शब्द धर्मवाचक म्हणून वापरला आहे.  रेणुकाचार्यांनी 
मांडलेल्या वीरशैव तत्त्वज्ञानाला बसवेश्‍वरांनी उपनिषदातील मूल्यांची जोड दिली. बसवण्णा म्हणतात, 
तंदे निनु तायी निनु ।
बंधू निनु, बळग निनु ।
निनिल्लदे मत्तारो इल्लय्या ।
कुडल संगमदेवा हाललद्दु निरलद्दु ॥
हे वचन म्हणजे संस्कृतमधील पुढील श्‍लोकाचे कन्नड रूपच आहे. 
त्वमेव माताच पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । 
त्वमेव सर्वं मम देव देव ॥ 
पुढील वचनात बसवण्णांनी शिवाच्या तांडव नृत्याचे वर्णन केले आहे. 
अदुरितु पदाघातदिंद धरे । 
बिदिरिदवु मुकुट तागित तारेगळु ।
उदुरिदवु कैतागि लोकंगळेल्ला । 
नम्म कूडल संगमदेव निंतु नाट्यवनाडे ॥
हे वचन संस्कृतमधील शिवमहिन्मस्तोत्रातील 16 व्या श्‍लोकाचे कन्नड भावानुवादच आहे. 
महि पदाघाताद व्रजति सहसा संशयपदं 
पदं विष्टोर्भ्राम्यद भुजपरिघरुग्णग्रहगणं ।
महुर्दौर्दौस्थ्वं यात्यनिभ्यतजटाताडिततटा 
जगद्राक्षय्ते त्वं नटसि ननु वामैव विभुता ॥ 
पुढील वचनात बसवण्णांनी भगवन्नाम संकीर्तनाचे महत्त्व विषद केले आहे. कोटी कोटी मंत्रजप करण्यापेक्षा तन्मयतेने एक भक्तिगीत गाऊन ईश्‍वराची आराधना करा, असे म्हणतात, 
कोट्यानुकोटी जपवन्नु माडि ।
कोटलेगोळ्ळलदेके मनवे ? ।
जपवेंबुदेके मनवे ? ।
कूडल संगन शरणर कंडू
आडि हाडि नलिय मनवे !
हे वचन स्कंद पुराणातील पुढील श्‍लोकासारखे आहे. 
श्रुतिकोटी समं जप्यं । जपकोटी समं हवि: ।
हविकोटी समं गेयं । गेयं गेय समं विदु:। 
वेदपारायणापेक्षा मंत्रजप कोटीपटीने अधिक चांगले.  मंत्रजपापेक्षा हवि अर्पण करणे कोटी पटीने अधिक चांगले. हवि अर्पणापेक्षा भक्ती करणे कोटीपटीने अधिक चांगले होय. ईश्‍वराला आळवण्यासाठी भक्तिगीतापेक्षा अन्य कोणताही चांगला पर्याय नाही, हा या वचनाचा आशय आहे. 
बसवण्णा म्हणतात, 
कळबेड, कोलबेड, हुसियु नुडियलू बेड, तन्न बण्णिसबेड, अन्यरिगे असह्य पडबेड, इदे अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी, इदे नम्म कुडलसंगमदेवन नोलिसुव परी । (चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, स्वत:चे कौतुक करू नको, दुसर्‍याशी वाईट वागू नको, हीच अंतरंग शुद्धी आहे, हीच बहिरंग शुद्धी आहे. हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे.) 
पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मुनी पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये हीच तत्त्वे सांगितली आहेत. त्यात यम आणि नियमाला महत्त्वाचे स्थान आहे. ‘यम’मधील अहिंसा, सत्य, अस्तेय आणि बसवण्णांच्या वचनातील कळबेड (आस्तेय), कोलबेड (अहिंसा), हुसियु नुडियलू बेड (सत्य) सारखेच आहेत. ही योगसूत्रे हिंदू धर्माचा पाया आहेत. वेदांच्या कठोपनिषदापासून रामायणातील योगवाशिष्ट, भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा पाया योगशास्त्र आहे. त्या पायावर उभे राहिले आहे कळबेड, कोलबेड, हुसियु नुडियलू बेड....
हे पाहता बसवण्णांच्या वचनांत पुरातन परंपरेचे विमर्श आढळते. कालौघात  उपनिषदातील शुद्ध विचारांची जागा कर्मठतेने घेतली. त्यावरील ही जळमटे दूर करून त्यांच्या शुद्धीकरणाचे कार्य बसवण्णांनी केले. वरवर पाहता त्यांनी अनेक वचनांत वेद आणि शास्त्रांचा विरोध केल्याचे दिसते. धर्मशास्त्रांचे नाव पुढे करून सुरू असलेला दांभिकपणा थांबला पाहिजे, यासाठी त्यांनी कर्मठतेविषयी सात्विक संताप व्यक्त केला. वेदोपनिषदांचा योग्यप्रकारे अर्थ समजून न घेता आपली कर्मठता आणि स्वार्थलोलुपतेसाठी त्यांचा वापर करण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे, हे समजून घेतले पाहिजे. 
हरिदास साहित्यातही विशेषत: पुरंदरदास आणि कनकदासांनी आपल्या रचनांमध्ये अनेक ठिकाणी वैदिक कुप्रथांची थेट आणि कठोरपणे निंदा केल्याची उदाहरणे आहेत. केवळ त्यामुळे हे दोन्ही संत वैष्णव संप्रदायाच्या विरोधात होते, त्यांनी वेगळ्या धर्माची स्थापना केली, असे म्हणता येईल काय ? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केवळ आठ शरणांनी 10 वचनांमध्ये 12 ठिकाणी लिंगायत हा शब्द वापरलेला आहे. आपण नवीन धर्म स्थापन करत आहोत, हे बसवण्णांनी सांगितलेले नाही अथवा त्यांच्या कोणत्याही समकालीन शरणांनी आपण बसवण्णांनी स्थापन केलेल्या नव्या धर्माचे अनुयायी आहोत, असे लिहिले नाही. त्यामुळे अस्तित्वात नसलेली बाब ऐतिहासिक म्हणून बिंबवण्याचा आताच्या राजकारण्यांचा खटाटोप हा केवळ स्वार्थासाठी चालला आहे. 
बसवण्णांनी स्थापन केलेल्या धर्मात मूर्तिपूजा नाही, हा तर्कही मांडला जात आहे. मात्र, यालाही कोणताही आधार नाही. बसवण्णांनी देवालयातील देव भक्तांच्या हाती दिला. माझे पाय हेचि खांब, देह हेचि देवालय, माझे शिर हेचि कळस या वचनातून बसवण्णांनी प्रत्येकात ईश्‍वर आहे, हे उपनिषदकालीन हिंदू तत्त्वज्ञानच मांडले. तुमच्यातच ईश्‍वर विद्यमान आहे, त्यामुळे स्थावर लिंगाची पूजा करू नका, असे सांगितले. याचा अर्थ त्यांनी मूर्तिपूजा नाकारली असा होत नाही. कारण इष्टलिंग हे शिवलिंगाचेच प्रतीक आहे. तसेच शिवाला लिंगरुपातच पूजण्याची प्रथा असल्याने ती मूर्ती नाही, ते केवळ संकेत आहे, हे सांगणे कितपत योग्य आहे ? आणखी एक बाब म्हणजे बसवण्णांसह सर्वच शिवशरणांचे वचनांकित हे स्थावर लिंगाची नावे आहेत. त्यांनी आपल्या ग्रामदेवतेचे, इष्टदेवतेचे नाव वचनांकित म्हणून स्वीकारले, हे कसे नाकारणार? वीरशैव लिंगायतांच्या अष्टावरणत लिंग, मंत्र (ओम प्रणवमंत्र), विभुती, रुद्राक्ष या बाह्य आवरणांना विशेष 
महत्त्व आहे. हे सर्व प्रतीक, संकेत हे हिंदू धर्म परंपरेतील आहेत, स्वतंत्र धर्मातील नव्हे. त्यामुळे वीरशैव लिंगायतांचे अष्टावरण, पंचाचार हे सनात धर्मापासून वेगळे करणे शक्य नाही. हिंदू हे भारतीय इतिहासातील सनातन धर्म, आणि भारतात उगम पावलेल्या पंथांना दिलेले 
सर्वसमावेशक नाव आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेच हिंदू हे रिलीजन नाही, ती एक जीवनपद्धती असल्याचा निर्वाळा दिला आहे. 
2 जुलै 1995 रोजीचा एस. अहमद, जी. वेंकटाचल आणि कुलदीप सिंग यांचा निकाल कृपया वाचा : खीं (हळपर्वीळीा)  ारू लीेरवश्रू लश वशीलीळलशव री र ुरू ेष श्रळषश रपव पेींहळपस ोीश’
आपल्यात शाकाहारी हिंदू आहेत, मांसाहारी हिंदू आहेत. मृतदेह दहन करणारे हिंदू आहेत, दफन करणारेही हिंदू आहेत. देवाची साकार रूपात पूजा करणारे हिंदू आहेत, निराकार रूपात पूजा करणारे हिंदू आहेत. गुरूंचे मार्गदर्शन घेणारे हिंदू आहेत, मार्गदर्शन न घेणारे हिंदू आहेत. वेदमंत्र पठण करणारे हिंदू आहेत, न करणारे हिंदू आहेत. देवळात जाऊन पुजार्‍यामार्फत देवाची पूजा करणारे हिंदू आहेत, तेथे न जाता घरी स्वत: पूजा करणारे हिंदू आहेत. वर्णपद्धती पाळणारे हिंदू आहेत, ते न पाळणारे हिंदू आहेत. जातक, वास्तू, मुहूर्त पाहणारे हिंदू आहेत, ते न पाहणारे हिंदू आहेत. वेद मानणारे हिंदू आहेत, तसे न मानणारे हिंदू आहेत. आस्तिक हिंदू आहेत आणि नास्तिक हिंदू आहेत. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे हिंदू आहेत, आपण हिंदू आहोत हेच माहीत नसणारे हिंदू आहेत, हिंदू धर्माचे अहित चिंतणारेही हिंदू आहेत. 
जगातील सर्वाधिक सहिष्णू विचार हिंदूंकडे आहे. माझा धर्म सत्य तसे इतरांचे धर्मही सत्य आहेत, असा सर्वसमावेशक विचार जगाच्या पाठीवर केवळ हिंदूंकडेच आहे. आत्मवत् सर्वभूतेषु म्हणजे इतर जीवही आपल्यासारखेच आहेत, असा विचार हिंदू धर्मात मांडला आहे. एकोहं बहुस्याम् म्हणजे ईश्‍वर एक आहे आणि तो विविध रूपांतून व्यक्त होतो हा भाव ज्या संस्कृतीत खोलवर रूजला ती हिंदू संस्कृती. 
एकच माणूस एकाच वेळी मारुती, लक्ष्मी, विष्णू, राम, कृष्ण अशा अनेक देवांची उपासना करू शकतो. यामुळे तो गोंधळून जात नाही. असे केवळ हिंदू धर्मातच घडू शकते. नदी, पर्वत, वृक्ष, सूर्य, चंद्र, अग्नी, धनधान्याचीही पूजा करतो. आपल्याहून ज्ञानी, वडिलधारी व्यक्तींची पूजा करून चरणस्पर्श करण्याची परंपराही याच हिंदू संस्कृतीत आहे.
माझाच देव खरा आणि इतरांचे खोटे, जगातील सर्व लोकांनी माझाच देव मानला पाहिजे, अन्यथा त्यांना जगण्याचा अधिकार नाही, सर्व जग माझ्याच धर्माचे बनले पाहिजे यासाठी धर्मांतर करू वगैरे प्रकारचा विचार भारताबाहेर उगम पावलेले रिलिजन मांडत असतात. रिलिजन या अर्थाने धर्म या संकल्पनेकडे पाहणार्‍यांना हिंदू धर्म समजणे कठीण आहे. हिंदू जीवनपद्धती पाहून ते गोंधळून जातात. जगातील सर्व पंथांची जननी असलेला हिंदू धर्म तोडण्यासाठी एकांतिक धर्मांतील कट्टरवादी सदैव आटापिटा करत असतात. हिंदू धर्मातील विविध पंथांतील लोकांचा बुद्धिभेद करतात. त्यास खतपाणी घालतात. आणि मग संबंधित पंथांमधील काहीच्या स्वार्थ भावनेला फुंकर घातली जाते. परिणाम, आम्ही हिंदू नाही. आमचा धर्म स्वतंत्र आहे. त्याला तसा दर्जा द्या, अशी मागणी पुढे येते. सर्वसामान्य माणूस त्याची काहीही चूक नसताना अशा षडयंत्रांना बळी पडतो. याला इतिहास साक्षी आहे. आपली गुरुपरंपरा असलेल्या बौद्ध, जैन आणि शीख परंपरेला अल्पसंख्याक म्हणून दूर केले गेले. 
गुरुग्रंथसाहिबमध्ये हरी हा शब्द 8344 वेळा येतो. राम हा शब्द 2533 वेळा येते. गोपाल हे नाम 491 वेळा येते. इस्लामी जिहादपासून हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे कार्य केशधारी हिंदूंनी (शिष्य अर्थात शिख) केले. दुर्दैवाने आज शिखांना हिंदूंपासून वेगळे पाडण्यात आले. शीख हे हिंदू नाहीत, असे सांगण्यात आले. ठरवून फूट पाडण्यात आली. अलीकडे काही समाजघटकांना चुचकारून हिंदू समाजात दुही माजवण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. 
समाजाची धारणा करतो तो धर्म, ही धर्माची सोपी आणि मूळ व्याख्या. सर्वांच्या कल्याणाचा विचार करून बनवलेले नीतिनियम म्हणजे धर्म. एक शिक्षक म्हणून तुमचा धर्म काय, एक विद्यार्थी म्हणून तुझा धर्म काय... असे विचारले जाते तेव्हा कर्तव्य या अर्थाने धर्म शब्द येतो. वैष्णव धर्म, भागवत धर्म असे शब्द संप्रदाय किंवा पंथ या अर्थाने वापरण्याची प्रथा आहे. वीरशैव धर्म किंवा लिंगायत धर्म याच अर्थाने आहे. परंतु, हिंदू धर्माची शकले करण्यासाठी टपलेल्या शक्ती शब्दछल करतात. सामान्य माणसांचा बुद्धीभेद करतात. लिंगायत 
समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हे कमी होते म्हणून की काय आता येत्या काळात भागवत धर्म हा हिंदू धर्माहून वेगळा धर्म आहे आणि भागवत धर्माला स्वतंत्र दर्जा द्या, अशी मागणी पुढे करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वसामान्य हिंदूंची मती गुंग करणार्‍या या बाबी आहेत. हिंदू धर्म खिळखिळा करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंनाच हिंदू धर्माच्या विरोधात उभे करण्याचे षडयंत्र सुरू आहे. आणखी किती तुकडे? हे हवे आहे का? नसेल तर हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. यासाठी आपण कृतिशील बनले पाहजे. स्वत: अभ्यास, वाचन सुरू केले पाहिजे.

Sunday, 26 February 2023

कन्नडमधील उपनिषद : वचन साहित्य

 


भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था संपविण्यासाठी रशियातून १९७० च्या दशकात आलेला एक हेर पूर्ण देशभर फिरला. अशा या सुंदर देशाचे मी नुकसान करणार नाही, असे सांगून तो काम सोडतो. एका देशाचे कशाप्रकारे वाटोळे केले जाते, याविषयी तो एक सुंदर मुलाखत देतो. एखाद्या देशाचे वाटोळे करायचे तर एकूण ३५ वर्षांची प्रक्रिया आहे. आधीच्या २० वर्षांत त्या देशातील लोकांच्या मनात, विशेषत: युवकांच्या मनात तुमचा देश चांगला नाही, तुमचा धर्म चांगला नाही, तुमची आचारपद्धती चांगली नाही, तुमच्या रीतीनीती चांगल्या नाहीत, तुमचे देव चांगले नाहीत, तुमची पूजापद्धती चांगली नाही, हा विचार सतत बिंबवायला हवा. पुढच्या १० वर्षांत आपोआपच तो देश कोसळेल, असे तो सांगतो. ते भारतात अत्यंत व्यवस्थितपणे चालले आहे. त्याच्याविरोधात आवाज उठविताना आपला समाज परफेक्ट समाज आहे, या भ्रमात आम्ही नाही. परंतु एक समाधान आहे, की एक 'सेल्फ करेक्टिंग सिस्टीम' या संस्कृतीत सुरुवातीपासूनच आहे. आपल्यात असलेल्या समस्या आपणच सुधारुन पुढे जाण्याची या देशात एक पद्धती आहे. कालौघात या देशात जाती पद्धतीसह अनेक रुढी, परंपरा निर्माण झाल्या. त्या थांबवण्यासाठी आकाशातून कोणी आला नाही. या देशातच समाजसुधारक जन्माला आले. हे योग्य नाही, असे करू नये, हे समाजासाठी चांगले नाही, हे सांगून त्यांनी याचा विरोध केला. वेगवेगळ्या रुढी, चालीरीतींना विरोध करणारे, ते समाजातून काढून टाकणारे महात्मे आपल्यात जन्मले. सातव्या शतकातील दक्षिणेतील नायनारांपासून  पंधराव्या शतकातील शंकरदेवांपर्यंत देशभरात भक्तिपंथाच्या चळवळीची मालिकाच निर्माण झाली.  बाराव्या शतकात कर्नाटकात महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली वीरशैव लिंगायतांची शरण चळवळ ही या मालिकेचीच एक कडी आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत महात्मा बसवण्णा हे संस्कृतविरोधी होते, त्यांनी वेद नाकारला. इतकेच नव्हे तर वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे आहेत. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, या विचाराला पुरोगामीत्वाच्या नावाखाली काही विचारवंत आणि स्वार्थी राजकारणी जाणीवपूर्वक खतपाणी घालत आहेत, हे वरील षड्यंत्राचाच एक भाग आहे. कारण येथील समाजाच्या प्रत्येक आदर्श राष्ट्रपुरुषाविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे महात्मा बसवण्णांच्या वचनांतूनच आपल्याला सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.












भारतीय तत्त्वशास्त्रात सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा हे सहा दर्शन आहेत. त्यांना षड्दर्शन म्हणून ओळखले जाते. वेदोपनिषदांच्या काळापासून भूमीवरील जीवसंकुल आणि बाह्यजगताची निगुढता शोधण्याचे कार्य निरंतर चालत आले आहे. डोळ्यांना दिसणारे जीव - जगत  आणि त्याबाहेर असलेले अव्यक्त चैतन्य याविषयीची जिज्ञासा आजही न शमणारी ज्ञानदाह बनून राहिली आहे. जीव - देव -जग आणि त्याच्यातील संबंधाच्या विश्लेषणात गुंतलेल्या ऋषी - मुनी आणि द्रष्टे यांचे विभिन्न चिंतन म्हणजेच हे षड्दर्शन होय. एकेका दर्शनाने आपल्या रीतीने जीवात्मा, परमात्मा, जगत याविषयी चिंतन मांडले आहे. विविध दर्शनांच्या मागे वेगवेगळ्या ऋषिमुनींचे चिंतन आहे. उदाहरणार्थ कणाद, गौतम, पतंजली आदी नावे घेता येतील. या षड्दर्शनांत जीवात्मा, परमात्मा आणि जगत याविषयी अर्थपूर्ण विवरणासोबतच या तिन्हींतील त्रिकोण संबंधाविषयी गंभीर चिंतन केले आहे.
या विभिन्न दर्शनांतील मुक्त आणि गंभीर चिंतनाला निश्चितच शास्त्रीय चौकट आहे. कोणत्याही शास्त्रीय चौकट नसलेले स्वतंत्र, परिशुद्ध आणि मुक्त गंभीर चिंतन उपनिषदांत दिसते. त्याच प्रकारचे चिंतन शिवशरणांच्या वचनांत आपल्याला दिसून येते. त्यामुळेच वचनांना कन्नडमधील उपनिषदे म्हणून ओळखले जाते. शरणसंकुलाचे नेतृत्व केलेल्या महात्मा बसवण्णा यांच्या वचनांत या परंपरागत ज्ञानासह प्रगाढ आध्यात्मिक चिंतन, सामाजिक काळजी आणि आत्मानुसंधान दिसून येते.
कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील साहित्याचे अवलोकन केल्यावर मागील साहित्याने पुढे आलेल्या साहित्यावर परिणाम केल्याचे दिसून येईल. बसवण्णांचा जन्म सांप्रदायिक घराण्यात झाला. ते बहुश्रुत, वेद - शास्त्र पारंगत होते. त्यामुळे त्यांच्यावर प्राचीन भारतीय संस्कृत साहित्याचा मोठा प्रभाव दिसून येतो.
तंदे नीनु तायि नीनु,
बंधु नीनु बळग नीनु.
नीनल्लदे मत्तरू इल्लय्या.
कूडलसंगमदेवा, हाललद्दु नीरलद्दु.
अनुवाद :  पिता तुम्ही, माता तुम्ही,
बंधू तुम्ही बांधव तुम्ही
तुमच्याविना मला कोणी नाही देवा.
कूडलसंगमदेवा, दूधात बुडवा नाहीतर पाण्यात बुडवा.
या वचनातील शेवटची ओळ सोडली तर हे वचन पुढील संस्कृत श्लोकाच्या कन्नड अनुवादासारखे आहे.
त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देव देवा ॥
या पुढील वचनात महात्मा बसवण्णा शिवाच्या तांडव स्त्रोताचे वर्णन करतात. नटराज शिव नृत्य करताना त्याच्या पायांच्या आघाताने भूमी हादरली, त्याच्या ताठ उभ्या राहिलेल्या जटांनी आकाशातील गृहनक्षत्र छिन्नविच्छिन्न झाले. नाट्याच्या विभिन्न मुद्रेत त्याचे हात लागून तिन्ही लोक गळून पडले, अशा शब्दांत वर्णन केले आहे.
अदुरितु पादाघातदिंद धरे,
बिदिरिदुवु मकुट तागि तारकेगळु,
उदुरिदुवु कै तागि लोकंगळेल्ला !
महिपादाघातांद् व्रजति सहसा संशयपदं ! 
पदं विष्णोर्भ्राम्यद् भुजपरिघरुग्णग्रहगण: 
महुरद्योर्दौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा |
जगद्रक्षा त्वं नटसि ननु वामैव विभुता !
नम्म कूडलसंगमदेवनिंदु नांट्यवनाडे.
अनुवाद : थरथरली धरणी पादाघाताने,
बिखरले तारे मुगुटाच्या टक्करेनी,
गळाले लोकांचे हात, हाताच्या स्पर्शाने,
महीपादाघाताद् व्रजीत सहसा संशयपदं ।
पदं विष्णोर्भम्यद् भुजपरिघरुग्णग्रहण : ॥
महुदरद्योर्दौस्थ्यं यात्यानिभृतजटातटाताडिततटा ।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वायैव विभुता ॥
आमचे कूडलसंगमदेव आज तांडवनृत्य करू लागले.
हे वचनही संस्कृतमधील शिवमहिम्नस्तोत्राच्या १६ व्या श्‍लोकातील कन्नड भावानुवादासारखे आहे.
'महीपादाघाताद् व्रजीत सहसा संशयपदं ।
पदं विष्णोर्भम्यद् भुजपरिघरुग्णग्रहण : ।
महुदरद्योर्दौस्थ्यं यात्यानिभृतजटातटाताडिततटा ।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वायैव विभुता ॥'
पुढील वचनात महात्मा बसवण्णांनी भगवंतनामाच्या संकीर्तनाला उचलून धरले आहे. कोट्यवधी मंत्रजप करण्यापेक्षा तन्मयतेने एक भक्तीगीत गाऊन देवाची आराधना करायला सांगतात,
कोट्यानुकोटी जपव माडि कोटलेगोळ्ळेलदेके मनवे ?
किंचितु गीतवोंदनंतकोटि जप.
जपवेंबुदेके, मनवे ?
कूडलसंगम शरणर कंडु,
आडि हाडि बदुकु मनवे. 
अनुवाद : कोट्यानुकोटी जप करुन,
भवबंधनाच्या चक्रात का सापडतो मना ?
एक लहानसे गीत अनंत कोटी जपासम आहे.
जप कशाला हवा आहे मना ? कूडलसंगाच्या
शरणाला पाहून हसत - खेळत गा रे मना.
हे वरील वचन स्कंद पुराणातील या श्लोकासारखे आहे.
श्रुतिकोटी श्रमं जपं ।
जपकोटी समं हवि : ।
हविकोटी समं हवि : ।
हविकोटी नमं गेयं ।
गेयं गेय समं विदु: ॥
वेदपारायणापेक्षा मंत्रजप कोटी भाग चांगले, मंत्रजपापेक्षा हव्यार्पण कोटी भाग चांगले, हव्यार्पणापेक्षा भक्तीने गाणे कोटी भाग चांगले, आणि भक्तिगीताच्या समान भक्तिगीताला सोडून दुसरे काहीही नाही, हे या श्लोकाचे आशय आहे. भक्तीने ईश्वराची आराधना करणाऱ्या भक्तिसंपन्न मनुष्याच्या मनाच्या महानतेचा बसवण्णा अशाप्रकारे गौरव करतात,
करि घनः अंकुश किरिदेन्न बहुदे ? बारदय्या, 
गिरि घन: वज्र किरिदेन्न बहुदे ? बारदय्या.
तमंध घन: ज्योति किरिदेन्न बहुदे ? बारदय्या.
मरहु घन: निम्म नेनेव मन किरिदेन्नबहुदे ? बारदय्या.
कूडलसंगमदेवा.
अनुवाद : हत्ती मोठा, आणि अंकुश लहान म्हणता येईल ? येणार नाही.
पर्वत मोठा आणि वज्र लहान म्हणता येईल ? येणार नाही.
अंधकार मोठा आणि ज्योत लहान म्हणता येईल ? येणार नाही.
विस्मरण मोठे आणि तुमचे स्मरण लहान म्हणता येईल ?
येणार नाही कूडलसंगमदेवा.
हत्ती आकाराने मोठा असेल. मात्र, माहुताच्या हातातील अंकुश लहान म्हणून त्याचा अनादर करणे शक्य आहे का?  पक्ष्यांसारखे विहारणाऱ्या पर्वत, डोंगरांचे पंख इंद्राने आपल्या वज्राने कापून जमीनदोस्त केल्याची एक पुराणकथा आहे. दैत्याकाराच्या पर्वतांपुढे इंद्राचे वज्रायुध लहान समजून त्याचे अवमूल्यन करणे साध्य आहे का? दाटलेल्या अंधकाराला दूर सारणारी पणती लहान म्हणून त्याची तुलना करणे शक्य आहे का ? या वचनांतील तिन्ही बाबींचा पंचतंत्रातील 'मित्रभेद' शी साम्य आहे.
हस्ती स्थूलतर: स चांकुवश: ।
किं हस्तिमात्रोंकुशो ? दिपे प्रज्वलिते प्रणश्यति तम: ।
किं दीपमात्रं तम: ? वज्रेणापि हता: पतंति गिरय: ।
किं वज्रमात्रो क: प्रत्यय: ॥
वरील श्लोकात दैहिक सामर्थ्यापेक्षा  एक तेजस्वी, सात्विक शक्ती मोठी असल्याचे प्रतिपादन केले आहे. तर मनुष्याचे अपरिमित अज्ञान निवारण करण्याची अपार शक्ती असलेल्या भक्ताचे मन मोठे, असे बसवण्णा म्हणतात.  त्यांच्यासारखे वेदोपनिषद समजून घेतलेले आणि निरुपण केलेले खूपच विरळ आहेत. ज्ञानाला जखडलेल्या परंपरागत शुष्क धार्मिक आचरण आणि मूर्खपणा याचे त्यांनी खंडन केले आहे. बसवण्णांनी वेदोपनिषदांचा नव्हे तर ते समजून न घेणाऱ्या कर्मठ आणि मूर्खांचा  विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर ते वेद भार भाराक्रांता : गार्दभा : म्हणतात. म्हणजे वेदांचा अर्थ समजून न घेता केवळ पोपटासारखा पाठ करणाऱ्यांना 'वेदांचा भार वाहणारे' असे म्हणत त्यांची गाढवाशी तुलना करतात. त्यांनी आपल्या वचनांतून श्रुतींचे विश्लेषण करुन त्यांचा खरा अर्थ, अंतरंग आणि सार यांचे विवेचन केले आहे.
इब्बरु मूवरु देवरेंदु उब्बी मातनाडबेड, 
ओब्बने काणिरो, इब्बरेबुदु हुसि नोडा !
कूडलसंगमदेवनल्लदिल्लदेंदित्तु वेद.
अनुवाद : दोन - तीन देव आहेत असे गर्वाने म्हणू नको
देव एकच आहे, दोन देव आहे हे खोटे पहा. कूडलसंगमदेवाविना
दुसरा कोणता देव नाही असे वेद सांगतात.
जे वेदांनी सांगितले तेच बसवण्णांनी सांगितले आहे. त्यामुळेच त्यांनी एका वचनात  म्हटले आहे, देव एक आहे, नाव अनेक आहे. हेच वेदांनी सांगितले आहे, 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।' सत्य एकच आहे, परंतु ज्ञानी त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. तसेच यत्र जीव: तत्र शिव:  म्हटले आहे. बसवण्णा म्हणतात,
शिवने जगत्रयक्कोडेयनेंदुदु वेद, 
उत्पत्ति स्थिति लयकारणनेंदुदु वेद, 
"ईश: सर्वस्य जगत: प्रभु: प्रेरको विश्वभुक्" एंदुदु श्रुति इदु
कारण, कूडलसंगमदेवनोब्बने देवनु.
अनुवाद : शिव हा त्रिलोकीचा स्वामी असे वेद म्हणतात.
उत्पत्ती - स्थिती - लय कारणीभूत वेद म्हणतात.
ईश: सर्वस्य जगत: प्रभु: प्रेरको विश्‍वभ्रुक् असे
श्रुती म्हणते म्हणून कूडलसंगमदेव हा एकच देव.
सामाजिक असमानता, जातिभेद आणि वर्णभेदाला वेदशास्त्रांचे प्रामाण्य देणाऱ्यांचा बसवण्णा तीव्र विरोध करतात. ते म्हणतात,
वेद नडनडुगित्तु, शास्त्रवगली केलक्के सारिद्दित्तय्या !
तर्क तर्किसलरियदे मूगुवट्टिद्दितय्या !
आगम हेरतोलगी अगलिद्दितय्या ! 
नम्म कूडलसंगय्यनु मादार चेन्नय्यन  मनेयलुंड कारण.

मराठी : वेद थरथर कापू लागले, शास्त्र मागे सरकले.
तर्कवितर्क केल्याविना गोंधळून गेले देवा.
आगम आपोआप अंग चोरुन दूर गेले देवा !
आमचा कूडलसंगमदेव मादार चन्नय्याच्या घरी जेवल्यामुळे.
याचा अर्थ वेदशास्त्र नाकारा, असे नव्हे. तर त्यांना पुढे करुन जातिभेद करणाऱ्यांवर मर्माघात करणे ! वेदशास्त्र न जाणता वाद करणाऱ्यांनो ऐका, असे म्हणत समजावून सांगतात. बसवण्णांनी आपल्या वचनांत दार्शनिक चिंतनावर मुक्त चिंतन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वचनांत पुरातन परंपरेचे विमर्श दिसते. त्यांनी उपनिषदांच्या शुद्ध विचारांभोवती निर्माण झालेले कर्मठतेचे कटू आवरण दूर सरण्याचे कार्य केले. त्यांची अनेक वचने पाहिल्यावर वरुन ते वेद आणि शास्त्रांच्या विरोधी वाटत असले तरी त्यात कर्मठतेविषयी केवळ सात्विक आक्रोश आहे. वेदोपनिषदांचा योग्यरीत्या अर्थ समजून न घेता आपल्या स्वार्थलोलुपतेच्या समर्थनासाठी त्याचा वापर करण्यास ते विरोध करतात.
त्यामुळेच ते सवाल करतात,
वेद, शास्त्र, आगमंगळनोदिदवरु हिरियरे ? 
कवि, गमकि, वादि वाग्मिगळु हिरियरे ?
नटिनि, बाण, विलासि, सुविद्यव कलित
डोगबनेनु किरियने ? हिरियतनवावुदेंदडे;
गुणज्ञान आचारधर्म, कूडलसंगन शरणरु
साधिसिद साधनेये हिरियतन.

मराठी : वेद - शास्त्र आगम वाचणारे श्रेष्ठ आहेत ?
कवी - कथाकार, वादी, साहित्यकार श्रेष्ठ आहेत?
नाट्यविद्या, बाण, विलासी, सुविद्या शिकलेला,
डोंबारी काय कनिष्ठ आहे ?
श्रेष्ठ कोणाला म्हणतात तर - गुण, ज्ञान, आचार धर्म
कूडलसंगाच्या शरणांनी केलेली साधना श्रेष्ठ आहे.
या वचनात बसवण्णांनी कोणी वेदशास्त्र, आगम वाचल्याने श्रेष्ठ ठरत नाही, तर गुण, ज्ञान, शुद्ध आचाराने केलेली ईश्वराची साधना श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. आपण वेदोपनिषदांचा नीट अभ्यास केल्यास बसवण्णांनी त्यातील मूल्येच सांगितल्याचे दिसून येईल.
वरील एका वचनात 'शरणाला पाहून हसत - खेळत गा रे मना.' म्हणणारे बसवण्णा दुसऱ्या एका वचनात म्हणतात,
गीतव हाडिदडेनु, शास्त्र - पुराणव केळिदडेनु,
वेदवेदांतव नोडिदडेनु ?
मनवोलिदु लिंगजंगमव पूजिसलरियदवरु
यल्लरल्ली (प्रा) ज्ञ रादडेनु ?
भक्तियिल्लदवरनोल्ल कूडलसंगमदेव.

मराठी :  'गीत गायले काय, शास्त्र पुराणे ऐकले तरी काय ?
वेदवेदांत पाहिले तरी काय होणार ?
तन्मय होऊन लिंग - जंगमाची पूजा न जाणणारे
प्रज्ञावंत असून काय उपयोग ?
भक्तीहीनावर कूडलसंगम प्रसन्न होणार नाही.
भक्तीची श्रेष्ठता सांगताना बसवण्णा लिंग - जंगमाची पूजा न जाणणारे प्रज्ञावंत असून काय उपयोग ? असा सवाल करतात. याचा अर्थ प्रज्ञावंत असू नये, असा नाही. अगदी तसाच अर्थ वेदवेदांत याविषयी आहे.
बसवण्णांनीच वेदागमांविषयी म्हटले आहे,
वेदागमंगळु हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, 
मीरि नडेयलागदु, मीरि नुडियलागदु, मुक्तिपदवैदुवात
अपहास्यक्के बारदे आचारमार्गदल्लिरबल्लडे
कूडलसंगमदेवनिगले ओलिव.
वेदागमंगळु हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, 
मीरि नडेयलागदु, मीरि नुडियलागदु, मुक्तिपदवैदुवात
अपहास्यक्के बारदे आचारमार्गदल्लिरबल्लडे
कूडलसंगमदेवनिगले ओलिव.
अनुवाद : वेदआगमाने सांगितले तसे वागावे, तसेच बोलावे.
त्याला सोडून वागू नये - बोलू नये मग मुक्तीपद मिळते.
अपहास्य होऊ नये अशा आचार मार्गात
राहणाऱ्यांनी कूडलसंगमदेवाला प्रसन्न करून घ्यावे.
केवळ बसवण्णांनीच नव्हे तर सर्व शरणांनी आपल्या वचनांत वेदोपनिषदांतील श्लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्याच प्रकारे मातुलागम, कारुणागम आदी शिवागमाचा अनेक ठिकाणी आदराने उल्लेख केला आहे. काही ठिकाणी केवळ सात्विक आक्रोश दिसतो. त्यामुळे त्या वचनांमागील  आशय व भूमिका समजून घेण्याची गरज आहे.
- अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर
९०४९२९०१०१








Saturday, 25 February 2023

ज्ञानालाच नव्हे, ज्ञानींनाही मृत्यू नाही, ते खऱ्या अर्थाने 'प्रज्ञा'वंत !

 


पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्याविषयी विचार करताना आठवतेय त्यांचे प्रवचन. मी स्वतः त्यांच्या दहा - बारा प्रवचन कार्यक्रमात सहभागी झालो आहे. शेकडो प्रवचने यूट्यूबसह इतर सोशल मीडियांत ऐकलो आहे. सुमारे १९ वर्षांपूर्वी कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील जत येथे चाललेल्या प्रवचनात सुमारे १५ हजार लोक सहभागी झाले होते. दूरदूरच्या गावातील लोक पहाटे तीन - चारला झोपेतून उठून बैलगाड्या - ट्रॅक्टरने एक - दोन तासाचा प्रवास करून त्यांच्या प्रवचनाला आल्याचे मी डोळ्यांनी पाहिलो आहे. हे केवळ एक - दोन दिवस नव्हे, तर महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमात दररोज न चुकता लोक हजेरी लावायचे. पहिल्या दिवशी आलेले एकही दिवस न चुकवता शेवटच्या दिवसापर्यंत कार्यक्रमात सहभागी होणारेच बहुसंख्य असायचे. तेव्हा गावात कोणतेही कार्यक्रम होत नव्हते. दिवसातून एक तास प्रवचन ऐकण्यासाठी संपूर्ण कुटुंबीय यायचे.

त्यादिवशी मी प्रथमच त्यांचे प्रवचन ऐकत होतो.  त्यादिवशी ग्रामीण जनताच बहुसंख्य असलेल्या कार्यक्रमात सिद्धेश्वर स्वामीजी 'गणित आणि जीवन' याविषयी बोलले. 'आज मी तुम्हाला गणिताविषयी सांगणार आहे...' म्हणून सुरुवात केल्यावर मला खरेच आश्चर्य वाटले. या खेड्यातल्या लोकांपर्यंत हा विषय कसा पोहोचेल, ते तो कसा स्वीकारतील, असे वाटले होते. जर मला त्याविषयी एक तास बोलायला सांगितले असते तर ते शक्य झाले नसते. इतरांना फारसे माहिती नसलेला, कठीण विषय सामान्यातल्या सामान्यालाही समजेल अशा प्रकारे सांगणे सामान्य काम नाही. आपण एखादा विषय स्पष्टपणे, खोलवर, विस्तृत जाणत असला तरच इतरांना नीट, सुलभरीत्या समजावून सांगणे शक्य आहे. तुम्हाला माहीत असलेला विषय इतरांना समजेल अशाप्रकारे सांगता येत नसल्यास तो विषय तूम्हालाच पूर्णपणे कळला नाही, असा त्याचा अर्थ आहे. काहीजण इतरांना सांगताना, 'हे तुला कसे सांगावे हे मला समजेना' ऐकला असाल. आपण नीट समजून घेतले तरच इतरांना समजेल अशा प्रकारे सांगणे शक्य आहे. त्यातच इतरांना माहीत नसलेला विषय समजावून सांगणे एक आव्हान आहे. त्या दिवशी सिद्धेश्वर स्वामीजींनी खेडुतांना गणिताच्या पायथागोरस थेरम, गुरुत्वाकर्षण नियम, E=mc^2, व्यास, त्रिज्या, थर्मोडायनामिक्स याविषयी सांगत ते त्यांनी (खेडूत) समजून घेण्याच्या प्रयोजनाविषयी विवेचन केले. मी विज्ञानाचा विद्यार्थी असूनही, ते शिकूनही सत्य जीवनात गणित, विज्ञानाची सूत्रे कशी आचरणात आणली पाहिजेत, याचा विचार केला नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनात 'विमान कसा उडतो' याविषयी बोलले. कार्यक्रमात एखादाही झोपताना, जांभया देताना दिसला नाही. त्यादिवशी त्यांनी एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगितले. दहा - बारा शास्त्रज्ञांच्या नावांचा उल्लेख केला. एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगताना मधमाशाची कथा सांगितली.

'आपण सर्वजण मधमाशी पाहिलात; त्याचा देह मोठा आहे, मात्र, पंख पातळ आहेत. देहाचा आकार आणि पंख यांच्यात खूप विरोधाभास आहे. एरोडायनामिक्स नियमानुसार मधमाशी उडायलाच नको. उडणेही शक्य नाही. तरीही ते कितीतरी हजारो वर्षांपासून उडत आहे. विमानाचा शोध लागण्याच्या आधीपासून मधमाशी उडत आहे. ते कसे ?' म्हणून विचारले. 'नंतर स्वामीजींनीच विवेचन केले - ',कारण त्या मधमाश्यांना एरोडायनामिक्स थिअरी म्हणजे काय, हे माहिती नाही. त्यांनी ती थिअरी वाचली नाही. त्यामुळे ते उडत आहेत. मनुष्य ही थिअरी जाणण्यामागे मधमाशी हे एक कारण आहे. मधमाश्याप्रमाणे विमान डिझाइन केल्यास उडेल, मात्र, खूप दूरपर्यंत उडणार नाही' असे सामान्यांनाही समजेल अशाप्रकारे विवेचन केले. मनुष्यही या मधमाश्यांसारखा आहे. आपल्याला आपल्या बल आणि बलहीनता माहिती असाव्यात. भीमाला त्याची शक्ती माहिती नव्हती म्हणे. त्यामुळे त्याने दहा हत्तींसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. कृष्णाला आपल्या बलहीनतेची माहितीच नव्हती. त्यामुळे तो देव झाला.' असे सांगून स्वामीजींनी त्या प्रसंगाची खऱ्या जीवनाशी तुलना केली. 

सिध्देश्वर स्वामीजी हे उत्तम व्याख्यात्यापेक्षा अद्भुत संवादक आहेत, असे अनेकदा मला वाटले आहे. व्याख्यात्यातील शाब्दिक चढ - उतार, अतिशयोक्ती, अलंकार आदी कोणतेही नव्हते. त्यात उद्वेग,  उद्घोष, गर्जना, अवमानकारकही नव्हते. त्यांचे प्रवचन म्हणजे एकप्रकारे संथ वाहणाऱ्या नितळ शाल्मलेचा प्रवाह होय. तेथे कोणतीही घोषणा, खुशामत, आत्मप्रशंसा काहीही नाही. त्यांचे बोलणे अशिक्षितापासून शिक्षितापर्यंत एकाच तरंगांतराने भिडायचे. त्यांचे बोलणे कधीही श्रोत्यांना संभ्रमित करणारे नसायचे. कोणीही न ऐकलेल्या मोठमोठ्या तत्त्वज्ञानी, विचारवंत, बुद्धिजीवींच्या नावांचा ते उल्लेख करायचे. बसव, बुद्ध, अरिस्टाटल, प्लेटो, कन्फ्युशियस, गुड्जिफ, थामस अक्विनास, इमर्सन, डेव्हिड ह्युम, जॉन लोके...आदी अनेक तत्त्वज्ञानी मंडळींचे विचार प्रवचनातून मांडायचे. त्यात तत्त्वज्ञानी मंडळींचा गौरव असायाचा, ते सगळे मला माहिती आहेत, हे स्वकौतुक नव्हे. त्या महान तत्त्ववेत्त्यांचे विचार आपल्या सामान्य शेतकरी, खेड्यातील लोकांच्या ज्ञान,  विचारांशी किती साधर्म्य राखतात, हे सांगण्यासाठी ते त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करायचे. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसायचा. एकदा ते प्रवचन सुरू करण्याआधी जवळच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. त्यादिवशी ते पक्ष्यांचे स्वारस्य आणि रोचक जगताविषयीच ते एक तासभर बोलले. त्यांच्या प्रवचनासाठी उभारलेल्या व्यासपीठासमोर साकारलेली सुंदर रांगोळी पाहून 'रांगोळी का घालावी, त्याचे महत्त्व काय?' याविषयीच संपूर्ण प्रवचन केले. त्यात दहाएक कथा, दृष्टांत, घटना, नीतिकथा असायच्या. स्वामीजी कोणत्याही प्रवचनाची कधीही पूर्वतयारी करत नव्हते. छोटीसी चिठ्ठीही कधी लिहून ठेवून घ्यायचे नाहीत. टिपण काढायचे तर विचारुच नका. ते लहान मुलांनाही रॉकेट सायन्स समजेल, कुतूहल निर्माण होईल अशा प्रकारे सांगायचे. त्यांच्याकडे मनगटी घड्याळ नसायचे. बरोबर एक तास होताच ते प्रवचन थांबवायचे. पुन्हा उद्या सर्वकाही नवीन असायचे. 

स्वामीजींच्या बोलण्यात 'हिडन अजेंडा' नसायचे. जाती, धर्म, पंथ, कुल - गोत्रांचे प्रवर्तकपण, प्रवक्तेपण नसायचे. त्यांची मुख्य चिंता ही मनुष्य कल्याण, समाजहित असायची. त्यामुळे ते सर्वधर्मियांना आवडायचे. साधारणपणे कोणत्याही मनुष्याला कोठेतरी आपले विचार, सिद्धांत, अस्तित्व मांडण्याची इच्छा असते. त्याला छोटे मोठे का होईना पण आपलेच एक साम्राज्य उभे करण्याची हितासक्ती असते. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींची हितासक्ती स्वतःला सर्वत्र नाकारण्यातच होती. ती लौकिकापासून दूर होण्यात होती. त्यांनी स्वतः साठी कशाचीही आकांक्षा बाळगली नाही. त्यांना खासगी आणि वैयक्तिक असे काहीच नव्हते.

मनुष्याला आरामात जगण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र, त्यांनी त्याचीही आकांक्षा बाळगली नाही. पैसा पाहिल्यावर आगीला पाहिल्यासारखे व्हायचे. त्याला कधी करंगळीनेही शिवले नाही. त्यांनी ज्ञानलोकात महाल बांधला होता. त्या जगतात पैशांचा व्यवहारच नव्हता. त्यामुळे त्यांनी पैशाच्या स्त्रोतापासून निर्माण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षाच केली नाही. ज्ञान आणि विवेक यापेक्षा काहीही चांगले नाही. पैसा त्यापुढे नीरस असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यामुळे  त्यांच्या जवळ आलेल्यांना त्यांनी ज्ञान व विवेक दिले. त्यातच त्यांनी सुख अनुभवले.  तेवढेच नव्हे, त्यासाठीच ते आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. ज्ञान कोणीही चोरून नेऊ शकत नाही, त्याचा नाश करू शकत नाही. त्याचा ठाव कुणाला लागू शकत नाही. त्यामुळे स्वामीजी केवळ ज्ञानार्जनाच्याच मार्गाने चालले आणि त्यात ते यशस्वीही झाले. अपार ज्ञान मिळविले. त्यांनी एकट्यांनीच त्याचा आनंद घेतला नाही, तर ते संपूर्ण जगाला वाटले. ते जेथे असायचे ते ठिकाणच ज्ञानयोगाश्रम बनवून टाकले. ज्ञानयोगी झाले. त्या जगात असलेल्या आनंदापेक्षा अन्य कोठेही ते असणे शक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करताच ते 'नको' म्हणाले. मनुष्याला आनंदाने जगण्यासाठी कोणत्याही नावाची गरज नाही. नाव ओझे आहे. ओळख म्हणून ते हवे, मात्र, तेच अस्तित्व बनून राहू नये. 

असे असताना नावाआधी पद्मश्री म्हणून शेपूट कशाला हवे म्हणाले. स्वामीजींनी मनात आणले कसते तर त्यांच्या ज्ञानयोगाश्रमात पैशांची नदीच वाहिली असती. त्यांना तसे भक्त, चाहतेही होते. त्यांनी फक्त डोळ्यांनी सूचना केली तरी पुरेसे होते. मात्र, ज्ञानापुढे सर्व नश्वर आहे, यावर विश्वास असलेल्या त्या सुज्ञानीने य:कश्चित गोष्टींसाठी हात पसरले नाही. व्यक्ती म्हटल्यावर साहजिकपणे गुण - दोष असणारच. नसल्यास तो देव बनतो. तसे असल्यास देवांमध्ये गुणदोष नाहीत का ? मात्र, सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यात तसे दोषही नव्हते. परंतु ही गोष्ट त्यांच्यासमोर सांगितली असती तर त्यांना सहन झाली नसती. ते संकोचाने आक्रसून गेले असते. कारण या प्रशंसेतील अपायकारकता, कृत्रिमतेची चाल त्यांना माहीत होती.  ज्ञानी नावाचा चादर पांघरलेल्यांना बिरुद - उपाधी, प्रशंसा हे सगळे चिल्लर ! आपल्या वागण्या - बोलण्यात समानता राखलेल्या स्वामीजींनी आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींकडे कधीही लक्ष दिले नाही. एक संत कसा असावा याविषयी स्पष्टता होती. ते गम्य शेवटपर्यंत जपलेले स्वामीजी आगीजवळ राहूनही त्याची उष्णता न लागता बकुळ, काटेरी धोतऱ्यासारखे राहिले !



सुमारे दोन दशकांपासून माझा 'श्रीं'शी निकटचा संबंध होता. ते कोणत्याही गावी असले तरी मी संपादित वर्तमानपत्रे दररोज वाचायचे. भेटल्यावर ते त्याविषयी बोलायचे. आम्ही दिलेले मथळे आठवणीत ठेवून उद्धृत (quote) करायचे. त्यामुळे ते किती गंभीरपणे वर्तमानपत्रे वाचायचे हे समजायचे. कर्नाटकातील कोणत्याही गावी प्रवचन असले तरी माझ्या परिचित स्नेहींच्या माध्यमातून बोलवायचे. 'श्रीं'च्या सूचनेनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये भालकी येथे चाललेल्या आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा आम्ही दोघेच एका  शेतातील मोठ्या झाडाखालील खूर्चीवर बसून सुमारे दोन तास केलेली लोकाभिमुख चर्चा विसरता येणारी नाही. ते संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवलेले क्षण एक सुंदर आठवण आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचन होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे 'श्रीं'चे प्रवचन ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते. सर्वत्र नीटनेटकेपणा, शिस्त होते. आलेल्या सर्वांनी आंघोळ करून, कपाळावर विभूती (भस्म) लावून स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती. इतर धर्मीयही श्रोत्यांच्या रांगेत बसलेले होते. मात्र, त्यादिवशी स्वामीजी बोललेच नाहीत. 'म्हणाले, आज भट बोलतील!' त्या पवित्र व्यासपीठावरून बोलण्याचे सौभाग्य स्वामीजींनी दिले. त्यादिवशी भालकीच्य हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरु आणि सुत्तुरु मठाचे जयराजेंद्र स्वामीजीही व्यासपीठावर होते. सिद्धेश्वर स्वामीजींनी दिलेली ती 'भेट' माझ्यासाठी शाश्वत आठवणीत राहणारी आहे. 

ज्ञानाला मरण नाही, ती शाश्वत आहे. ज्ञानींचेही तसेच आहे. तसे ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजींनाही. ते अमर आहेत. ते दोन्ही अर्थांनी 'प्रज्ञावंत!'

- विश्वेश्वर भट, संपादक, विश्ववाणी

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

 




माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट

  धारवाड… कर्नाटकातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच शहराने एक काळ असा पाहिला, जेव्हा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या ओळ...