Thursday, 9 February 2023

संताच्या रूपात भूमीवर अवतरलेला भगवंत!

 


जाती - मताच्या सीमा ओलांडून मानवीय जीवनाची जाणीव मनामनात जागवलेल्या त्या महान गुरू, मनुष्य हा मनुष्य म्हणूनच राहणे हाच धर्म या विचाराचा प्रचार प्रसार केलेल्या एका महान  संताचे युगांत झाले आहे. ते क्षण असे होते की,  समुद्राच्या लाटा येऊन कोसळाव्यात तसे लाखो - लाखो लोक येत होते. ओसाड मरुभूमीसारखा भास होत होता. लाखो भक्तांचे आक्रंदन आकाशाला भिडत होते ! सर्वत्र महामौन पसरल्याचा क्षण. तेथे हात जोडून उभे असलेले, पुष्पवृष्टी करणारे, गुरुदेवा म्हणून अश्रू ढाळणारे लोक होते.  ज्याप्रमाणे १२ व्या शतकात बसवण्णांचा कालखंड होता त्याप्रमाणे आताच्या २१ व्या शतकातील आधुनिक बसवण्णाच्या कालखंडाचेही अंत झाल्यासारखा भास होत होता. तेव्हा ज्या बुद्ध, महावीराच्या कालखंडाचा अंत्य झाला, आज त्याच प्रकारच्या नवबुद्धाचे काळही संपले ! तेव्हा ज्याप्रकारे विवेकानंद - रामकृष्ण परमहंस यांचा काळ निघून गेला, आज त्याच प्रकारच्या आधुनिक विवेकानंदाचा काळ निघून गेला ! शतकातील संत, एका युगपुषाच्या युगाचा अंत झाला आहे.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' कोणत्याही फलाफलाची अपेक्षा न करता तुझे कर्म तू कर या गीतातत्वाचे अक्षरशः आपल्या जीवनात अंगीकार करून ते कृतीरूपात आणलेले एकमेव संन्यासी श्री सिद्धेश्वर स्वामीजी होत. त्यामुळे ते एक खरे संत होते. 

  सामान्यतः स्वामीजी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एक मठ, भगवे वस्त्र, रुद्राक्ष माळा, पाद्यपूजा, पुष्पार्चण आराधना या गोष्टी येतात.  मात्र, अखंड संन्यासत्वाचे पालन करुनही सिद्धेश्वर स्वामीजींनी कधीही भगवी वस्त्रे परिधान केली नाहीत ! पीठावर तर चढलेलेच नाहीत ! सत्ता, सन्मानाची आकांक्षा बाळगली नाही ! सुख साधनांची लालसा मनाला शिवली नाही ! चुकूनही जातीच्या राजकारणामागे लागले नाहीत ! सरकारी पैशांतून मठ उभारले नाहीत. जैसे थे (आहे तसे) राहणे हेच खरे जीवन हे त्यांनी सांगितले. साधेपणातच सर्व काही सुंदर या मोत्यांसारख्या बोलण्यातून, भावभरित लेखनाने लोकांना प्रकाशाची वाट दाखवली. 'श्रीं' नी केवळ पैसेच नको म्हटले नाही तर खिसाही नको म्हटले. हे त्यांच्या जीवनाच्या पारदर्शकतेचे साक्ष होय. 

महिनाभर चालणाऱ्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचनांना मीही हजेरी लावून ऐकलो आहे. त्यांच्या प्रवचनाचा प्रभाव असा असायचा की, २००७ मध्ये आमच्या मुधोळ नगरातील महाविद्यालयाच्या मैदानावर स्वामीजींचे महिनाभर प्रवचन चालले होते. दररोज सकाळी बरोबर सहा वाजता प्रवचनाला सुरुवात व्हायची. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक पहाटे चार वाजता उठून आपली नित्यकर्मे आटोपून बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलवर प्रवचन ऐकायला यायचे. 'श्रीं'चा प्रत्येक शब्द लोकांना खिळवून ठेवायचा. त्यांचे प्रवचन सुरु असताना सुई पडला तरी आवाज यावा इतकी निशब्द शांतता असायची. या निशब्द शांततेत स्वामीजींच्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी थेट लोकांच्या हृदयाला भिडायच्या. स्वामीजींच्या प्रवचनातील सोपी भाषा, स्पष्ट निरुपण, मुख्य विचार ऐकणाऱ्यांच्या मनात रुजायचे. शिवाय लोकांना आपल्या जीवनात त्यांचा अंगीकार करतील यासाठी प्रेरणा द्यायचे. त्यांच्या बोलण्यात अशी अद्भूत शक्ती होती. त्यांच्या प्रवचनाचा एक सार सतत माझ्या कानात गुंजारव करते. "कोणीही मागे वाईट केल्यास ते विसरून जा, तू कोणाचेही चांगले केलेले असल्यास तेही विसरून जा." या दोन्हीही गोष्टी विसरल्यास तुझे जीवन सुखी होईल. ते आठवणीत ठेवल्यास तुझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत कोलाहल ! स्वामीजींनी सांगितलेली ही गोष्ट किती अर्थगर्भित आहे. 

 एकदा एका पत्रकाराने स्वामीजींना भेटून त्यांची मुलाखत घ्यावयाची असल्याचे सांगितले. त्यावर स्वामीजी म्हणाले, 'इथे मी १५ दिवस प्रवचन सांगणार आहे. आपण ते १५ दिवस प्रवचन ऐका. १६ व्या दिवशी आपल्याला काही विचारावे असे वाटल्यास तेव्हा मी मुलाखत देईन.' स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे ते पत्रकार १५ दिवस प्रवचन ऐकतात. १६ व्या दिवशी ते पत्रकार स्वामीजींना नमस्कार करून सांगतात, 'स्वामीजी, माझ्याकडे कोणताही प्रश्न नाही !' माध्यमकर्मीही स्वामीजींच्या प्रवचनाने प्रभावित झाले होते. 

  त्यांचे कोट्यवधी भक्तगण आहेत. तरी त्यांनी आपण सर्वश्रेष्ठ म्हणवून घेतले नाही. सनातन धर्माविषयी अपार ज्ञान असलेले स्वामीजी शरणांच्या वचन साहित्याचे मोठे जाणकार होते. त्यामुळे श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे प्रवचन म्हटल्यास तेथे लाखो लोक जमायचे. स्वामीजींच्या तोंडून बाहेर पडणारा एकेक शब्द मानवी जीवनाला नवीन मार्ग दाखविणारा असायचा. आध्यात्मिक जगताचा चक्रवर्ती म्हणून मिरविण्याच्या पुष्कळ संधी होत्या. मात्र, त्यांनी कधीही त्याविषयी आशा बाळगली नाही. परंतु कोट्यवधी भक्तांच्या मनात आध्यात्मिक चक्रवर्ती म्हणून राज्य केले. श्री सिद्धेश्वर स्वामीजी व शुभ्र वस्त्रांचे जन्मजन्मांतराचे अनुबंध असावे असे वाटते. अतिशय साधे कपडे परिधान करणारे स्वामीजी शेवटपर्यंत तसेच जगले. या माध्यमातून स्वामीजींनी भक्तांनाही धर्मजीवनाची दिशा दाखवून दिली. पुरस्कारांसह विविध गौरव, पैसे, भौतिक संपत्ती, ऐषाराम यापासून दूर राहून सिद्धेश्वर स्वामीजींनी खरे संन्यासत्व जीवनाचे भाग बनविले. केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन नव्हे तर ते साध्या जीवनाचा सोपा मार्ग आहे हे सर्वसामान्यांना समजावून सांगितले. त्याशिवाय त्यांच्यात आध्यात्मासोबत सतत ज्ञानाचा दिवा तेवत राहील, याची दक्षता घेतली. परंतु अलिकडे बहुतांश स्वामीजी हे राजकीय नेत्यांचे समर्थक बनल्याचे आपण सारे जाणतो. कोणीतरी एक चिल्लर नेता सत्ता गमावल्यावर त्याला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी दबाव टाकणे, आणखी कोणाला मंत्रीपद द्या म्हणून भरसभेत गर्जत मुख्यमंत्र्यांनाच दम भरणे,  अशा सर्व घटना आपण पाहिल्या आहेत. आजकाल अशाप्रकारच्या दांभिक स्वार्थी संन्याशांचा  भरणा आहे. अशाकाळात अशा कोणत्याही भौतिक विलासाकडे सिद्धेश्वर स्वामीजींनी आपले चित्तही भरकटू दिले नाही. त्यांनी  करंगळीनेही इशारा केला असता तरी त्यांना हवे ते आणून त्यांच्या पायी ओतणारा श्रीमंत भक्तवर्ग होता. इच्छा व्यक्त केल्यास मठात कोट्यवधी रुपये, सरकारी निधी येऊन पडला असता. मात्र, पैशांचा मोह मनालाच कलुषित करेल या विचाराने येणाऱ्या पैशाला डाव्या हातानेही शिवले नाही. 

"मीही नाही, तूही नाही, नाही हेही स्वतः नाही, गुहेश्वरही स्वतः बयलु या अद्भूत पारमार्थिक सत्याचे आपल्या जीवनभर पालन केले. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या स्वार्थरहित कर्मयोगाचे अनुसरण,  खऱ्या संन्यासत्वाचे आचरण केलेल्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे जीवन आम्हा साऱ्यांसाठी आदर्शवत आहे. अलिकडे  पुरस्कार, मानद डॉक्टरेट मिळविणाऱ्यांत अर्ज करुन व वशिल्याने ते मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींकडे आपणहून चालून आलेल्या पुरस्कार, सन्मानांची पट्टी छोटी नाही ! भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तर अनेक विद्यापीठे मानद डॉक्टरेट देण्यासाठी पुढे आली होती. तेव्हाही स्वामीजींनी ते अतिशय विनम्रपणे ते नाकारले.

अलिकडील काळात सर्व मठही अत्यंत श्रीमंत बनले आहेत. त्यांना सरकारकडून पुष्कळ अनुदान मिळत आहे.  त्यामुळे तेथील स्वामीजीही मठांची संपत्ती वाढवत आहेत. मुख्यतः राजकीय नेत्यांच्या भरपूर पैशांचे व्यवहारही मठांतून चालत आहेत. त्यामुळे त्या मठांची श्रीमंती वाढली असून त्यांची राजकीय नेत्यांचे अड्डे अशी ओळख बनली आहे. ही अत्यंत शोचनीय बाब आहे. मात्र,  सिद्धेश्वर स्वामीजींचे ज्ञानयोगाश्रम या सर्व मठांहून भिन्न आहे. एकदा राज्य सरकारने राज्यातील सर्व मठांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वामीजींच्या ज्ञानयोगाश्रमालाही कोट्यवधी रुपये देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन अनुदान स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा स्वामीजींनी अत्यंत विनयशीलतेने ते नाकारले. शिवाय 'कोणतेही मठ असो अथवा आश्रम ते केवळ तेथील भक्तांच्या दानातूनच चालावे. त्याव्यतिरिक्त सरकारच्या अनुदानावर नव्हे,' असे सांगून स्वामीजींनी अनुदान परत पाठवले होते. 

५ सप्टेंबर १९४० रोजी विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बिज्जरगी येथे स्वामीजींचा जन्म झाला. मोठा मुलगा सिद्धगोंडा बिरादार हा पुढे एके दिवशी या देशातील महान संत बनेल, देशविदेशातील लोक उत्सुकतेने त्यांचे विचार ऐकायला येतील, याचा त्या दाम्पत्याने विचारही केला नव्हता ! चौथ्या इयत्तेत शिकताना हा लहान बालक विजयपूरच्या यात्रेला गेला होता. तेथे ज्ञानयोगाश्रमाच्या मल्लिकार्जुन शिवयोगी महास्वामींचे प्रवचन ऐकला. त्यांच्या प्रवचनाच्या प्रभावाने पुढे त्या आश्रमात आला. त्या लहान मुलाचा लहानपणापासूनच आध्यात्माकडे ओढा होता. तेव्हाच बालकाने आपला गुरू शोधला होता. त्या गुरुनेही आपल्या जवळ आलेल्या परमाद्भूत शिष्याला ओळखण्यात विलंब केला नाही. ते कोणत्या जन्मातील गुरू - शिष्य संबंध होते माहीत नाही ! अद्भूत गुरू, परमाद्भूत शिष्यवृत्ती असलेले हे पुन्हा एकत्र आले. सिद्धगोंडप्पा सिद्धेश्वर झाले. आपल्या शिष्याला शिक्षण देतानाच त्याच्या अंतरंगातील आध्यात्मिक ज्योतीचा प्रकाश बाहेर आणण्याच्या प्रयत्नात मल्लिकार्जुन शिवयोगी यशस्वी होतात. कोठेही प्रवचनासाठी गेले तरी मल्लिकार्जुन शिवयोगी सिद्धेश्वर स्वामीजींना सोबत न्यायचे. तेथील लोक आणि त्यांचे जीवन समजून घेतानाच सिद्धेश्वरांच्या आतील ज्ञानयोगही जागृत झाले. नंतर कर्नाटक विश्वविद्यालयातून पदवी मिळवून कोल्हापूरच्या विद्यापीठातून तत्त्वशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. कन्नड, संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवले. 

    मल्लिकार्जुन शिवयोगी यांंच्यानंतर ज्ञानयोगाश्रमाची धुरा सांभाळत सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या साधेपणाने अपार जनमान्यता मिळवली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातही त्यांच्या अनुयायांची संख्या वाढली. आपल्या जीवनातील सुमारे ५० वर्षे प्रवचनाच्या माध्यमातून भक्तांच्या मनातील किल्मिष दूर करून तेथे सज्जनतेचा प्रकाश भरला. लोखंडाचे चणे म्हटले जाणाऱ्या उपनिषदांचे सार, जीवनाचे गमक, वचन, आध्यात्म आदी कोणालाही समजेल अशाप्रकारे अत्यंत सोपे करून सांगितले. 

गुरू मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे प्रवचन लिहून ठेवलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींनी 'सिद्धांत शिखामणी' या नावाने त्यांचा संग्रह प्रकाशित केला. तेव्हा स्वामीजींचे वय केवळ १९ वर्षे होते. त्यानंतर स्वामीजींच्या अनेक कृती प्रकाशित झाल्या. उपनिषद, भगवद्गीता यावर आणि शरण साहित्याविषयी पुष्कळ पुस्तके लिहिली. अल्लम प्रभूंच्या वचनांवर आधारित 'वचन निर्वचन', 'भगवत चिंतन' ही पुस्तके लिहिली. इंग्रजीतही  'God world soul' 'Patanjali Yoga Sutra' 'Narada Bhakti Sutra' 'Shiva Sutra' आदी ग्रंथ लिहिले. 

शेवटी, त्यांनाही वयोमानानुसार आरोग्याच्या समस्येने ग्रासले. आपल्या आश्रमात उपचार घेणाऱ्या स्वामीजींनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास नकार दिला. दर्जेदार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांनाही हात जोडून निसर्गाच्या विरोधात जाऊन जगण्याची मला इच्छा नाही, असे स्पष्टपणे सांगितले. समाजातील अज्ञानाचा अंधकार पळवून लावण्यासाठी त्या भगवंतानेच त्यांना पाठवले होते.  वैकुंठ एकादशीच्या दिवशी सायंकाळी स्वर्गाचे दार उघडण्याच्या वेळी भगवंताने त्या प्रकाशाच्या पुंज, त्यांच्या आत्म्याला बोलावून घेतले.

सामान्यपणे आपण इच्छामरण हे पुराणात वाचलो, ऐकलो आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या इच्छेनुसार देहाचा त्याग केला. देह मातीत ठेवू नका, तर त्याला अग्निसमर्पित करा, चिताभस्म नदीत विसर्जित करा, कोणतेही श्राद्ध विधी करू नका, स्मारक उभारू नका, मी या भूमीवर जसा आलो तसाच जायला हवा, माझे म्हणून कोणतीही गोष्ट राहू नये. कोणत्याही मनुष्याला भौतिक स्मारके ही जुवं ठेवणे शक्य नाही, हे स्वामीजींनी पूर्वीच अंतिम पत्रात लिहून ठेवले होते. 

संपूर्ण सरकारी इतमामात 'कर्मयोगी'ला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. 'श्रीं'च्या पार्थिव देहाच्या अंतिम यात्रेवेळी संपूर्ण राज्यात भक्तीचा उत्सव सुरु झाला होता. उभ्या जनसमुदायामुळे संपूर्ण रस्ते झाकोळून गेले होते. झाडे, घरांच्या गच्चीवरही जनहमूह उभा होता. मार्ग दाखविलेल्या गुरुला हात जोडून उभ्या लोकांसह ती मिरवणूक पाहून त्या सूर्यालाही पाझर फुटला होता ! उजेड जाऊन तारे दिसण्याच्या वेळी, अतिरिक्त संस्कारांविना, 'श्रीं'च्या  इच्छेनुसार त्यांच्या चितेला अग्निस्पर्श करण्यात आला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन न म्हणता जाती - पंथाच्या सीमा ओलांडून सुमारे २२ लाखांहून अधिक सर्वधर्मीय भक्त 'श्रीं'च्या अंतिम दर्शनासाठी जमले होते..

 आपल्या जीवनात प्रतिदिनी आणि शेवटच्या क्षणीही चांगले मार्गदर्शन करून, चांगलेच चिंतून, चांगूलपणच ज्यांचा श्वास होता त्या सिद्धेश्वर स्वामीजींनी काळाच्या हाकेला ओ देऊन, आपणच सांगितल्याप्रमाणे मृत्युला सामोरे जात मरण अनुभवले. तसेच नेहमीप्रमाणे मंदस्मित प्रसन्नतेने त्यांचा आत्मा 'परमात्मा' त लीन झाला. भविष्यातील मार्ग दाखवलेला गुरू अग्नीच्या प्रकाशात विरघळून गेला. "जीवन संपते, दिवा विझल्याप्रमाणे, समुद्राच्या लाटा विरल्याप्रमाणे, मेघ विरघळल्याप्रमाणे, उरणार केवळ बयलु, महामौन, शून्य सत्त्व !" गुरुने जागवलेल्या जाणीवेने मात्र त्या गुरुला आपल्यासोबत साध्य आहे, हा शेवटचा संदेश देऊन स्वामीजी भौतिकदृष्ट्या आपल्यापासून दूर गेले आहेत. मात्र, त्यांचे आदर्श, साधेपणा, घालून दिलेल्या निस्वार्थ मार्गावर चालणे शक्य झाले तरच तो गुरू सतत आपल्या जाणिवेत शाश्वत राहील. परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींनी लावलेला साधेपणाचा दीप शाश्वतपणे आम्हा सर्वांच्या हृदयमंदिरात प्रकाशमान होवो.

डॉ. जगदीश माने, धारवाड

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

  


Sunday, 5 February 2023

अल्लमप्रभूंचे मार्दवरूप श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी

वीणा बन्नंजे

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. जवळपास सन २००० च्या आसपासची. सत्यकाम यांच्या देहत्यागानंतर माझे जमखंडीकडे जाणे  येणे सुरू झाले होते. तेव्हा माझे हितचिंतक अशोक तुंगळ यांनी एका महान व्यक्तीची भेट घालून देतो, असे सांगून मला विजयपूरला नेले. तेव्हा ते कोण, काय याची मला काहीही माहिती नव्हती. तेच पूज्य श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी.

ते महनीय शुभ्र श्‍वेत वस्त्रधारी. ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलले. अशोक दादांनी माझा परिचय करुन देत सांगितले, हे सुम्मने (उगीच) नावाच्या आश्रमात राहतात. त्यावर स्वामीजींनी विचारले, काय करता. मी म्हणाले, स्वामीजी काहीही करत नाही. ओह! सुम्मनेमध्ये सुम्मने (उगीच) राहता काय ?  असे म्हणत ते हसले. नाही, स्वामीजी उगीच माझ्यातील गोंधळ पाहते, असे मी सांगितले. ओह ! म्हणत स्वामीजींनी भुवया उंचावताच त्यांच्या चेहर्‍यावर कौतुक झळकले. पुन्हा प्रश्‍न विचारले, तेथील बागबगिचा (शेती)  पाहता का. मी उत्तरले, नाही स्वामीजी, बाग आमचे क्षेमकुशल पाहते. पुन्हा मंदहास्याने त्यांच्या चेहर्‍यावर कौतुक झळकले. अध्यापन करत होता म्हणे का सोडलात, असा त्यांचा प्रश्‍न. त्यावर मी उत्तरले, "मी अध्यापन करत नव्हते, अध्यापन करतेय हे समजले, ते सोडून दिले. ओह! स्वामीजी म्हणाले. माझे कोरडेशुष्क, उलटेसुलटे उत्तर. मात्र, स्वामीजी शांतपणे ऐकत होते, त्यांच्या चेहर्‍यावर हास्य कायम होते.  

त्यांचा निरोप घेताना एकदा आमच्या बागेत येण्याचे त्यांना निरोप दिले. वाह! अवश्य येऊ, असे स्वामीजी म्हणाले. त्यानंतर २००२ ची आठवण. सत्यकाम यांच्या आराधना कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेले होते. तेव्हा उत्तर कर्नाटकात त्यांचे प्रवचन सुरू होते. ते येणे जमणार नाही, असे म्हणू शकले असते. मात्र, ते आमच्या शेतात आले. त्यांना शरण आणि तंत्र हा विषर देऊन त्यावर बोलारला सांगितले होते. त्यांनी होकार दिला होता.  वेळेच्या बाबतीत ते खूपच शिस्तप्रिय असल्याचे तेव्हा मला माहीत होते. ठीक १०.३० ला कार्यक्रमाची सुरुवात होईल, १२ ते १ आपले प्रवचन राहील, असे त्यांना म्हटले होते. ते १०.२९ ला कार्यक्रमस्थळी आले. आम्हीही १०.३० ला कार्यक्रमाची सुरुवात केली. ते येणार असल्याने कार्यक्रमाला लोकांनी गर्दी केली होती. दरवर्षी सत्यकाम यांच्या  समाधीला पुष्पार्पणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्याची आमची परंपरा होती. त्यानुसार स्वामीजी समाधीजवळ आले. मात्र, पुष्पार्पण केले नाही. सर्वांसोबत हात जोडून समाधीसमोर उभे राहिले अन् परतले. म्हणजे त्यात अहंकार नव्हता. तसेच व्यासपीठावर सत्यकाम यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे आमचे नित्यक्रम होते. ते सर्व अतिथींसोबत दीपप्रज्वलन करण्यासाठी उभे असल्यासारखे उभे होते. एकाचे संपल्यावर उरलेल्यांना दीपप्रज्वलन करायला सूचवत होते. ते केव्हाही दीपप्रज्वलन, आरती केले नाहीत. छोट्या- छोट्या कार्यातही कडेला थांबलेल्या अल्लमाचे रूप !

त्यांच्या आधी इतर अतिथींची भाषणे होती. त्यांची भाषणे संपून स्वामीजींची वेळ आली तेव्हा १२.१० वाजले होते. स्वामीजी शरण आणि तंत्र हा विषय मांडून बरोबर १ वाजता थांबले. आम्ही त्यांना एक तासाचा वेळ दिला होता. आम्ही १० मिनिटे गमावल्याचे आम्हाला कळले. मात्र, वेळ चुकल्याने काळाने दिलेल्या इशार्‍यासारखे त्यांचे जीवन. दारात बसवण्णाचे वाट पाहताना त्याने न येता मुलाला पाठविल्यावर निघालेल्या कालदूत अल्लमासारखे स्वामीजीही न बोलता मौनपणे निघाले. त्यांनी शरण आणि तंत्र याविषयी केलेले विवेचन खूप सुलभ होते. लहान मुलालाही समजेल अशाप्रकारे क्रमाने अलगद एखाद्या फुलाच्या पाकळ्या काढून दाखविल्याप्रमाणे होते.

एक राजा होता. खूप चांगली फळझाडे वाढविली होती. तेथे खूप लोक येत होते. तेथे येणार्‍यांना तो फळे कापून द्यायचा. सर्वांनी त्या फळांची चव चाखून त्यांची गोडी अनुभवली. एकजण तेथे आला. राजा त्यालाही फळे द्यायला गेला. मात्र, तो म्हणाला, राजा, मला फळ नको, त्याच्या  बिया दे. राजाने त्याला बिया दिल्या. त्याने आपल्या शेतात बिया लावल्या. त्याची झाडे झाली, फळे लागली. ती पिकली. एकदा विहाराला बाहेर पडलेला राजा त्या बागेत पोहोचला. तेथे तो होता. त्याने राजाला फळे दिली. हे तंत्र, तो शरण असे स्वामीजींनी सांगितले. कसले अपूर्व उदाहरण. तंत्र म्हणजे टेक्निक, तंत्र म्हणजे काळी जादू आदी विद्या, तंत्र म्हणजे परमार्थात विस्तार होय, यासह सर्व अर्थांचा उलगडा स्वामीजींनी केला. शरणांची भूक, समर्पणाचेही प्रतिबिंब त्यात होते. मुक्तायक्काला मृत्यूचे गूढ सहजपणे उकलून सांगणार्‍या अल्लमसारखी ती रीत होती.

त्यानंतर तलावाच्या बांधकामात गुंतले होते. त्याचे उद्घाटन स्वामीजींच्या हस्ते व्हावे, ही माझी इच्छा होती. केव्हाही कलहळ्ळीला बोलावल्यावर कधीही नाही म्हटले नाहीत. यावेळेसही आनंदाने आले.  त्यांच्यात विशेष प्रेम होते. प्रत्येकाला ते आमच्यावर प्रेम करतात, असे वाटायचे. ते कसे माहीत नाही. पण मी त्यांचे प्रेम अनुभवले, हे माझे भाग्य आहे. त्यांनी तलावाचे पाणी तलावातच सांडून त्याचे उद्घाटन केले. त्या दिवशी पूज्य श्री सुत्तुरु स्वामीजी व माझे वडील बन्नंजे गोविंदाचार्यही उपस्थित होते. तलाव खोदल्यानंतर सिद्धराम अहंकारात असताना तेथे आलेले अल्लम त्यांना म्हणाले, आता दगड घडविण्याचे (वडाराचे) काम थांबव, कल्याणला चल. त्या अहंकाराविषरी अल्लमाने नाराजी व्यक्त करीत दिलेल्या इशार्‍याविषयी मी प्रास्ताविकात बोलले. तसेच मी रडत प्रार्थना केली,  ज्यांना भक्तीपूर्णरीत्या पाहते त्या श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींनी मला हे दगड घडविण्याचे काम संपवून त्या कल्याणकडे चालण्याचे आशीर्वाद द्यावे. या समाजसेवेत वेळ घालविणे नकोसे झाले आहे. मला या समयसिद्धीच्या कार्यातून मुक्त करा.  त्या दिवशी स्वामीजींनी खूप वेळ आमच्या  कामाचे कौतुक केले. म्हणाले, ते सर्वकाही करुनही काही न केल्यासारखे शांत बसलेले आहेत. त्यामुळे ते आनंदी आहेत. त्यामुळेच त्यांनी आश्रमाला सुम्मने (उगीच) म्हणून नाव ठेवले आहे. ते सर्वांनी ठेवण्यासारखे नाव नाही. आपण ते नाव ठेवून पाहा, त्याचे परिणाम अनुभवा, तेव्हा आपणांस समजेल. त्याच्यात सत्यकाम  आहेत. काम आहे, मात्र ते सत्याचे काम आहे. केवळ अशाप्रकारे जगल्यास सत्यकाम म्हणावे, नाहीतर ते असत्याचे काम. येथील झाडे, जमीन पाहा, त्यात सत्याचे काम आहे, त्यामुळे हे असे आहे...ते निघताना मी खूपवेळ त्यांच्या पायावर पडून अश्रूंचा अभिषेक घालत होते. आता नको, मला या कर्मबंधनातून मुक्त करा, ही माझी आंतरिक प्रार्थना. खूप वेळानंतर मी उठताना ते मात्र घनमौन. शांतपणे डोळे मिटलेले होते. मी त्यांच्याकडे आर्तपणे पाहत होते. ते स्मितहास्य करत तेवढ्याच करुणामयीप्रमाणे हात जोडले. तितक्यात जसे काही न समजता सिद्धरामाने अल्लमाचे अनुसरण केले तसा मला अनुभव. 

२००६ च्या मध्यात सतत कलहळ्ळी सोडण्याची भावना तीव्र होत होती. २००७ मध्ये ती भावना आणखी तीव्र झाली. तेथे सुरू झालेल्या कामासह सर्व काही सोडून बाहेर पडले. तेव्हाही स्वामीजी आसपास कोठेही असल्यास भेटायला जात होते. एकदा सुत्तुरु मठात वास्तव्यास होते. सुत्तुरु श्रींच्या आमंत्रणानुसार आनंदाने जाऊन त्यांच्या दर्शन घेतले. त्यांचे वायू विहारच वैशिष्ट्यपूर्ण होते. ते डोंगर चढायला लागल्यास असे चालायचे की त्यांच्यासोबत चालणे कष्टाचे व्हायचे. ते सूर्योदय, सूर्यास्तावेळी डोंगरावर बसले असताना त्यांच्यसोबत चालणारे सत्संग अप्रुपच. ते बोलतील म्हणून आपण जायचे. ते तेथील प्रत्येकाचा परिचय करून घेऊन त्यांचे विशेष अनुभव, त्यांच्या क्षेत्रातील वेगळी माहिती, त्यांच्यातील ज्ञान याविषयीच जाणून घ्यायचे. मात्र, ते बोलायचे नाहीत. सुत्तुरुच्या वॉकिंगवेळी त्यांच्या सत्संगाच्या ओढीने मीही अनेकांसोबत डोंगर चढून गेले. ते सर्वांशी माझा परिचय करून दिला. तसेच मला बोलण्याची सूचना करत म्हणाले, 'हे खूप अनुभवी आहेत, त्यांचे बोलणे ऐका.' नाही स्वामीजी, मी आपले ऐकायला आलेय, मी बोलणार नाही, असे मी म्हणाले. तरीही ते बोला म्हणाले. मीही माझा हट्ट सोडले नाही.  स्वामीजींच्या समोरच तेथील सर्वजण स्वामीजींचा आदेश डावलू नका, बोला म्हणून आग्रह करू लागले.  तेवढ्याच सलगीने मी का बोलत नाही, हे स्वामीजी जाणतात, होय ना स्वामीजी असे मी म्हणाले. ते मंदहास्य करत होते. त्या हास्यात मला कौतुकाचे आनंद दिसत होते. माझा सात्विक हट्ट त्यांना आवडायचा. वेळोवेळी त्याचा अनुभव मी घेतले आहे. 

आणखी एकदा स्वामीजी सुत्तुरुमध्ये असताना मी एकटीच त्यांना शोधत गेले.  दरवेळी कोणा ना कोणाला घेऊन जायचे. त्यांचे दर्शन घेऊन परतण्याचा विचार होता. स्वामीजी गवताच्या शेतात एकटेच बसले होते. नमस्कार केल्यानंतर ते विचारले, "काय करत आहात?" तेव्हा मी माझ्या वडिलांच्या आत्मचरित्राचे ध्वनिमुद्रण करत होते. वडील त्यासाठी दररोज दोन तास वेळ द्यायचे. सर्व ध्वनिमुद्रण लिहून पुढे एक पुस्तक लिहायचा उद्देश असल्याचे सांगितले. स्वामीजी आस्थेने म्हणाले, "खूप चांगले काम करत आहात. मोठी व्यक्ती किती कष्ट घेतलाय, कसा मोठा बनलाय, त्यामागे काय परिश्रम आहे, हे सर्व कळायला हवे. लोकांना मोठी व्यक्ती दसते, मात्र, त्याचे हे कष्ट दिसत नाहीत. आपण आचार्यांची पार्श्वभूमी सांगायला हवी." त्याक्षणी जे सूचले ते मी विचारलेच, स्वामीजी आपण का आपले आत्मचरित्र लिहू नये ? आज आपण ज्या उंचीवर आम्हाला दिसता त्यामागे काय आहे, हे आपणही लिहा ना ? त्यांचे पटकन बाणासारखे उत्तर, "घटनाच नाहीत, काय आत्मचरित्र लिहायचे ?" हे कसले अद्भूत उत्तर. त्यानंतर मी काहीही बोललेच नाही. घट असेल तरच घटना ना? छे ! इथे एकही घटना नसल्याचे स्वामीजींनी त्यादिवशी समजावले. त्या घटकेला माझे शरीर रोमांचित झाले, अश्रूधारा वाहत होत्या. मी का रडतेय, हे त्यांना समजत होते. तरीही मौनपणे त्याच हसन्मुख चेहऱ्याने आनंदाने प्रेमपूर्वक पाहत होते. बसवण्णाला न स्वीकारता बसवण्णावर अगाध प्रेम केलेल्या अल्लमाचा भाव. 

आमच्या तलावाच्या दशकपूर्ती कार्यक्रमास पुन्हा स्वामीजी आले होते. कधीही ते निसर्ग, रोपे, झाडे,  याविषयी कोणीही ऐकायला हवे. ते एक विशेष जगत. ते रोपाचा नाजुक फुटवा व्हायचे. फुलाचा परिमळच ते. तेच फळाचे माधुर्य. निसर्गाच्या वेदनाच त्यांच्या वेदना. भूमी, जल, रोप, झाडांना दिल्या जाणाऱ्या वेदना त्यांच्यावरच केला जाणारा हिंसाचार इतके तादात्म्य त्यांच्या बोलण्यात असायचे. त्या दिवशीही ते निसर्गमय होऊनच बोलले. प्रवचन संपल्यावर ते निघाले. त्या दिवशी नाट्य निर्मिती क्षेत्रातील प्रसन्न नावाचे आणखी एख आतिथी होते. सिद्धेश्वर स्वामीजी गेल्यावर ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, "त्या सिद्धेश्वर स्वामीजींजवळ काही दिवस राहू देतात का?" याविषयी मी जास्त सांगणार नाही. मात्र, विरोधकांवरही सिद्धेश्वर स्वामीजींचा कशाप्रकारे प्रभाव पडायचा, हे समजले तर पुरेसे आहे. 

खूप दिवसांपासून माझ्यात स्वामीजीच माझे अदृश्य गुरु ही भावना निर्माण झाली होती. हे मी माझ्या अनेक व्याख्यानांतूनही सांगितले आहे. तसे पाहिल्यास  नित्य स्मरण करत नव्हते.तरीही 

कोठूनतरी दूरवरून ते शुभाशीर्वाद देताहेत अशाप्रकारे भक्ती होती. एकदा माझ्या वाढदिवशी पहाटे एक स्वप्न पडले. "आज माझा वाढदिवस आहे, आपले आशीर्वाद राहूद्या" म्हणून त्यांच्या पाया पडले. त्यांनी तुम्ही निवडलेला मार्ग चांगला आहे, मी तुमच्यासोबत आहे" म्हणून आशीर्वाद दिला. त्या दिवशी मी आश्चर्यचकित झाले. कारण मी स्वतः कधीही त्यांच्याविषयी असा विचार केले नव्हते. त्याचा इतका मोठा परिणाम झाला होता की मी खूप आनंदी होते. मात्र, मी मनात ठेवू शकत नसल्याने एकदा त्यांच्याकडे जाऊन मला असे झाल्याचे सांगितले. ते फक्त हसले, आत प्रेम भरुन ओसंडून वाहत होता. 

दोन वर्षांपूर्वी एकदा मी मित्रांसह कलहळ्ळीला आले तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण होते. त्यादिवशी शेतात आलेल्या २० जणांना घेऊन स्वामीजींकडे गेले होते. सर्वांनी उपवास धरला होता. स्वामीजींना नमस्कार करून खाली बसल्यावर विचारले, "स्वामीजी, ग्रहणादिवशी जेवण करू नये म्हणतात, ते कशामुळे ?" मात्र,  आमच्याकडूनच उत्तर काढून घेण्याचा त्यांचा नित्यक्रम. "ठीकंय, आपण सारे आलात ना, आपण जेवण केलात का?" असे विचारले. माझ्यासोबत आलेले सर्वजण 'नाही' म्हणाले. एकेकाला 'का जेवला नाहीत ?' म्हणून विचारले. "देवस्थानचे दरवाजेच बंद असतात, देवालाच नैवेद्य नाही, आम्ही कसे जेवायचे?" असे एकाचे उत्तर. "सर्वजण जेऊ नये म्हणून सांगतात, त्यामुळे जेवलो नाही" असे दुसऱ्या एकाचे उत्तर. "आम्हाला प्रकाश देणाऱ्या त्या देवालाच प्रकाश मिळत नाही. त्याला काही झाले असताना आम्ही आरामात बसून कसे जेवायचे?" असे एका स्त्रीचे प्रश्न. स्वामीजी म्हणाले, यांचे बोलणे चांगले आहे पाहा. तुमच्या कुटुंबाला भोजन देणारा बाप नेहमीच्या वेळी घरी परतला नाही, तो दिसलाच नाही तेव्हा तो येईपर्यंत आपण त्याची भोजनासाठी वाट पाहता; तोपर्यंत आपण भोजन करत नाही, खरंय ना. तसे असेल तर चांगले असे या माईला वाटलेय पाहा. "आम्हाला प्रकाश देणाऱ्याला काही झाले आहे, त्याला आराम मिळो, त्यानंतर भोजन करू. कोणाचीही जोडी अशी असल्यास खूप चांगले. इथे असलेले झाडे, वेली, सूर्य, चंद्र हे सर्व आपले कुटुंबीय आहेत, ही भावना मोठी आहे." असे स्वामीजी म्हणाले.गहन विषय सोपे करून सांगण्याची ही त्यांची पद्धत. आम्हाला नकळत आम्हालाच अखंडभावात बुडवून टाकण्याची ताकद होती. ही मनापुढील मोहच माया जाणा (मनद मुंदण आशेये माय काणा ) असे म्हटलेल्या अल्लमाची रीत होय. 

एकदा सुत्तुरुमध्ये माझे भाषण होते. त्यानंतर स्वामीजींचे प्रवचन होते. मी प्रेक्षकांत पहिल्या रांगेत होते. स्वामीजींच्या समोरील टेबलवर एक गुलाबाचे फूल होते. ते बोलायला लागले, "हे गुलाबाचे फूल, याचे रंग लाल आहे. गुलाबी रंगात खूप रंग आहेत. याच्या रोपाला खूप काटे आहेत. त्यामुळे अशी माती असल्यास अशाप्रकारची फुले वाढतात. त्यासाठी असे खत हवे, त्याची फांदी इतकी कापायला हवी, ते इतक्या खोल खड्ड्यात लावायला हवे, इतके ऊन हवे, इतके पाणी द्यायला हवे. हे सर्व एकानेच जाणलंय, त्याने गुलाबाचे फूल पाहिले नाही, झाडाला स्पर्श केला नाही, फुलाचा सुवास घेतला नाही. मात्र, त्याला गुलाबाविषयी सगळं समजलंय तो ज्ञानी." 

आणखी एकजण आहे. त्याने शेतात गुलाबाचे रोप लावले आहे. पाणीही दिलाय, कळीही पाहिलाय, काटेही टोचून घेतलाय, त्याला फुलाचा रंग माहिती आहे, त्याचा वासही घेतलाय, माती, पाण्याविषयी जाणतो, त्याने गुलाबाविषयी वाचले नाही, मात्र अनुभवलाय, तो तो अनुभवी. 

आणखी एकाने कधीही गुलाबाचे फूलच पाहिले नाही, त्याविषयी ऐकले नाही, वाचलेही नाही. एकाएकी त्याला कशाची तरी ओढ, ते आतून सांगतंय, तू अजून इथेच का बसलास ? चल, तिथे एख फूल आहे, बघ. कुठे आहे शोध...अशाप्रकारची ओढ. तो थांबेना, बसेना, कुठपर्यंत जायचे हे माहीत नाही. तो तसाच चालत चालत राहतो...आतला आवाज, तेच बोलावून नेतेय. तो तसाच जात राहतो. कुठे अमेरिकेत राहणाऱ्याने बोलवावे तसे तो गाव, देश सोडून कोणत्यातरी उद्यानात आला. तेच ते त्याला दिसणारे ते फूल त्याला तेथे दिसले. सुवास कळले. त्याला बाहेरचे पाहणे पुरेसे वाटले नाही. तो आत शिरला, त्याचे अंतरंग भरुन गेले. तेथेच तो नाहीसा झाला. तो अनुभावी. 

ज्ञानी बनता, अनुभवी बनता की अनुभावी बनता याचा विचार करा', असे स्वामीजी म्हणाले. हे माझ्या जीवनात अविस्मरणीय उपदेश ठरले. ते केवळ ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग याविषयी सुलभरीत्या केलेले विवेचन नव्हते तर मला आतून मारुन उठवून फुलात बुडून जा म्हणून केलेल्या आदेशाप्रमाणे आताही गुणगुणत आहे. 'मी' पणाचा अहंकार उष्टेइतकेच अभिन्न पाहा गुहेश्वरा या गूढ वचनाचे हे इतके सोपे निरुपण होय. 

खूप काही सांगण्यासारखे आहे. मात्र, स्वामीजी त्या साऱ्यांच्या पलिकडे आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील एक स्वच्छ, सुंदर गाव. ते गाव निश्चितच आवर्जून पाहायला हवे. तेथून मला बोलावणे आले. अमुक दिवशी सिद्धेश्वर स्वामीजी येणार आहेत, आपणही यावे, असे सांगण्यात आले. मला अन्य कोणतेही विवरण कशाला हवे ? स्वामीजी बोलावले तेव्हा जायचे. गायीच्या मागे लागलेली भूकेली वासरू मी. (हसु (सि)विन बेन्नु हत्तिद करु नानु).

सकाळी नऊच्या आत त्या गावी पोहोचायचे होते. कलहळ्ळीहून पहाटे पाचला मी मित्रांसह कारने निघाले होते. वाटेत गावांनजीकच्या रस्त्यांच्या बाजुला घाणीचे दृश्य. नैसर्गिक वैभव, सूर्योदय त्यामुळे झाकोळले गेले होते. मला खूप वाईट वाटले. तेथे पोहोचल्यावर स्वच्छ, सुंदर गाव स्वागताला सज्ज होते. एकेक निर्मल गाव. नरकातून स्वर्गात आल्याचा अनुभव होता. मला आयोजख स्वामीजींसोबत व्यासपीठावर बसायला बोलावत असल्याचे माहीत नव्हते. मी नकार दिल्यावर स्वामीजींनी डोळ्यांनीच सूचना केली. मी त्यांच्या बरोबर कशी बसेन ?  खाली जमिनीवर बसले. स्वामीजींनी मला बोलण्याचा आदेश दिला. आधीच माझ्या डोळ्यांतून अर्धे पाणी आले होते. तेथील स्वच्छता, सुंदरतेने माझे अंतरंगही धुवून पाणीच पाणी केले. संपूर्ण प्रवासात रस्त्यांत  हॄदय पिळवटून टाकणारे दु:ख होते. मी जास्त बोललेच नाही. स्वामीजींचे सामीप्य लाभेल म्हणून मी आलेली. दुसरी कोणतीही गोष्ट माझ्या आवडीची नाही. त्यांच्यासोबत बसले हे पुरेसे आहे. तरीही या स्वच्छतेला नमन. संपूर्ण देशात हे चित्र निर्माण व्हायला हवे. हे एकटे मोदी करू शकणार नाहीत. सगळ्यांत ही भावना निर्माण व्हावी. कुत्रे, मांजरही आपण केलेली अस्वच्छता दिसू नये यासाठी त्यावर माती टाकतात. हे मनुष्याला का समजत नाही ? "ईश्वरा सगळ्यांना ही बुद्धी दे, आमच्या आतील, बाहेरील अस्वच्छता दूर कर" अशी प्रार्थना करत हात जोडून रडतच मी खाली बसले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होत्या. 

स्वामीजी बोलायला लागले. त्या गावातील स्वच्छतेचे कौतुक केल्यानंतर म्हणाले, "येथे बसल्यात ना, त्या अनुभावी आहेत. ब्रह्मवादिनी आहेत. त्यांच्या डोळ्यांतील पाण्याला खूप अर्थ आहेत..." त्यांनी सांगितलेले या जीवनाला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार होय. आता कोणी काही दिले तरी नको, हे पुरे ही भावना प्रबळ झाली. त्यांना तसे वाटल्याने जन्म सार्थक झाल्याचे वाटले.  आणखी खूप चालायचे आहे, त्यांचे विचार पाठीशी असावेत, त्यांनी चालवावे अशी प्रार्थना केले. धुक्याने झाकलेले फळ खाल्ले तर तुमची शपथ जाणा गुहेश्वरा असे अल्लमाने म्हटल्याचे आठवले. 

असे माझे परमप्रिय स्वामीजी पडल्याने हाड मोडल्यावर ते कणेरीत असताना भेटायला गेले. 'कसे आहात स्वामीजी' असे विचारल्यावर त्या वेदनेतही हसत आरामात असल्याचे म्हणाले. दुखतंय का विचारल्यावर हसतच म्हणाले, 'होय, चालताना... हात वर करताना दुखतेय.' त्यांना किती वेदना होत असतील याचा अंदाज येत होता. मला 'आपण कशा आहात?' विचारले. त्यांना पाहत आपल्या आशीर्वादाने चांगले असल्याचे म्हटले. 'आपण आनंदात राहणाऱ्या आहात. आनंद हाच आपला जीवभाव आहे. आनंदातच राहता.' म्हणाले. त्यांचे आशीर्वाद हीच भेटवस्तू होय. त्यांना न समजलेले काय आहे ? त्या हितकारक गोष्टींचा संचय घेऊन मी परतले. 

अशाप्रकारे संस्कारित केलेल्या स्वामीजींनी अन्नत्याग केल्याचे कळलेच नाही. चिक्कमंगळुरुतील काम आटोपून निघताना एका मित्राने फोन करून विचारले, 'सिद्धेश्वर स्वामीजींना बरे नाही म्हणे. ते व्हीलचेअरवर असल्याचा व्हिडिओ पाहिलो.' तेव्हा त्यालाही काही माहिती नव्हती. मीही त्यांना वयोमानानुसार काही शारीरिक त्रास असल्याचे समजले. मी मनातच देवा, ते कधीही अंथरुण धरुन कण्हायला नको, अशी प्रार्थना केले. चिक्कमंगळुरुचा प्रवास संपवून ३१ डिसेंबरला पोहोचले. मी तीन वर्षांपासून वृत्तपत्रे वाचली नव्हती. सहा वर्षांपासून टीव्हीचा संपर्क नव्हता. मोबाईलमध्ये बातम्या बघायचीही हवय नाही. या सर्व 'नाही' च्या मध्ये एक तारखेला घरी अतिथी होते. 

दोन जानेवारीला रात्री बारा वाजता अचानक श्री सिद्धेश्वर स्वामीजींना भेटायला जाण्याची भावना निर्माण झाली. तेव्हाही ते अत्यवस्थ असल्याचे मला माहीत नव्हते. टीव्ही पाहून समजल्यानंतर माझ्या कोणी आप्त मंडळींनीही मला सांगितले नाही. सगळ्यांना माहिती झाली आहे, मलाही माहिती असेल असे त्यांना वाटले असावे. अशावेळी काही माहिती नसताना, कोणीही सांगितले नसतानाही तरीही मनात तीव्र ओढ होती. त्यांना समोर पाहून झुकलेली मान, हा मार्ग चांगला आहे, या मार्गावरुनच चालत राहा, मी तुमच्या सोबत आहे, असे सांगितलेल्या घटनेचे पुनर्दर्शन झाले. स्वप्न, भ्रम नव्हे, जागेपणी अनुभव आला. तेवढेच माहीत, पुढे...

मी दुपारच्या बसने निघून रात्री अकरा वाजता हुबळीला पोहोचणार होते. त्यासाठी तिकिटही बुक केले होते.  तेथून मित्राच्या कारने विजयपूरला पोहोचण्याच्या घाईत होते. वाटेत बातमी आली. बसमधून उतरल्यावर मित्राने अंतिम अभिवंदन पत्र वाचून दाखवली. जीवनविषयक, आध्यात्मविषयक किती सुंदर विवेचन केले होते. देहाला अग्निसमपर्पित करा असे सांगितलेला भाग, स्मारक उभारू नका म्हणून दिलेला आदेश अपूर्व होता. माझ्या वाट्याला केवळ त्यांचे देहदर्शन आले. त्यांना नमन केले. 

अनेकांना त्यांनी धरलेला उपवास, देहत्यागानंतर अग्निसमपर्पित करण्याची सूचना ही जैन धर्माची भूमिका असल्याची भावना होती. अनेकांना त्यांना वेदोक्ताविषयी आसक्ती असल्याचे वाटत होते. प्रकृती तत्त्व जाणणाऱ्यांंना, सिद्धेश्वर स्वामीजींनी अल्लमाच्या 'बयलु'चा केलेला उल्लेख वाचल्यावर वेगळाच प्रकाश दिसला होता. या पंचमहाभूतांत देह नावाचा हा पंचमहाभूत लीन व्हावा. त्यासाठी हा देह किंचितही न ठेवता 'बयलु' मय करणे अग्निशिवाय कोणाला साध्य आहे ? 

पंचभूतांत जल, भूमीची वाकडीतिकडी चाल आहे. मात्र, केवळ अग्निची चाल उर्ध्वमुखी आहे. त्यामुळे  अल्लमाने सांगितल्याप्रमाणे स्वामीजी 'बयलु' झाले. 

अंगाराच्या गिरीवर पाहिला मी लाखाचा खांब

त्या लाखाच्या खांबावर होता एक हंस, 

जळला खांब, उडाला हंस, 

लपला कुठे अंगारा, हे गुहेश्वरा. 

एवढे मात्र जागरुकपणे पाहिले आहेत. तसे नसेल तर का सोडून गेले ? खांब जळाल्याचे पाहिल्यावरच हंस उडण्यासाठीच उपवासाला सुरुवात केला होता. 'बयलु' व्हावे, कोणत्याही खाणाखुणा राहू नयेत यासाठीच अग्निसमपर्पणाचा निर्णय घेतला. चिताभस्मही कोणाच्या हाती लागू नये अशाप्रकारे नदीत विसर्जित करण्याचा आदेश दिला. समाधिस्थ होणारे महात्मा भक्तांची हाक ऐकून येतात, त्यांच्या संकटांचे हरण करतात अशी भावना आहे. मात्र, स्वामीजींनी देहत्यागानंतर वाट पाहीन ही भावना टिकवण्याचा भरवसाही दिला नाही. 

 असेच एकदा स्वामीजींसोबत बसले होते. तेथे आलेल्या एकांनी विचारले, स्वामीजी, खूप वर्षांपासून प्रवचन सांगता, आपले प्रवचन ऐकून कोणी बदललेय, मोठे झालेत असे वाटलेय का ? स्वामीजी स्मितहास्य करत म्हणाले, "मी बदलायला लागलोय" म्हणाले. आध्यात्मात केवळ आत्मोद्धार, परोद्धार, समाजोध्दाराचा कोणताही लेषही नसल्याचे प्रखर अल्लमतत्त्व मांडले. 

"आपण खूप लवकर मोहात अडकतो; मात्र, पुढे ते आपल्यावर राज्य करते" असे सांगून स्वामीजींनी एक कथा सांगितली. "एकजण नदीकाठी बसला होता. त्याच्यासोबत एकजण होता. तो नदीकडे पाहिला. नदीतून कांबळ वाहत चालले होते. वाह! थंडीत कांबळ असल्यास ते पांघरल्यास गरम राहील. त्याने कांबळच्या मोहाने नदीत उडी मारली. पोहत जाऊन कांबळ पकडला. थोड्या वेळात वाचवा वाचवा म्हणून हाका मारू लागला.तो कांबळच्या मोहाने गेला होता, मात्र ती कांबळ नव्हे अस्वल होते. अस्वलाच्या तावडीतून कसे निसटायचे यासाठी धडपडत होता. आपले सगळे मोह अशाच असतात, गरम म्हणून जातो त्यानंतर त्याच्या हाती सापडून मरतो. मोहाला बळी पडण्यापूर्वी विचार करा." असे स्वामीजी म्हणाले. त्यांनी केलेल्या त्यागाची यादी पाहिल्यास आपण किती सोडले आहे. घर सोडले, गाव सोडले हे सर्व किती सामान्य बाब आहे. खऱ्या अर्थाने जे सोडायचे आहे ते वेगळे असल्याचे स्वामीजी मला सूचवून गेले. 

एकदा हुल्याळ आश्रमावर त्यांच्या पायाजवळ बसले होते. स्वामीजी निसर्ग व विज्ञान याविषयी खूप अद्भुतपणे बोलत होते. आताही मला ते आठवून आनंद होते. सांगता येणार नाही असे विवेचन त्यांनी केले. अचानक खालून एक आवाज आला, 'कोठे आहे तो सिद्ध्या?' तो आवाज ओळखीचा असल्यागत स्वामीजी उठले, आम्हीही उठलो. तो खालून पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होता. तो आवाज देणारे दिसले. भगवेधारी वयस्कर स्वामीजी होते, त्यांच्यासोबत दोघे शिष्य होते. त्या स्वामीजींना हात जोडून आपली खुर्ची दाखवत त्यावर त्यांना बसायला सांगितले. त्यांचा जोरात पुन्हा प्रश्न,  'कोठे आहे तो सिद्ध्या?' सोबत असलेले शिष्य 'ते हेच, आपण यांनाच विचारत आहात.' असे सांगत स्वामीजींना दाखवले. "हा नाही, मला सिद्ध्याला पाहायचंय" म्हणून पुन्हा ओरडत निघाले. आपल्याला भेटायचेय म्हणून खूप सांगितले होते. मात्र, आता त्यांना आपली ओळख पटेना. स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यामुळे ते असे करतात, असे सांगून नमस्कार करून शिष्यही निघाले. त्यांनी सिद्ध्या कोठे आहे ? म्हणून जोरात विचारलेला आवाज पूर्ण विरुन जाईपर्यंत स्वामीजी शांतपणे बसले होते. हळुवारपणे स्वामीजी म्हणाले, "एकेकाळी ते खूप मोठे ज्ञानी होते, स्वतःची ओळख स्वतःला नाही इतका विसर. त्यानंतर गप्प बसले.

बयलु बयलचि पेरुनि बयलु पिकवुनि

बयलु बयलायितय्या 

म्हटलेल्या अल्लमासारखी स्पष्ट भूमिका. गुहेश्वर बयलु इतकी स्पष्टता स्वामीजींची होत

एका पंथात असूनही सर्व पंथीयांना आपले वाटले. पंथाच्या बाहेरील लोकांनाही मोठे केले. उपनिषद, वेद आदींची वचनांशी सांगड घातली. प्रत्येकात आपलेच हा भाव जागवले. शेवटी मी कोणाचा नाही, ही घोषणा केली. तसेच प निषेधालाही सज्ज झाल्यागत 'बयलु' व्हायचा निर्धार केला. पुन्हा 'तुला शरणांचे बंधन मला तेही नाही' अशाप्रकारे अल्लमाच्याच दिशेने वाटचाल. पण दोघांत एकच विरोधाभास आहे. अल्लम समाजात न राहता पूर्णपणे दूर राहून आपल्या मार्गावर चालत राहिला. स्वामीजी लोकांतच राहून, सर्व गोष्टींत अडकूनही इथे नाही, हे दाखवून दिले. हे खूप दुर्मिळ आहे. 

इतके होऊनही सत्यही नाही असत्यही नाही

सहजही नाही असहजही नाही

मीही नाही हे सर्व मान्य करू. पण आमच्या डोळ्यांसमोर आचरण करुन जीवंत देवत्वाचा अनुभव दिलेले आपण असताना तूही नाही, हे कसे मान्य करायचे सांगा स्वामीजी ? अल्लमाच्या तूही नाही वचनाची त्याच्याइतकेच कठोरपणे न बोलता, न वागता अत्यंत सौम्यपणे नवीन मांडणी केलात. त्याचा खरा अर्थ  आपण नाही तर दुसरे कोण समजावणार ? कदाचित आपण निष्ठुरपणे समाजापासून दूर राहिलेल्या अल्लमावर प्रेम न करताही राहाल कोण जाणे. मात्र, आम्हाला प्रेम देऊन, आमच्यात आपलेपणाची भावना जागवलात. आता  अचानक आम्हाला दूर सारल्यास हे कठोर सत्य कसे स्वीकारायचे हे सांगा? 

त्रासदायक झालेय बोलणे ओझे झालेय मौन 

वेदना विरल्या डोळ्यांत 

पायी टोचलेला काटा

आतच मोडल्यागत

डंख मारतोय भाव मनी



Saturday, 4 February 2023

संत परंपरेला एक आदर्श

वृषांक भट

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

थोडीशी जरी प्रसिद्धी मिळाली तरी 'मी मोठा व्यक्ती' म्हणून मिरविणाऱ्यांंत श्री सिद्धेश्वर स्वामीजी हे अभिन्न आदर्श म्हणून दिसतात. अपरिग्रह व्रताचे कठोरपणे अनुसरण करताना  चालून आलेले पद्मश्रीसह अनेक पुरस्कार नम्रतेने ते नाकारलेले सिद्धेश्वर स्वामीजी संतपरंपरेत पहिल्या रांगेत आहेत. 

सिद्धेश्वर स्वामीजी हे उत्तर कर्नाटकात सर्वाधिक प्रसिद्ध होते. मात्र, त्यांनी कधीही प्रसिद्धीची आशा बाळगली नाही. कमीत कमी एक पत्रकार परिषदही त्यांनी कधीही बोलावली नाही. राजकारण्यांना भेटून अनुदान, सहकार्य मागणे ही तर दूरची गोष्ट. त्यांनी आपले प्रवचन टीव्हीवर दाखवावे, वृत्तपत्रांंत प्रसिद्ध व्हावे, अशी एकदाही अपेक्षा केली नाही. राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग नोंदवून विद्वत्तेचे प्रदर्शन घडविणेही दूरची गोष्ट. तरीही लाखो लोकांची मने जिंकली. आपले कौतुक करावे, आपली प्रशंसा करावी याची अपेक्षा न ठेवलेल्या या साध्या संताने प्रामाणिक आध्यात्मिक जीवनाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. 

सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रवचनांना न गेलेल्यांना ते कसे चालायचे याविषयी येथे स्पष्टपणे सांगायलाच हवे. सूर्योदयाला सुरू होणारे प्रवचन सुमारे एक तास चालायचे. ३० दिवस एकाच ठिकाणी प्रवचन चालायचे. गुळाला लागणाऱ्या मुंग्यांप्रमाणे हजारो लोक प्रवचन सुरू होण्याआधी एकत्र यायचे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले तरी कोठेही आवाज नाही! गूढ मौन. कोणत्याही कोपऱ्यात एखाद्याने खोकले तरी सर्वांना ऐकू यावे इतके निशब्द! लोक जमताच  श्वेतवस्त्र धारण केलेले सिद्धेश्वर स्वामीजी माईकपुढे उभे राहायचे, प्रवचन सुरू करायचे. एक शब्दही चुकीचा जाणार नाही इतके स्पष्ट चिंतन असायचे. आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट पुन्हा एकदा सांगून दुरुस्ती करणारे नव्हते !

प्रवचन संपताच स्वामीजी व्यासपीठावरून उतरून जायचे. भक्तांनी निघावे, यासाठी कोणी माईकवरुन सूचना देत नव्हते. स्वामीजी व्यासपीठावरून उतरले, हीच प्रवचन संपल्याची सूचना ! आलेल्या भक्तांमध्ये किती ती शिस्त! कसले ते मौन ! कसली ती नम्रता ! खरंच हा भारत का इतका संभ्रम ! खरा भारत असाच असल्याचे हे निदर्शक !

तर विजयपुरात असलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या ज्ञानयोगाश्रमाचे मूलतत्त्वे कोणती हे माहीत आहे का? 

कर्मयोग ! भक्तियोग ! ध्यानयोग !  ज्ञानयोग !



Thursday, 2 February 2023

देहाच्या पलिकडे, कणाकणात शिव झाले !



सकाळची बोचरी  थंडी. अंग झटकून अंथरुणातून बाहेर पडणेच कष्टाचे. अजून सूर्यच पूर्ण प्रमाणात उगवून मुख दाखवले नाही. अशातच ज्ञानसूर्याच्या प्रखर तेजाने आपल्या मनावर चढलेले किल्मिष दूर व्हावे, या ओढीने शेकडो,  नव्हे  हजारो लोक मैदान भरुन जमायचे. मात्र, अशाप्रकारचे आश्चर्य केवळ उत्तर कर्नाटकात दिसून यायचे. ते सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचन कार्यक्रमात ! होय. त्यांच्या अतिसहज, सरळ, स्निग्ध बोलणे ऐकण्यासाठी जमणारे ते लोक हृदय भरुन प्रवचनातील ओळी साठवून त्या पुन्हा पुन्हा आठवत घराकडे पाऊले टाकताना पाहून आश्चर्य वाटायचे. का माहीत आहे ? सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचनात मी कधीही चढ - उतार पाहिलो नाही. 'चांगला वक्ता कसा व्हावा?' यासाठी लांबलचक भाषणे देतात ना त्यांच्या कोणत्याही चौकटीत स्वामीजी अडकले नाहीत. त्यांच्या विस्तीर्ण हृदयातून स्फुरणारा एकेक शब्द थेट लोकांच्या हृदयापर्यंत भिडायचा. तेथेच ते पाय रोवून उभे राहून प्रेरणा द्यायची. त्यांचे एक महिन्याचे प्रवचन नि:संशयपणे एक दशकभर पुरेल इतके परिवर्तन आणायचे. जगाच्या मागे धावणाऱ्या लोकांना एके ठिकाणी बांधून ठेवून त्यांच्या अंतरंगात प्रवेश करण्याची अगोचर शक्ती त्यांच्यात होती. आश्चर्य कोणते माहीत आहे ? अशाप्रकारची शक्ती असताना, राज्यभरात 'जीवंत देव' (चालता - बोलता ईश्वर) म्हणून प्रसिद्ध असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले; ते स्थान त्यांनी कधीही गमावले नाही. कीर्ती पिशाच्चाला शिरावर चढू दिले नाही. सहज, लहान मुलाप्रमाणेच ते जगले. एकदा त्यांच्यासोबत 'मॉर्निंग वॉक' करताना त्यांच्या मानेजवळ कुर्ता फाटल्याचे पाहून संकोचानेच विचारले, 'असे का?' ते हसत म्हणाले, 'अजूनही कापड चांगले आहे. पूर्ण जीर्ण होईपर्यंत वापरता येईल !' मी अवाक् झालो. ते विचारले असते तर एवढेच काय? नको म्हणून न सांगता गप्प राहिले तरी पुरेसे होते, कपड्यांच्या राशीच त्यांच्यासमोर पडल्या असत्या. मात्र, संन्यस्त जीवन स्वीकारलेल्या व्यक्तीला कपड्याची चिंता कशाला? 

 विवेकानंदांच्या संन्यासी गीताचे अनुवाद करताना कुवेंपु लिहितात, आकाश हेचि घर, भूमीच अंथरुण, त्यागीला घर पुरेसे? (गगनवे मने, हसुरे हासिगे, मनेयु साल्वुदे चागिगे?). अक्षरशः या गीताला साजेसे ते होते. ते काही घरी गरीबीत नव्हते. वडील जमीनदार होते. त्यांचे घरच ४० खणांचे होते. मात्र, ती श्रीमंती त्यांना कधीही आकर्षित करू शकली नाही. वयाच्या १४ व्या वर्षी शाळेला गेलेला मुलगा कुणाला न सांगता गावातील देवस्थानात ध्यानाला बसलेला असताना अनेकांनी पाहिले आहे. पुढे प्रवचनासाठी आलेल्या मल्लिकार्जुन स्वामीजींच्या प्रभावाने या तरुणाने त्यांनाच गुरू मानून घराचा त्याग केला. गीतेपासून योगसूत्रांपर्यंत, उपनिषदांपासून शरण साहित्यापर्यंत सर्वांत नैपुण्य मिळविलेले  'श्री' गुरूंच्या आदेशानुसार सर्व जबाबदाऱ्या आपल्या खांद्यांवर घेत पुढे मार्गस्थ झाले. विजयपूरचे त्यांचे ज्ञानयोगाश्रम इतर सर्व मठांच्या तुलनेत आकाराने मोठे, विस्तारदृष्ट्या वडासारखे विस्तारलेले नाही. ते कोणाचेही लक्ष न वेधता 'श्रीं'सारखेच साधे आहे. तेच ज्ञानदासोह केंद्र ! सिद्धेश्वर स्वामीजी इतर मठाधीशांप्रमाणे शाळा - महाविद्यालये, रुग्णालये बांधण्याच्या हट्टाला पेटले नाहीत. ते दु:खी, कष्टी मनाला शीतलता देणाऱ्या प्रवचनांचे मार्ग अनुसरले. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेच त्यांचे 'कायक' राहिले. गुरुंच्या आदेशाचे श्रद्धेने पालन केले!




इतके ख्यातकीर्त,  भक्तांचे हृदयसिंहासनाधीश्वर असलेले स्वामीजी झोळी धरुन हात पसरल्याचे उदाहरणच नाही. अक्षरशः त्यांचा 'अपरिग्रह योग.' ते परिधान करत असलेल्या शर्टाला खिसाच नव्हता. एकदा बोलता बोलता सहजपणे त्याविषयी विचारले. त्यावर  'काय भरण्यासाठी खिसा हवा  हे सांगा' म्हणून हसले. म्हैसूरुला नरेंद्र मोदी आले होते. तेव्हा स्वामीजींनी 'त्यांना खिसा आहे, मात्र ते भरण्याची त्यांची इच्छा नाही' अशा शब्दांत मुक्तकंठाने त्यांचा गौरव केला ! बहुतेक एखाद्या राजकारण्याचे इतक्या उदारपणे त्यांनी गुणगान केल्याचे मी तर पहिल्यांदाच ऐकलोय! तर ते कोणाचे तरी अवगुण दाखवल्याचे कधीही माझ्या निदर्शनास आले नाही. आपण त्यांच्यासमोर एखाद्या दरोडेखोराला जरी आणून उभे केले तर ते त्याच्यातील एक चांगला गुण शोधून काढून त्याचे कौतुक केले असते. शारदामाता सांगायच्या, 'कोणांतही दोष पाहू नका.' अनेकजण आपल्या भाषणांत त्याचा उल्लेख करतात. मात्र, तसे जगलेले केवळ सिद्धेश्वर स्वामीजी.

एकदा व्यासपीठावरून एक स्वामीजी असंख्य लोकांसमोर बोलत होते. ते आपल्या परदेशातील प्रवासांविषयीचे अनुभव सांगताना बढाई मारत होते. सिद्धेश्वर स्वामीजींसारख्या अनुभावी व्यक्तीसमोर या विदेशी प्रवासातील अनुभवाचे वर्णन ऐकणे त्रासदायक ठरले होते. नंतर सिद्धेश्वर स्वामीजींसमोर त्यांची भेट झाली तेव्हा त्यांचा परिचय करून देताना स्वामीजी म्हणाले, हे सर्व जग फिरलेले महात्मा आहेत. देश पाहा, कोश वाचा (देश नोडु कोश ओदु) म्हणतात ना त्याप्रमाणे हे जग पाहिले आहेत, अध्ययन केले आहेत.' माझे डोळे विस्फारलेले. सिद्धेश्वर स्वामीजींचे व्यक्तिमत्वच तसे होते. ते कोणालाही कधीही दुखावले नाहीत. आत्मविश्वास भरणारे, ते वाढविणारे गण होते. 

त्यांना भेटल्यावर दरवेळी दीर्घकाळ त्यांच्यासोबत 'वॉक' करण्याची संधी मला मिळत होती. त्यांनी एकदाही त्यांच्या प्रवचनाविषयी, त्याच्या विषयवस्तूविषयी चर्चा केल्याचे मी ऐकलो नाही. 'वॉक' संपेपर्यंत देशाच्या सद्यस्थितीविषयी त्यांचे प्रश्न असायचे. सांस्कृतिक आक्रमण असो, प्रत्यक्ष युद्ध असो ते अमुलाग्र विचार करायचे. भाषेची समस्या असो, लोकसंख्येच्या स्फोटाचाही विषय का असेना ते खोलवर जाऊन विस्तृत चर्चा करायचे. अनेकदा त्यांची अंतर्दृष्टी इतकी सूक्ष्म असायची की तोपर्यंत आपण मानलेले सत्य तर्कबद्धरीत्या खोटे ठरायचे. त्यांनी कधीही वाद घातला नाही, मात्र, समजेल अशाप्रकारे सूक्ष्मपणे सांगायचे. मला चांगले आठवतेय. आम्हा सर्वांच्या सुदीर्घ प्रयत्नांनंतरही समाजात बदल दिसत नाही. त्यामुळे हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत, ही मनातील भावना एकदा त्यांच्यासमोर व्यक्त केलो. त्यावर गंभीर होत ते म्हणाले, 'आज आपण करत असलेल्या प्रयत्नांना एका पिढीनंतर फळ मिळेल, ही आशा ठेवली पाहिजे. तरच ते काम करू शकू.' आपण सुरू केलेल्या कामाला २५ वर्षांनंतर फळ मिळेल,  या विश्वासाने पुढे जायला हवे, हा कानमंत्र त्यांनी दिला. बहुधा समाजात काम करणाऱ्या प्रत्येकाने इतक्या संयमाने, सजगपणे प्रतीक्षा केल्यास बदल निश्चित होईल. स्वतः स्वामीजीच त्यांचे प्रवचन ऐकायला येणाऱ्या लोकांविषयी सांगायचे, 'हे लोक उगीच येत नाहीत. २० वर्षे परीक्षण करुन भात शिजलंय याची खात्री झाल्यावर येत आहेत!' त्यांची दिनचर्या वैशिष्ट्यपूर्ण असायची. अतिशय कमी झोपायचे. सकाळी लवकर उठून प्रवचन करायचे. ते संपल्यावर घामेघुम होईपर्यंत 'वॉक.' अल्प प्रसाद (भोजन). अध्ययन - पाठ - सायंकाळी आणखी 'वॉक' गावातील मान्यवर, जाणकारांसोबत विचारविनिमय करायचे. यात ते फारच कमी बोलायचे. इतरांना बोलते करून चालू घडामोडींविषयी जाणून घ्यायचे. त्यांची मौन साधना. मधाच्या पोळ्यात जमवून ठेवलेल्या मकरंदाचे प्रमाण समजणे सोपे नाही. अगदी त्याप्रमाणे त्यांचे जीवनही. कोठेही गेले तरी, कोणासोबतही थोडावेळ घालवले तरी ते त्यांचे आप्त बनून जायचे. ही सरळता आणि प्रेमाला असलेली श्रेष्ठ शक्ती होय.

पोन्नंपेटे हे कोडगूमधील एक लहान खेडे. तेथील एका घरात त्यांच्या निवासाची व्यवस्था केली होती. त्या कुटुंबियांना त्यांचा परिचय नसल्याने ते त्यांना इतर साधुंप्रमाणे समजून गप्प राहिले. त्याआधी घराच्या निरीक्षणासाठी आलेल्या एका स्वामीजींनाच ते सिद्धेश्वर स्वामीजी समजले होते म्हणे. त्यानंतर थेट शुभ्र वेषात आलेल्या साधूंनी त्यांचे मन जिंकले. ते थोडेच भोजन करायचे. मात्र, कुटुंबीय भोजनाला बसताच ते प्रेमाने त्यांना जेवण वाढायचे, पोट भरुन आणखी शक्य नाही इतके ! त्यांचे ते दोन दिवसांच्या काळातील वास्तव्य ते कुटुंबीय अद्याप विसरले नाहीत. हा सिद्धेश्वर स्वामीजींचा दिव्य चमत्कार होय. प्रत्येकाला 'मी म्हणजे त्यांना खूप आवडतो' असे वाटायचे. तितकेच ते प्रत्येकावर समदृष्टीने प्रेम करायचे. 

जेवण वाढताना त्यांच्या भरपूर प्रेमप्रवाहाचा अनुभव यायचा. ते क्वचितच जेवण वाढत असल्याने त्याचे साधकांना अप्रुपच. तेव्हा देवानेच जेवायला बसलेल्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांना भेटायला कोणीही आले तरी त्यांना प्रसाद घेतल्याशिवाय ते जाऊ देत नव्हते. तेवढेच काय ? प्रवचनासाठी परगावी गेल्यावर कोणालाही कवडी नया पैसा मागितले नाहीत. मात्र, प्रवचन ऐकायला येणाऱ्यांसाठी दासोहाची व्यवस्था करायला सांगायचे. आपण साऱ्यांनी बुद्धाच्या जीवनाविषयी ऐकले आहे. त्याच्यासोबत येणाऱ्या संन्यासींविषयी वाचले आहे. आपल्या काळात आपण सिद्धेश्वर स्वामीजींच्यात ते पाहिलोय इतकेच. ते आपल्या काळात बुद्धासारखे जगले! 

 ते आपल्या देहात अनारोग्याची वेदना लपवून ठेवूनच दीर्घकाळ जगले. एकदा पाय घसरून पडल्यावर पायाचे हाड मोडल्यावरच त्यांना देहात वेगळीच वेदना असल्याचे समजले होते! तरीही ते गप्प बसले नाहीत. थोडेसे बरे झाल्यावर लगेच प्रवचनाला सिद्ध व्हायचे. गुरुचा आदेश कसा मोडायचा ? विजयपूर जिल्ह्यातील काखंडकी येथे त्यांचे शेवटचे प्रवचन झाले. त्यांना भेटल्यावर त्यांच्या वेदनेविषयी ते बोललेच नाहीत. मात्र, देशाच्या वेदनांविषयी दीर्घ चर्चा केली. त्यांच्यासोबतच्या साधुंसोबत बसून चर्चा करायला लावले. मन:पूर्वक शुभेच्छा देऊन निरोप दिला. तिथून पुढे  ज्ञानयोगाश्रमात आल्यावर आजारी पडल्याने तेथे स्थिरावले तेव्हा आम्हा सर्वांना त्यांच्या वेदनांविषयी जाणीव झाली. देहत्यागाच्या आठ दिवस आधी त्यांना भेटल्यावर चेहऱ्यावर वेदनांचे लवलेशही नव्हते. चेहऱ्यावर आपल्यातील भावभावनांचे प्रतिबिंब दिसते, हा इंग्रजी सुविचार आठवला.  आपल्या चेहऱ्यावर वेदनांचे लक्षणच नसल्याचे स्वामीजींना सांगत हसलो. ते जोरातच हसले. थोडावेळ बोलले. त्यांनी थकवा आल्याची सूचना केल्यानंतर मी तेथून निघालो. देहत्यागाच्या दोन दिवस आधीही आणखी एकदा त्यांना पाहिलो. ते यावेळेस ओळखण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांचे दैवत्व ओळखण्याची संधी ईश्वराने आम्हाला दिली हे आमचे भाग्यच होय.

'समाधी बांधून उत्सव साजरा करू नका, देह अग्निला समर्पित करा' असे आधीच लिहून ठेवले होते! त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या लोकांचा हिशेब करणे अशक्य बनले होते. शरणांचे जीवन त्यांच्या मरणातच कळणार असे म्हटले जाते. ते खोटे नाही. परंतु पूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांचे जीवन ते असतानाही माहीत होते, देहत्यागानंतर ते सर्वत्र पसरले इतकेच!

चक्रवर्ती सुलिबेले, बंगळुरू

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर

शिवयोगी सिद्धरामाने दिले शरण चळवळीला बळ



 ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी योगीकुल चक्रवर्ती, शरणश्रेष्ठ श्री सिद्धरामाविषयी म्हणतात, "श्री सिद्धरामेश्वर हे योगीपुरुष, आत्मानुभवी होते. त्यांची वचने मधुर - मंत्र, शब्द - हंस होत. ते दृष्टीच्या मार्गे अंतरंगात प्रवेश करतात. तेथे पसरलेल्या मनसागरात तरंगतात. तेथून वर आलेले छोटेछोटे तरंग विचारांच्या शेकडो लाटा निर्माण करतात." यातून श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी श्री शिवयोगी सिद्धरामांच्या वचनांचे स्वरूप व सामर्थ्य विषद केले आहे. ते लोककल्याणकारी संत, कायक - शिवयोगी,  वचनकार म्हणून श्रेष्ठ आहेतच. शिवाय कल्याणक्रांतीनंर शरणसंकुल निर्नायकी होऊन सैरभैर झालेला असताना आपल्या हाती नेतृत्व घेतले. शून्य सिंहासनाचे अधिपती म्हणून आपल्या समर्थ नेतृत्वाने व चाणाक्षपणे शरण चळवळीला बलशाली बनविण्याचे कार्य केले. त्यामुळेच तो शिवशरणांच्या हत्या व रक्तपाताच्या आघातांना झेलूनही विस्तारला. 

बाराव्या शतकात शिवशरणांनी चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत व ब्राह्मण मंत्री मधुवरस याची कन्या कलावती यांचा विवाह अनुभव मंटपात लावला. यामुळे तत्कालीन राजा बिज्जळ व त्यांचा पुरोहितवर्ग यांनी वर्णसंकर होत आहे म्हणून गदारोळ उठवला. यामुळे प्रधानमंत्री बसवण्णांनी पदाचा राजीनामा दिला. राजाने हरळय्या व मधुवरस यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार करण्यात आले.  कल्याणात हलकल्लोळ माजला. अनुभव मंटपातील शरणजन देशांत इतस्तत: विखुरले गेले.  दरम्यान, हरळय्या, मधूवरस व शीलवंत यांच्या हत्येचा सूड घेण्याचा निर्धार शरण जगदेव व मल्लिबोम्मण्णा यांनी केला. त्यांनी एके दिवशी भर रस्त्यात राजा बिज्जळाचा वध केला. त्यानंतर बिज्जळाचा मुलगा सोयिदेवने सर्व शरणांना शोधून शोधून मारण्याची आज्ञा केली. त्यावेळी मोठ्‌‌‌या प्रमाणात शिवशरणांसह लोकांच्या हत्या झाल्या. दरम्यान, शरणांचे नायक  बसवण्णा तेथे न थांबता कल्याण सोडून निघून गेले होते. तेथे ते लिंगैक्य पावले. अल्लमप्रभू देवांनी श्रीशैलची वाट धरली. गणाचार दलासह लढत निघालेले चन्नबसवण्णा उळवीत लिंगैक्य झाले. महत्त्वाचे सगळे शिवशरण कल्याण सोडल्याने तेथे उरलेले शिवशरण नेतृत्वाविना दिशाहीन झाले होते. त्यांना काही सूचेनासे झाले होते. अशा स्थितीत सोन्नलगीचे सिद्धराम उभे राहिले. उरलेल्या शरणांना धैर्य दिले. आपण सारे शरण नवसमाजाच्या निर्मितीसाठीच कल्याणला आलोय. 'धर्म हा समाजाच्या उद्धारासाठी आहे, या विश्वासाने बसवण्णांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू केली; रोजगारासाठी नव्हे. त्यामुळे कोणी धीर सोडण्याची गरज नाही. आत्मस्थैर्य गमावू नका',  असे सांगत सिद्धरामांनी पुढाकार घेऊन सर्व शिवशरणांना धीर दिला. तसेच त्यांना पुन्हा संघटित केले. मोळिगे मारय्यासारखे ज्येष्ठ शरण सिद्धरामांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर सिद्धरामांच्या नेतृत्वाखाली कल्याणात पुन्हा वीरशैव लिंगायत धर्माचा, बसवण्णांचा, शरणतत्त्वांचा जयजयकार घुमू लागला. 

शिवशरणांनी पुन्हा आपल्या 'कायक'ला सुरुवात केली. अनुभव मंटपाचे दार उघडले. मात्र, आता शून्य सिंहासनाचा अधिपती कोण बनणार ? त्यावर कोण बसणार? हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सोड्डळ बाचरस यांनी उद्घोषणा केली, ''योगियांचा योगी शिवयोगी सोड्डळ सिद्धराम हाचि एक योगी.'' (योगिगळ योगी शिवयोगी सोड्डळ सिद्धरामनोब्बने योगी) सर्व शिवशरणांनी हात उंचावत त्यांना अनुमोदन दिले. तिसरे पीठाधिपती म्हणून सिद्धराम शून्य सिंहासनावर विराजमान झाले.

राजा बिज्जळाच्या हत्येनंतर सिंहासनासाठी त्याचा मुलगा राज मुरारी सोयिदेव व त्याचा भाऊ कर्णदेव या दोघांत कलह सुरू होता. दोघेही समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. तेव्हा पुन्हा शरण संकुल अतिशय सबल बनले होते. सिद्धरामांनी ते एक राज्य हलवू शकेल अथवा एका राज्याची पुनर्रचना करू शकेल, इतके त्याला बलशाली बनविले होते. बिज्जळाचा भाऊ कर्णदेवाने सोन्नलगीच्या सिद्धरामांना संदेश पाठवून कल्याणच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सहाय्य आणि आशीर्वाद मागितले. कवी   राघवांकाने आपले काव्य 'सिद्धराम चरित्रे'मध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. (पृष्ठ ८२).

या घटनेपूर्वी शरण चळवळीने राजकीय सलगीचा परिणाम भोगला होता. त्यामुळे सिद्धरामांनी चाणाक्षपणे कर्णदेवाचा प्रस्ताव नाकारला. केवळ धर्मकार्य हे एकच ध्येय मानून ते कार्यप्रवृत्त झाले. त्यांनी आपले शरीर वृथा कार्यात झिजविण्याऐवजी नित्य 'कायक'ला आपले जीवनमंत्र बनविले. त्यामुळे सिद्धराम जनप्रिय झाले. राघवांकाने "साकारनिष्ठे भुतंगळोळगनुकंपे ताने परबोम्म" अशा शब्दांत सिद्धरामांचा गौरव केला आहे. आपल्या लोककल्याणाच्या कार्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या सिद्धरामांनी अल्लमप्रभू देवांचे शिष्य म्हणून शरण संकुलात केलेला प्रवेश शरण चळवळीला विजयमार्गावर नेणारा ठरला.



सुख, समृद्धी आणणारा जोकुमार






साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांचं एक नाटक. सुरुवातीला नांदी झाल्यावर एक सूत्रधार येतो. त्याला आणखी एकजण येऊन मिळतो. सूत्रधाराने समोर खाली एक बांबूपासून बनवलेली टोपली ठेवलेली असते. त्या टोपलीत आतील बाजूला गोलाकार कडूनिंबाचा पाला लावलेला असतो. त्यात मध्यभागी उभा दूधी भोपळा ठेवलेला असतो. ते लिंगाच्या आकारासारखे असते. दुसरा त्या सूत्रधाराला विचारतो हे काय ? त्यावर सूत्रधार उत्तरतो, 'हा आमचा देव.' पुन्हा दुसरा विचारतो, 'देवांचे स्वरुप, त्यांची नावे वेगळी असतात, हा कसला देव?' सूत्रधार सांगतो, 'देवाविषयी अशी प्रश्ने विचारू नयेत.' का ? तुमचा देव विशेष आहे का, असा सवाल तो दुसरा पात्र विचारतो. त्यावर सूत्रधार उत्तरतो, 'होय, हा खूप विशेष देव आहे. सर्वांना जीवन देणारा देव आहे. सर्वांना जीवनमार्ग दाखविणारा देव आहे. तसेच सर्वजण मानतात, असा हा देव आहे.'

'पूजा केल्यावर हा देव काय काय फळे देतो,' असा सवाल तो दुसरा करतो. त्यावर सूत्रधार सांगतो, पूजा केल्यावर हा देव अपत्य नसलेल्यांना अपत्य देतो. वांझ असलेल्यांचेही भाग्य खुलते. त्याशिवाय विधवांनाही पती मिळण्याचे भाग्य लाभते.' हा संवाद ऐकून प्रेक्षक स्तब्ध होत या नाटक व देवाविषयी आश्चर्य व्यक्त करतानाच ते जाणून घेण्यासाठी उत्साहित होतात. या नाटकातील देवदासी शारी, पाटलीण या पात्रांच्या माध्यमातून महिलांचे शोषण, त्यांची घुसमट मांडली आहे. त्याला वैचारिकदृष्ट्या अनेक कंगोरे आहेत. मात्र,  आपला मुख्य विषय आहे तो या नाटकाचे नाव असलेला तो देव. ज्याचे नाव आहे, "जोकुमारस्वामी." 

या आधुनिक नाटकातच नव्हे तर ११ व्या शतकापासून  कन्नड साहित्यात जोकुमारचा उल्लेख आढळतो. 'जातकतिलक (इ. स. १०४९), जीवसंबोधने (१२००), नेमिनाथ पुराण (११८०), समयपरीक्षे, बसववचन (१२२२), पार्श्वपुराण (१७६६) यांचा त्यात उल्लेख करावा लागेल. श्रीधराचार्य विरचित 'जातकतिलक'मध्ये म्हटले आहे,

भवनांतदोळ सुरासं।

भवनिगे काणिदिरे सौम्यदिरे पापगणं।।

नव पंचदोळ पुट्टिद कुवरं।।

जोकुमारनंते परिदिवसमिरं।। 

म्हणजे  इ. स. १०४९ च्या आधीही जोकुमार परंपरा होती, हे यावरुन दिसून येते.  गेल्या हजार वर्षांपासून 'जोकुमार'ने  जानपदसह कन्नड साहित्याचेही लक्ष वेधून घेतले आहे.  तसेच शिवराम कारंथ यांनीही जोकुमारविषयी लेखन केले आहे. जोकुमार म्हणजे पुत्र, बालक, युवक होय. 

आपल्याकडे संपूर्ण जगताचे भरणपोषण करणाऱ्या, अन्न देणाऱ्या भूमातेची पूजा करण्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा चालत आली आहे. एका ऋतूत मातीची पाचवेळा पूजा केली जाते. कारहुणवीनंतर आषाढात मातीचे बैल, गुळ्ळव्वाची पूजा, नागपंचमीला वारुळ, मातीच्या नागमूर्तिची पूजा, गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तीची पूजा, जोकुमारची पूजा केली जाते, हे आपण मागे गुळ्ळव्वाच्या लेखात पाहिले आहे. आता गणेशोत्सव सुरू असतानाच मात्र त्याच्यानंतर येणारी आणि शेवटची मातीची म्हणजेच मातीच्या मूर्तीची पूजा म्हणजे जोकुमार. गणेशोत्सवाच्या चौथ्या - पाचव्या दिवशी भाद्रपद अष्टमीला याचा जन्म होतो. विशेषत: उत्तर कर्नाटकासह सीमाभागातील  कोळी, परीट आदी समाजाच्या महिला जोकुमारची मूर्ती असलेली टोपली डोक्यावर घेऊन घरोघरी जातात. भीती वाटावी, असे मोठे विस्फारलेले डोळे, विस्तारलेला भालप्रदेश, जाड ओठ, त्यात भरलेली लोणी, पाहताक्षणीच लक्ष वेधणारे मोठे नाक, जाड मिशा, शिवाय त्याच्या लैंगिक शक्ती व कामुकतेचे संकेत असलेले बृहदाकार शिश्न. त्या संपूर्ण मूर्तीला लावलेले हळद हे जोकुमारच्या मूर्तीची वैशिष्ट्ये. तर त्याला कडूनिंबाच्या पाल्याने अलंकृत करुन टोपलीत बसवलेले असते. घरोघरी लोणी, खोबरे, धान्य देऊन त्याची पूजा केली जाते. दरम्यान महिला गातात, 


१. 'जोकुमार हुट्टली, लोकवेल्ला बेळगली

आ तायी हालू करेयली, कट्टीद मोसरु कटियली नम्म देवी...'


२. 'अड्डड्ड मळि बंद, दोड्ड दोड्ड केरे तुंबी 

गुड्डुडळेल्ला हैनागि जोकुमार 

मडिवाळर केरी होक्याने जोकुमार 

मडितुंबा हू मुडिवंते चलुवि तन्न मडदियारंद सुकुमार...


३.कायी कत्तरिसी तुगतुगी नोडुतावे 

जोग्यागि निंत जतनिंग ।

इन्नू तरिसय्य होन्न मळेय ।।

याको कोमरय्या निन्न बायिगे बेण्णिल्ल

मेले माणिकद हरळिल्ल ।

ई ऊर ओण्यागे निन्न सुळुविल्ल ।।

राय रायरेल्ला चावड्याग कुतगोंडू

राज कोमरन करस्यार ।

केळ्यारल्लि आरिद्री मळेय बरलिल्ल ।।

शेट्टी शेट्वायरेल्ला कट्टिम्याले कुतगोंडू 

पुत्र कोमरन करस्यार ।

पुत्र कोमरन करसि केळ्यारल्लि उत्तरि मळेय बरलिल्ल ।।

अत्तल मळि बंदितल केरीतुंबी

गुत्ति मलेनाड कोळीकट्टी गौरव्वा।

निन्न पुत्र नंद ल तडद्दवे ।।

अड्डड्ड मळि बंद, दोड्ड दोड्ड केरे तुंबी 

गुड्डुडळेल्ला हैनागि ।

गौडर सड्डेय मेले सिरि बरलि।।

वंदेत्तु निमगे हिंडेत्तु आगलो

सेरिद भूमी बेळेयल्लि ।

जोकुमारण्णन नारेरु कोट्ट हरकेय।।

जोकुमार समृद्धिय देव

ज्वाळद होलक आरेळु मुंचिगे 

हाकि आरेळु करेदर ओ एन्न ।

गौरम्मा मायदिंद मर्ग हडदळे।।

हुट्टिदेळु दिवसक पट्नाद तिरग्यान

दिट्नादेवि निनमगन ।

कोमारनु कोट्टार एळु दिनगळनु।।

राणिद हच्चड होत्तान कोमर

रायर ओण्याग सुळिदान।

नन कोमरा रायर हेंडरु तनगेंदे।।

हारुर गेर्याग होक्काग नन कोमर

गारडिगण्ण तिरुवुत ।

तन्नय्य तायंदिद्दिरु बिडलिल्ल।।

पुंडन पुंडाट हिंड मंदि कुड्यार 

कंडल्लि कल्लिगि बडदार ।

रात्र्याग अगसर कल्लाग तुरक्यार।।

अष्टमी दिन हुट्यान नन कोमर

सिट्टेर नोडी बेसगोंड ।।

जोकुमार हुट्टिदेळु दिसवसक मरणव।।

वक्कलिगेर ओण्याग होक्यान नन कोमर चक्करगण्ण तिरवूत।

जोकुमार वक्कलिगेर हेण्ण ननगेंद।।

हरगिद होलदाग हरिदु चंडाड्यान

हरिदिय मगन कोमरय्य।

चंडाडिदल्ली हवळु मुत्तुगळू बेळेदाव।।

बलवंदु निम्म बागिलक कुंतान

बागिनगळ कोडिरव्वा।

जोकुमार बागिलक हरकी कोडतान।।

बसलिक्की सोप्पिगी होदाळ हनुमव्व

बसुरिल्लवंत अळुताळे ।

नन कोमर बसुर माडि मनेगे कळुव्यान।।

हालबेडि हरिदत्त कोलबेडि कुणिदत्त 

मोसर बेडि कसर तुळिदत्त।

नन कोमर कुसलाद गेज्जे केसराग।।

याके कोमरा निन्न बायिगे बेण्णिल्ल मेले माणिकद हरळिल्ल  ई वूर ।

ओण्याग निन्न सुळुविल्ल।।

हरिहणम हान मुरुडोंकि

हरिदा लंकि हच्चि अव बेंकि सुट्ट एल्ला।

केंपू मोडियंथ जोकुमार। 

मेरद बिट्टार कविय होल्यालार ।

होडेद अवन प्राण।।

हुट्टिदोळु दिनसाके पट्टणव तिरुग्याने 

दृष्टीदेवी निन मग कोमरागे।

कोट्टारे येळु दिनगळ।।

आरेळू दिनकेन आळिदने राज्याव 

दिनेल देवी निन मग कोमराम 

तोऱ्यारे येळु दिनगळ।।

बित्तिद पैरु वणगि होगुतिवे 

हेत्तव्व हिट्टु कोडलोल्लळु ।

शिवराय उत्तरेय मळे करुणिसु।।

कट्टिय हत्याने होत्तुगळ नोड्यान

हत्याने निलगुदुरेय नम

कोमर कै बीसि मळेय करेदाने।।

एरिय हत्यान येळ्येव नोड्यान

हत्याने निलगुदुरेय नम कोमर 

शल्येव बीसि करेदाने।।

अड्डड्ड मळि बंदु दोड्ड दोड्ड केरी तुंबी 

गुड्डुगळेल्ला हयनागि गौडर 

शेट्टिय मेले सिरि बरली ।।




या गीतांतून जोकुमार हा ग्रामीण जनांसाठी सुख, समृद्धी आणणारा देव आहे, हे दिसते. त्याच्यामुळे पाऊस आणि  समृद्धी येते, अशी लोकभावना आहे.  जोकुमारची सातव्या दिवशी डोके फोडले जाते. जोकुमारविषयी अनेक दंतकथा आहेत. तो गणपतीचा भाऊही मानला जातो. तसेच ज्येष्ठागौरीचा पुत्रही म्हटले जाते. त्याबरोबरच गणनायक म्हणूनही ओळखला जातो. अशा या अल्पायुषी जोकुमारचा यंदा आज शुक्रवारी शेवटचा दिवस. तो गेल्यावर पाऊस आणेल, ही शेतकाऱ्यांसह ग्रामीण जनांची श्रध्दा. त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आण, हीच त्याला प्रार्थना.

- अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर

आता गुळ्ळव्वा उरली फक्त पूजेपुरती मुली - मुले हरवली मुठीतल्या दुनियेत




ह्यांग सत्ते कुंयव्वा,

निन्न गंड परदेसी,

बळ्ळोळ्ळी बनदाग, उळ्याडी अळतानं...

आषाढ महिन्यातील दर बुधवारी हे गीत गात शोकमग्न मुली गुळ्ळव्वाला निरोप द्यायची. शेतशिवारं मुला - मुलींच्या गर्दीने फुलायची. त्यांच्या खेळांनी शिवार चैतन्यमय व्हायचं. निमित्त असायचं आषाढ महिन्यात दर मंगळवारी येणाऱ्या गुळ्ळव्वा उत्सवाचं. आज यंदाच्या आषाढातला तिसरा मंगळवार.  मात्र, आता आषाढातल्या दर बुधवारचं  हे चित्र लुप्त झालंय. केवळ मंगळवारी घरोघरी होणारी पूजा उरलीय. 'मुठीतल्या दुनिये'त अडकलेल्या  मुला - मुलींना ना याचं आकर्षण,  ना माहिती आहे. त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत. 


उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्रातील सीमाभागात आषाढ महिन्यात येणाऱ्या मंगळवारी हा उत्सव साजरा होतो. कारहुणवीनंतर येणारा हा शेतकऱ्यांचा आणखी एक सण. कर्नाटकातील काही ठिकाणी कन्नडमध्ये 'मण्णेत्तीन अमावस्या' साजरी केली जाते. माझ्या लहानपणी मुला -मुलींना या उत्सवाची खूप ओढ असायची. म्हणूनच म्हटलं जायचं.

गुळ्ळव्वा गुळ्ळव्वा एंद बरती,

गुड्डक्क होगी गुलगंजी तरतिनी, 

एंद बरती, इलकलक होगी सीरी तरतिनी, 

गुळेदगुड्डक्क होगी खणा, गोकाकक होगी करदंट तरतिनी, एंद बरती

अशाप्रकारे पुढे असेही म्हटलं जायचं.

गुड्डक्क होगलिल्ला गुळ्ळव्वन मण्ण तरलिल्ला, 

सुळ्ळ बंतव्वा नागर पंचमी 

इतकी ओढ तेव्हाच्या लहान मुलांना असायची. 

संपूर्ण जगताचे भरणपोषण करणाऱ्या, अन्न देणाऱ्या भूमातेची पूजा करण्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा चालत आली आहे. एका ऋतूत मातीची पाचवेळा पूजा केली जाते. कारहुणवीनंतर आषाढात मातीचे बैल, गुळ्ळव्वाची पूजा, नागपंचमीला वारुळाची पूजा, गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तीची पूजा, जोकुमारची पूजा केली जाते. माती ही शक्तिदेवता समजून गुळ्ळव्वाचा सण साजरा केला जातो. विशेषतः मुली व मुलांसाठी हा सण वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

आषाढ महिन्यातील दर मंगळवारी मुली चुरमुरे, दाळगा, शेंगा घेऊन लहान मुला-मुलींसह शेतात जाऊन माती आणतात. त्या मातीने गुळ्ळव्वा व बैलांची मूर्ती बनवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी तळवारकी असलेल्या कुटुंबातील महिलांनी पाटलांसह प्रमुख कुटुंबांच्या घरी माती आणून देण्याची तर काही ठिकाणी कुंभारांनी मूर्ती बनवून विकण्याची पध्दत आहे. गुळ्ळव्वाची मूर्ती बनवण्याची पद्धत आणि आकार दर मंगळवारी बदलते. यानिमित्त देवस्थान, मोर, साप, विंचू, रेडा आदी मूर्तीही बनवल्या जातात. तसेच बैलांच्या मूर्तीही बनवतात. गुलगंज व रंगीबेरंगी करडईच्या बियांनी गुळ्ळव्वाचा शृंगार तर बैलांची सजावट केली जाते. विशेष म्हणजे माझ्या लहानपणी दोन्ही मूर्ती चांगले बनवणाऱ्यांच्या घरी त्या बनवून घेण्यासाठी मुली व मुलांची गर्दी व्हायची. अनेक महिला गुळ्ळव्वाच नव्हे तर बैलांच्याही साचेबद्ध, आकर्षक व सुंदर मूर्ती तयार करायच्या. त्यांच्याकडूनच मूर्ती बनवून घेण्यासाठी मुली व मुले आपल्या पालकांसह त्यांच्याकडे हट्ट धरायची. तसेच एक पुरुष मूर्तीही तयार केली जाते. तो गुळ्ळव्वाचा नवरा गोग्गप्पा. नंतर सायंकाळी गुळ्ळव्वा व बैैलांची पूजा, आरती केली जाते. तसेच शेवयाचा नैवेद्य दाखवला जातो.  त्यानंतर मुली मैत्रिणींसह गाणी म्हणतात. या गाण्यांनी जानपद समृद्ध केले आहे.

वंद हुंचिनकप्प ना माडिद तप्प,

भिमारती होळी होळीतन सेळे, 

सेळे बागिलू तेरेये गौरम्मा...गंगम्मा...

बसवग बसव एन्निरी बसवन पादक शरणेन्निरी...

गुळव्वन मण्ण तरलिल्ल गुलगंजी हच्ची आडलिल्ल,

सुळ्ळ बंतल्लव नागर पंचमी...!

बुधवारी खेळ, वनभोजन

बुधवारी खेळांसह जेवणालाही प्राधान्य असायचे. या दिवशी मुला - मुलींसह अख्खे कुटुंब शेतात असायचे. मात्र हे चित्र आज दिसत नाही. मुला - मुलींसाठी खेळ अविस्मरणीय क्षण असायचे. मुले - मुली गट बनवून वेगवेगळे खेळ खेळायचे. वनभोजनाचा आनंद घ्यायचे. यासाठी धपाटे, बाजरीच्या भाकरी, वांगीची भाजी, शेंगा चटणी, दही, शेंगा पोळी, घारगे आदी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे.  मुली शोक करत गुळ्ळव्वाचे शेतातील मातीत विसर्जन करून घरी परतायच्या. 'गुळ्ळव्वा देवता नाही' अशी म्हण प्रचलित आहे. तरीही ग्रामीण व शेतकरी यांचे मातीवरील प्रेम, निष्ठा, श्रद्धा व आराधनेला तोड नाही. परंतु आज ग्रामीण लोकांसाठी केवळ ही आठवण बनली आहे.





माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट

  धारवाड… कर्नाटकातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच शहराने एक काळ असा पाहिला, जेव्हा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या ओळ...